Bol Barva WIth Ninad Shukla Part 2

जन्मतः अंधत्व असलेला एक मुलगा, अंध असला तरी त्याला गाण्याचा कान आहे, त्याला ताल उत्तम कळतो, हे लक्षात आल्यावर आईवडिलांनी पुढाकार घेऊन त्याला गाणं शिकवायला सुरुवात केली आणि हळूहळू जन्म होत गेला एका बहारदार गायकाचा.

गाण्यातला कोणताच प्रकार त्याला वर्ज नाही.भावगीत, भक्तिगीत,अभंग किंवा रागदारी. याचा संचार सर्वत्र सुरू आहे. गुरुंचे उत्तम मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्यावर ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’ झालं आहे.

निनाद शुक्ल – आधी नाशिक आता पुणे. भेटूया या सुरेल आवाजाच्या गायकाला,ज्याच्या दिव्याखाली अंधार आहे… पण जो आपल्या प्रतिभेच्या मशालीने मैफिलीचा आसमंत उजळून टाकतो आहे.

बोल बरवाच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता.

He may have been born without eyesight, but he has always been blessed with vision! Since a very young age, Ninad Shukla was blessed with the talent of music. His parents realized this and enrolled him for music lessons. From then on, he became a very talented & renouned vocalist & pursued various forms of music – bhaavgeet, bhakti geet, abhanga, raagdari. Sky is the limit!

Let us meet this storehouse of talent who spreads the divine light of music & inspiration wherever he goes. Join us in conversation with Ninad & get to know his story, his journey, in the upcoming episode of Bol Barva, this Saturday, 18th June, at 11:00 am on Facebook.com/Barvaskintherapie