बांबू-घराचं अंगण आणि त्वचेचं सुरक्षा कोंदण?

चकित झालात ना? बरोबर आहे! बांबू म्हटलं की पटकन् नजरेसमोर येतं घराचं अंगण नाहीतर घराचं सुशोभन! बांबूच्या हिरव्या पिवळ्या रंगाच्या छटा,मोहवून टाकणारी त्याची पानं अशा डौलाचं हे झाड आपल्या अंगण परसाचं सौंदर्य खुलवतं. हाच बांबू घरांची बांधणी,पांडा या प्राण्याचं अन्न,बांबूच्या कलात्मक वस्तू अशा वेगवेगळ्या रूपात नजरेसमोर तरळून जातो.
हाच बांबू तुमच्या त्वचेला सौंदर्याचं कोंदण देणार असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका हं!या लेखात आपण समजून घेणार आहोत Exfoliatorकिंवा Face Scrub या रूपात बांबूचे गुणधर्म त्यातील सिलिकाच्या किमयेतून आपली त्वचा टवटवीत आणि तजेलदार कशी करेल?

बांबूतील घटक त्वचेची काळजी कशी घेतात?

बांबूच्या मुळांमधून सिलिकाचे कण काळजीपूर्वक अलग केले जातात यालाच Bambusa Arundinacea असं म्हटलं जातं.याचं रूपांतरण सफेद पिवळसर रंगाच्या अगदी सूक्ष्म कणांमधे केले जाते आणि त्याचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो.सौंदर्य उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेत हे सूक्ष्म कण अगदी सहजपणे विरघळून जातात,एकरस होतात त्यामुळे त्यांचा उपयोग करणं सोपं होतं.जगाच्या कानाकोपर्‍यातील काही ठिकाणी तर पौष्टीक पाककृतींमधे या चूर्णाचा वापर केला जातो जेणेकरून सिलिकाचे औषधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात.असे बांबूच्या मुळातून निघालेले सिलिका कण हे शरीराला फायदेशीर एक खनिजद्रव्य मानले जाते.

त्वचेच्या काळजीसाठी बांबूचा वापर-

बांबूतील पोषक असे हे कण अलगदपणे त्वचेवर घासले जातात आणि त्वचेवरील अशुद्धी काढून टाकतात.त्वचेचा पोत कायम ठेवण्यासाठीही त्यांची मदत होते कारण त्वचेवरील पेशीच्या मुळापर्यंत जाऊन हे कण तिथपर्यंत प्राणवायू पोहोचवतात.त्यांच्या सूक्ष्म आकारामुळे ते द्रवपदार्थात फार चटकन् एकजीव होतात आणि त्यामुळे त्वचेवर आवश्यक तो ओलावाही टिकून रहायला मदत होते.त्वचेवर कोणत्याही प्रकारचा कोरडेपणा वा ओरखडा न उमटू देफात हे कण त्वचेची स्वच्छता करतात. बांबूचे हे औषधी कण ज्यात वापरले गेले आहेत अशा सौंदर्य प्रसाधनांच्या नियमित वापरामुळे तुमची त्वचा चकचकीत आणि लखलखीत दिसेल.उजळलेली दिसेल.



बांबू कणांमधे असलेल्या सिलिकामुळे पुढील फायदे होतात-
त्वचेवरील हायड्रोक्सालिटन जैव उत्प्रेरकांना कार्यान्वित करणे
पांढर्‍या पेशींमधील घटकद्रव्यांचे संश्लेषण करणे
त्वचेवर येणार्‍या सुरकुत्या आणि पुरळ यांचे नियंत्रण करणे
त्वचेची लवचिकता आणि आरोग्य वाढविणे

Exfoliation म्हणजेच त्वचा घासून स्वच्छ करण्याचे महत्व काय?

त्वचेवरील धूळ काढून टाकणे,मृत त्वचा काढून टाकणे,ब्लॅकहेडस् काढून टाकून त्वचेवयील रध्रे मोकळी व स्वच्छ करणे आणि त्वचेचा पृष्ठभाग टवटवीत करणे हे सौंदर्यसाधनेत खूप आवश्यक आहे. फेसस्कबमधे असलेल्या सूक्ष्म कणांमुळे हलकेच घर्षण होऊन विनाइजा तुमची त्वचा स्वच्छ होते. ब्युटी पार्लरमधे केल्या जाणार्‍या विविध फेशियल्समधे ही कृती म्हणूनच केली जाते ज्यामुळे त्वचेचे आरौग्य सुधारायला मदत होते. तरूणाईतील नव्हे तर सर्वच वयातील महिलांसाठी ही एक महत्वाची कृती आहे.
अधिक माहितीसाठी आमचा पुढील लेख जरूर वाचा.Exfoliate to Rejuvenate !Why should I use Face Scrub?

अगदी आत्तापर्यंत अक्रोडाच्या सालाचे चूर्ण फेस स्क्रब किंवा Exfoliater मधे हमखास वापरले जात असे.पण हळूहळू लक्षात यायला लागलं की अशा उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे फायदा होण्यापेक्षा उलट त्वचेला हानीच पोहोचते आहे,इजा होते आहे.अति अनावश्यक घर्षणामुळे चेहर्‍याच्या पृषष्ठभागावरील मुलायमपणा निघून जाऊन त्वचा रूक्ष,कोरडी बनत जाते. तिथे संसर्ग पोहोचू शकतो.यामुळेच सौदर्य प्रसाधन उत्पादक जेव्हा पर्याय शोधू लागले तेव्हा त्यांना बांबूमधील सिलिका कणांचा समाधानकारक उपयुक्त पर्याय सापडला.याचजोडीने शर्करा,बदामाचे चूर्ण,जोजोबाच्या बिया यांचा वापर केल्यानेही फेसस्क्रब मधे त्वचेचे घर्षण अलगद करण्याची क्षमता वाढते ज्यामुळे त्वचा बहारदार दिसते.

आमच्या नव्याने उत्पादित Bamboo Exfoliatorचा वापर तुम्ही करुन पाहिला आहे नं? काय? नाही अजून? अहो मग लगेच वापरून पहाच! गाईचं शद्ध तूप,जोजोबा तैल,लिंबाचे तेल अशा नैसर्गिक गोष्टींनी सजलेले आमचे Exfoliator तुमचीही त्वचा सजवेल,उजळवेल. शेवटचं नाही पण तरीही आणि महत्वाचं. सुरक्षित रहा,सुंदर दिसा!