डोळ्यांचा मेकअप डोळ्यांचा त्वचेसाठी चांगला असतो का?
डोळ्यांचा मेकअप डोळ्यांचा त्वचेसाठी चांगला असतो का?

हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रत्येक मेकअप करणाऱ्याने स्वतःला विचारायला हवा.
उत्तर होय आणि नाही दोन्ही प्रकारे देता येऊ शकतं. विचित्र वाटेल वाचायला, पण तुम्ही वर्षानुवर्षे वापरणारा मेकअप अचानकपणे तुम्हाला त्रास द्यायला लागतो. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे पापण्यांना सूज येणं आणि इन्फेक्शन होणे याला कॉन्टॅक्ट डर्मीटायटीस असं म्हणतात.

तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही, पण या लेखामध्ये आम्ही खूप कॉमन होणारे धोके आपल्याशी शेअर करू इच्छितो, जे आपल्या नेहमीच्या आय मेकअप प्रोडक्ट ने होऊ शकतात. आम्ही काही गाईड लाईन्स इथे शेयर करत आहोत जे एक्सपर्ट्स कडून सांगितले गेलेले आहेत.

आपल्या नेहमीच्या आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट मुळे होणारे डोळ्याचे गंभीर इन्फेक्शन्स

kajalkajal eyeliner, kajal pencil

FDA कडून अशी माहिती मिळते की दरवर्षी हजारो महिलांना डोळ्यांच्या इन्फेक्शन चा सामना करावा लागतो तो त्यांच्या रेगुलर वापरातल्या कॉस्मेटिक प्रोडक्ट मुळे. अतिशय रेअर कंडिशन मध्ये हे सर्व प्रोडक्ट अंशतः किंवा कायमचे आंधळेपण येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

bacteria on eyelashes

नॉर्मली पापण्यांवर बॅक्टेरिया असतात. कॉमन आढळणारे म्हणजे Propionibacterium, Corynebacterium, Streptophyta, Enhydrobacter, आणि Staphylococcus. जेव्हा आपली आय पेन्सिल किंवा मेकअप ब्रश यांच्या संपर्कात येतो तेव्हा प्रक्रिया होऊन इन्फेक्शन ची सुरुवात व्हायला लागते. जेव्हा आपण वारंवार हे प्रॉडक्ट वापरतो व ब्रश डबीत पुन्हा पुन्हा बुडवतो, त्यावेळी हे बॅक्टेरिया त्यांच्या कामाला लागतात व आपली संख्या वाढवतात आणि आपण डोळ्यांच्या इन्फेक्शन कडे ढकलले जातो किंवा आपल्याला ऍलर्जी ची सुरुवात व्हायला लागते.

पण अजून प्रोडक्टची शेल्फ लाईफ शिल्लक आहे की!

बहुतेक सगळ्या ब्रँडच्या डोळ्यांच्या मेकअप च्या प्रॉडक्टची एक्सपायरी 2 ते 3 वर्षांची असते पण प्रॉडक्ट उघडून लावायला सुरुवात केल्याच्या दुसऱ्या वेळेपासूनच कदाचित इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून, तुमचा या प्रॉडक्ट चा वापर नेमका किती आहे हे बघणं गरजेचं आहे. असं खरं तर कुठेच लिहिलेल नाही पण तुमचं काजळ, eyelinear, मस्कारा हा 3/4 महिनेच चालू शकतो अस एक्स्पर्ट म्हणतात.

सर्वात महत्वाचं आपले प्रॉडक्ट हे कोणाही बरोबर share करू नयेत. असं करणं हे धोक्यापेक्षा कमी नाही. इन्फेक्शन जसं की डोळे येणं, लाल होणे हे या प्रॉडक्टच्या शेअरिंग मधून सहज शक्य आहे. म्हणून आय मेकअप ब्रश,  मस्कारा, काजळ, आयलायनर हे प्रॉडक्ट प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असावेत.

आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे लगेच जा, जर कोणत्याही प्रकारचे छोटे वाटणारे इन्फेक्शन जसे की डोळ्यातून पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे, किंवा कोणत्याही प्रकारचे बदल डोळा व त्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर दिसल्यास.

FDA ने खालील सूचना दिलेल्या आहेत जर असं काही दिसलं तर काय करायचं यासाठी:

  1. कोणत्याही प्रकारचे बदल डोळे अथवा आजूबाजूच्या त्वचेवर दिसल्यास ताबडतोब त्या प्रोडक्ट चा वापर थांबवा आणि लगोलग डॉक्टर कडे जा.

eye infection redness

2.  डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक लावा व काढताना देखील काळजी घ्या,डोळ्यांच्या नाजूक त्वचेला किंवा डोळ्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्या.

why to remove eye makeup

3.  आपल्या डोळ्यांचा मेकअप करण्या आधी हात स्वच्छ धुऊन घ्या,तळहातावरचे बॅक्टेरिया देखील त्रासदायक होऊ शकतात.
4. जुने प्रॉडक्ट डोळ्यांच्या मेकअप साठी वापरण्याचा प्रयत्न करू नका,जर तुम्ही महिनोन् महिने प्रॉडक्ट वापरला असेल तर जुना काढून टाका व नवीन चा वापर करा.
5. तुमचे आय मेकअप चे सगळे कंटेनर धुळीपासून स्वच्छ ठेवा, ओलसर सुती कापडाने वापरण्याआधी पुसून जरूर घ्या.

how to clean makeup brushes
6. मेकअप चे ब्रश आणि वेगवेगळी उपकरणे… विशेषतः डोळ्याजवळ वापरली जाणारी स्वच्छ ठेवा शक्य असल्यास निर्जंतुक करा.

 

* डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही छोटे उपाय
1.  Meibomian glands मधून डोळ्यामध्ये ऑइलचे प्रमाण संतुलित ठेवले जाते व एक प्रकारची फिल्म डोळ्यांवर येते. वय वाढेल तसं याचं काम कमी होत जातं व डोळ्यांना एक प्रकारचा कोरडेपणा जाणवायला लागतो. कोमट पाण्याच्या घड्या ठेवल्याने हे ऑइल पुन्हा पातळ होऊन पसरायला मदत होते आणि डोळ्यांमध्ये आर्द्रता पुन्हा निर्माण होऊ शकते. गरम टॉवेल ची छोटी घडी बंद डोळ्यांवर काही वेळासाठी ठेवा, असे केल्याने डोळ्यांना आराम मिळतो व इन्फेक्शन ला दूर ठेवता येतं.

2. डोळ्यांचं संरक्षण होईल असा चष्मा/गॉगल घाला

 

wear sunglasses to protect eyes

सर्व सीजन मध्ये घराबाहेर पडताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल वापर करावा. जरी ऊन दिसत नसलं तरीही सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण म्हणून सावलीतून बाहेर येताना डोळ्यांवर गॉगल लावावा.

यु व्ही ए आणि यु व्ही बी रेडिएशन हे कधीकधी pinguecula आणि pterygia या कंडीशन साठी कारणीभूत ठरतात जे डोळ्यांच्या मधील पांढऱ्या भागातील क्लीअर पेशींना त्रास देतात याने Cornia ला देखील इजा होऊ शकते ज्यांला Keratitis म्हणले जाते.

3. आपल्या डोळ्यांच्या डॉक्टर ना दर दोन वर्षांतून किंवा गरजेची असल्यास आधीभेट द्या

eye doctor opthalmologist

18 ते 60 वर्षांच्या प्रौढांनी डोळ्याची तपासणी आपल्या डोळ्यांच्या डॉक्टर कडे जाऊन नियमित करून घेण्याची गरज असते. यामुळे डोळ्यांना कोणतीही इजा झाली असल्यास, काही त्रास होत असल्यास लगेच त्याचं निदान होऊ शकतं, जसं की Glaucoma, ज्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो, जर त्याकडे वेळेत लक्ष दिलं गेलं नाही. जितक्या लवकर निदान तितक्या लवकर औषध उपचार मिळणं गरजेचं आहे. ज्या लोकांच्या कुटुंबात अशा प्रकारची हिस्ट्री आहे त्यांनी तर ही काळजी नक्कीच घ्यावी.

4. घरामध्ये दुरुस्तीचे काम करताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी संरक्षक साधनांचा वापर करावा

eye safety glasses

घरातले छोटे-मोठे दुरुस्तीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, काम करणाऱ्या व्यक्ती या व्यावसायिक असोत वा नसोत. भिंती मध्ये खिळा ठोकताना जरी चुकला तरी काही कण उडून डोळ्यांना इजा होऊ शकते, म्हणून डोळ्यांचे संरक्षण होईल असे साधन वापरावे.

आम्हाला वाटतं की हा लेख आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी साध्या व सोप्या पद्धतीने कशी घेता येईल याबद्दल मार्गदर्शक ठरेल. तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे मेकअप प्रोडक्ट निवडताना देखील मदत होईल व डोळ्यांची काळजी घेताना देखील.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा. काही सुचवायचे असेल तर जरूर सुचवा.
आम्हाला आवडेलच आपल्याकडून ऐकायला…

TAGS: