प्रौढ वयातील त्वचेची काळजी कशी घ्याल?

आपल्याला कायमच सुंदर दिसावं असं वाटतं आणि ते चुकीचं ही नाही. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसंतसं ते आपल्या चेहऱ्यावर देखील दिसू लागतं. कपाळावर नव्याने दिसू लागलेल्या रेषा, चेहऱ्यावर तयार व्हायला लागणाऱ्या सुरकुत्या आपल्याला अस्वस्थ करतात आणि जाणीव करून देतात की आता मी बदलते आहे. पण आपली दिनचर्या आपण पद्धतशीरपणे सांभाळली आणि त्वचेची काळजी घ्यायला पुरेसा वेळ दिला तर प्रौढ वयातही आपली त्वचा तजेलदार दिसेल यासाठी काय करता येईल.

नेहमी आपण त्वचेची काळजी घेतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेची काळजी करावी लागेल आणि त्याची सुरुवात होते योग्य प्रकारचे उत्पादन निवडण्यापासून... याच बरोबर यापूर्वी आपण ज्या cleanse, tone, moisturize अशा तंत्रांचा वापर करत होतो तीच तंत्रे आपल्याला थोडी निराळ्या पद्धतीने हाताळावी लागतील. या लेखात आपण प्रौढ वयातील त्वचेची काळजी कशी घ्यायची हे पाहणार आहोत.

कोकमाचे तूप-

तुम्ही कोकमाचे झाड पाहिले असेल. कोकम फळातील गर बाजूला काढून त्याच्या बियांपासून हे तूप तयार केले जाते. सामान्य तापमानाला ते गोठलेले असते पण थोडे तापविले की ते वितळू लागते. जुन्या काळी कोकण परिसरात राहत असलेल्या वृद्ध महिला हिवाळ्यात ओठांना पडलेल्या भेगा, तळव्यांच्या भेगा, गुडघे आणि कोपर अशा अवयवांना हे तूप लावत असत.आजही कोकणात आपल्याला ही पद्धत दिसून येते. कोकम खडा गरम करून त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ होते हे जुन्या काळापासून कोकणातील स्थानिक लोकांना माहिती आहे पण आता नव्या काळात सौंदर्य प्रसाधन निर्मितीत देखील या कोकम तुपाचे गुणधर्म वापरले जाऊ लागले आहेत.
त्वचेवरील पेशी नव्याने तयार करण्याचे गुणधर्म या विशिष्ट तुपात असतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हायला आपोआप मदत होते आणि त्वचेचा टवटवीतपणा टिकून राहतो.

गाईचे तूप-

आपल्या लहानपणापासून आपल्याला गाईच्या दुधाचे, तुपाचे महत्व माहिती असतेच पण ते शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने.. आयुर्वेदाने गाईच्या तुपातील औषधी गुणधर्मांचे महत्व जगासमोर मांडले आहेच,. हेच गाईचे तूप आपल्या त्वचेची काळजीही उत्तम प्रकारे घेते.
कोरडी पडलेली आणि भेगाळलेली त्वचा असेल तर तिला मऊपणा आणि तजेला देण्यासाठी तूप हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. तुपामध्ये मेदयुक्त घटक असतात जे यासाठी उपयोगी असतात. हे घटक त्वचेच्या अगदी खोल जाऊन प्रत्येक थरावर काम करतात. सौंदर्य प्रसाधनात तुपाचा उपयोग केलेला असेल तर अन्य उपयुक्त घटकद्रव्ये तुपाच्या माध्यमातून त्वचेच्या मुळाशी पोहोचण्यासाठी मदत होते. या विशिष्ठ गुणधर्मामुळे त्वचेला पडणाऱ्या सुरकुत्या रोखणे किंवा कमी करणे या प्रक्रियेत गाईच्या शुद्ध तुपाचा महत्वाचा सहभाग असतो. रात्री झोपण्यापूर्वी गाईचे तूप डोळ्यांच्या भोवती हलकेच लावले तर त्यामुळे डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे, सुजल्यासारखे दिसणे, सुरकुत्या या गोष्टी नियंत्रणात रहायला मदत होते.

कोरफड

त्वचेवरील पांढऱ्या पेशींमधील प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी कोरफडीचा गर अथवा रस उपयोगी ठरतो. त्वचेवरील अनावश्यक रेषा, भेगा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आश्चर्यकारक रित्या कोरफड काम करते आणि त्वचेला आवश्यक घट्टपणा देवून त्वचा सैल पडण्यापासून रोखते.
कोरफड हे एक उत्तम moisturizer आहे. यातील घटकद्रव्ये हवेतील ओलावा किंवा बाष्प शोषून घेतात आणि आपल्या त्वचेला ओलसरपणा देतात. सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या त्वचेची काळजी घेण्याचे कामही हे घटक पार पाडतात. घराबाहेर पडण्यापूर्वी कोरफड गर किंवा रस चेहऱ्यावर लावल्यास UVA,UVB किरणांच्या प्रखरतेपासून आपल्या नाजूक त्वचेचे रक्षण होवू शकते.

संत्र्यांच्या सालीचे तेल-

व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असलेले संत्र्यांच्या सालीचे तेल चेहऱ्याला हलकेपणा देते. चेहऱ्यावरील अनावश्यक काळे डाग, पुरळ, मुरुमे यावर हे गुणकारी आहे. अन्य औषधी तेलांमध्ये हे तेल मिसळल्यास आणि त्याने चेहऱ्याला हलकेच मालिश केल्यास त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि ताण कमी होतो.

Vitamin E

व्हिटॅमिन ई मुळे त्वचेच्या आतील पेशींची प्रतिकारक्षमता वाढते.त्वचेला जर काही इजा झाली असेल वा नुकसान पोहोचले असेल तर त्यावर चांगल्याप्रकारे काम करण्याची क्षमता यामधे आहे.अतितीव्र सूर्यकिरणांपासूनही हे त्वचेचे संरक्षण करते.

डाळिंबाच्या बियांचे तेल-

ओमेगा ५ याचा भरपूर साठा असणारे हे तेल आहे.त्वचेला ज्या दाहकतेचा त्रास होतो त्यापासून त्वेचाला सांभाळणारे घटक या तेलामधे पुरेपूर असतात.ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या इ.पासून त्वचेचे रक्षण होते आणि त्वचेवरील प्रौढत्वाच्या खुणा तुलनेने कमी होतात.त्वचेवरील रंध्रे मोकळी करण्यासाठीही या तेलाचा उपयोग होतो.तुम्ही हे तेल आहे त्याच स्वरूपात वापरू शकता किंवा त्याचा वापर ज्यात केलेला आहे अशा सौंदर्यवर्धक उत्पादनांचाही वापर गुणकारी ठरतो.

बरवा उत्पादनांच्या मालिकेतही तुम्हाला Mango Butter Moisturizer आणि Antioxidant Pomegranate Body Lotion ही दोन उत्पादने उपलब्ध आहेत ज्यात डाळिंबाच्या बियांचा रस आवर्जून वापरलेला आहे.