Bol Ayurveda

पंचामृत – आयुर्वेद नुसार त्वचेची काळजी घेण्याकरिता सर्वात महत्वाची ट्रीटमेंट – बोल आयुर्वेद, बरवा

आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेली ,त्वचेची काळजी घेण्याच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची अशी कोणती स्किन केअर ट्रीटमेंट आहे?पंचामृत… हा भारतीय संस्कृती आणि परंपरा मधील एक महत्त्वाचा घटक पदार्थ आहे. दूध,दही,तूप,मध आणि साखर. देवांना दाखवला जाणारा नैवेद्य आणि आपल्याला प्रसाद म्हणून दिला जाणारा पदार्थ. देवांकडून आलेले दैवी अमृतच जसं.तुपामध्ये असलेल्या स्निग्धते मुळे शरीरा मधील आर्द्रता पुन्हा आणण्यामध्ये,टिकवून ठेवण्यामध्ये, त्वचा मऊ करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे.पंचामृत हा आपली पचनसंस्था उत्तम होण्यासाठी तसेच मेंदूसाठी उत्तम टॉनिक म्हणून देखील काम करतो. वात आणि पित्त हे दोन दोष निवारण्यासाठी पंचामृताचा मोठा उपयोग होतो. असे दैवी गुणधर्म असणारा पदार्थ हा आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील अमृतच, पंचामृत .ज्या पाच घटकांपासून हे बनवलं जातं ते सर्व पदार्थ आपल्या त्वचेसाठी उत्तम असतातच , पण सगळे पाच पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची काम करण्याची ताकद अजूनच वाढते. ते त्वचेला मॉइश्चराइझ करतात, मऊ करतात,तारुण्य पुन्हा मिळवून देतात. त्वचेला पुनरुज्जीवन देतात.पंचामृत हे कोरड्या आणि रुक्ष त्वचेसाठी उत्तम तर आहेच, पण सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील त्याचा उत्तम उपयोग होतो.आम्लधर्मी आणि स्निग्ध असे दोन्ही गुणधर्म एकत्र असल्यामुळे कोरडी त्वचा मिनिटात गायब होते आणि आपल्याला मिळू शकते मऊ, मृदू, मुलायम त्वचा. कोणत्याही प्रकारचे चॉकलेटी-काळे ठिपके, पिगमेंटेशन,सुरकुत्या नसलेली, तजेलदार त्वचा उत्तम पोत असणारी आणि चमकदार त्वचेसाठी “पंचामृत फेशियल” नक्की ट्राय करून बघा!

आयुर्वेद नुसार तुपाचे फायदे – बोल आयुर्वेद, बरवा

दुधाचा एक महत्वाचा उपपदार्थ ‘तूप’ हा देखील आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये तुपाचा वापर असावा, कारण तूप हे शरीरासाठी उपयुक्त आहे असं आयुर्वेद आपल्याला सांगतो.पोषण आणि ताकद देणे. शरीराची होणारी झीज भरून काढणे. शरीराला थंडावा देणे आणि शरीराचे संतुलन सांभाळणे हे तूप तुमच्यासाठी करू शकतं.तूप हे मेंदूसाठी उत्तम औषध आहे, जे बुद्धी वाढवणे आणि मेंदूची ताकद वाढवणे यासाठी काम करतं. डोळे आणि त्वचेसाठी अमृतच जणु.तुपामध्ये असलेल्या स्निग्धते मुळे शरीरा मधील आर्द्रता पुन्हा आणण्यामध्ये,टिकवून ठेवण्यामध्ये, त्वचा मऊ करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
त्वचेवरील बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होण्यासाठी तुपाचा वापर गरजेचा आहे. त्वचेवरील व्रण भरून येणे, त्वचेचा कोरडेपणा-रुक्षपणा कमी होणे यासाठी तूप हे गरजेचे आहे. तुपामध्ये तारुण्य टिकवण्याचे गुणधर्म तर आहेतच, पण तुमच्याओठांसाठी आणि डोळ्यांच्या आजुबाजूच्या नाजूक त्वचेसाठी उत्तम आहे.त्वचेमधील आर्द्रता टिकवून ठेवणारा म्हणून तुपाचे महत्त्व मोठे आहे. तुपाने मसाज केल्यामुळे त्वचा जास्त काळ मऊ व टवटवीत राहते.इतर आयुर्वेदिक घटकांसोबत, औषधी घटकांसोबत जेव्हा तुपाचा वापर होतो तेव्हा ते आपल्या त्वचेसाठी गुणकारी ठरते.शतावरी,जेष्ठमध, मुलेठी आणि हळद इत्यादी औषधी घटकांबरोबर तुपाचा वापर केल्यास त्वचेचा पोत, रंग आणि टोन सुधारण्यामध्ये उपयोगच होतो.त्वचेचा वेगवेगळ्या आजारांमध्ये किंवा उपचारांमध्ये तुपासोबत करंज आणि कडुनिंब हे दोन्ही घटकांचा वापर केला जातो. कोरड्या आणि रुक्ष त्वचेवर सुटणारी खाज, चट्टे उठणे, आणि त्वचा फाटणे यावर वरून हे औषधी घटक लावल्यास अराम मिळतो .

दूध व दूधाचे फायदे आरोग्य व सौंदर्य वाढविण्या करता – बोल आयुर्वेद, बरवा स्किन थेरपी

नैसर्गिक, पूर्णान्न, शरीरासाठी आरोग्यपूर्ण घटका युक्त, सौंदर्य वाढवणारा साधा सोपा घटक , सांगता येईल कोणता आहे?दूध… दूध हे पूर्णान्न आहे. शरीरासाठी पोषक, दोष निवारक, ताकत वाढवणारं आणि अत्यंत गुणकारी असं. जसं शरीराच्या आत घेण्यासाठी उत्तम तसंच शरीराच्या बाहेर वापरण्यासाठी देखील. त्वचेला उत्तम टॉनिकच.त्वचा हे एक स्पर्शनेंद्रीय आहे. स्पर्शनेंद्रियाचा आणि “वाता” चा खूप जवळचा संबंध आहे. दूध हे वातशामक आणि स्निग्ध असल्यामुळे त्वचेसाठी खूपच हितकारक आहे. त्वचेचे संरक्षण करणारे जे काही घटक आहेत जसे विटामिन ए, विटामिन डी लॅक्टिक असिड आणि बाकीचे काही विटामिन्स आणि प्रोटिन्स ही देखील आपल्याला दुधातून मिळतात विटामिन ए हे कोलिजन ची निर्मिती वाढवण्यासाठी मदत करते. दुधातील व्हिटॅमिन A मध्ये असलेला रेटिनॉल हा घटक उत्तम अँटी एजिंग म्हणून काम करतो. विटामिन डी हा एक उत्तम

साखरेनी मिळवा सुंदर त्वचा – साखर युक्त फेस पॅक व एक्सफॉलिएटर – बोल आयुर्वेद, बरवा

नैसर्गिक, पूर्णान्न, शरीरासाठी आरोग्यपूर्ण घटका युक्त, सौंदर्य वाढवणारा साधा सोपा घटक , सांगता येईल कोणता आहे?दूध… दूध हे पूर्णान्न आहे. शरीरासाठी पोषक, दोष निवारक, ताकत वाढवणारं आणि अत्यंत गुणकारी असं. जसं शरीराच्या आत घेण्यासाठी उत्तम तसंच शरीराच्या बाहेर वापरण्यासाठी देखील. त्वचेला उत्तम टॉनिकच.त्वचा हे एक स्पर्शनेंद्रीय आहे. स्पर्शनेंद्रियाचा आणि “वाता” चा खूप जवळचा संबंध आहे. दूध हे वातशामक आणि स्निग्ध असल्यामुळे त्वचेसाठी खूपच हितकारक आहे. त्वचेचे संरक्षण करणारे जे काही घटक आहेत जसे विटामिन ए, विटामिन डी लॅक्टिक असिड आणि बाकीचे काही विटामिन्स आणि प्रोटिन्स ही देखील आपल्याला दुधातून मिळतात विटामिन ए हे कोलिजन ची निर्मिती वाढवण्यासाठी मदत करते. दुधातील व्हिटॅमिन A मध्ये असलेला रेटिनॉल हा घटक उत्तम अँटी एजिंग म्हणून काम करतो. विटामिन डी हा एक उत्तम

आयुर्वेद नुसार दह्याचे त्वचेसाठी फायदे – बोल आयुर्वेद, बरवा स्किन थेरपी

दूध आणि दुधाचे उपपदार्थ यामध्ये दही हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण आता बघुया आयुर्वेद कोणत्या प्रकारे दही हे त्वचेसाठी उत्तम आहे असे सांगतो. दुधातले सर्व गुणकारी घटक हे आपल्याला दह्यामध्ये देखील मिळतात. लॅक्‍टिक ऍसिड कॅल्शिअम, प्रोटीन आणि विटामिन डी हे दह्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.दूध तसेच दही देखील रुक्ष आणि कोरड्या त्वचेसाठी अमृत आहे. हलक्या सुरकुत्या,निस्तेज निर्जीव त्वचा ही दह्याच्या वापराने पुन्हा ताजीतावानी रसरशीत दिसू लागते.
दह्यामध्ये असणारे आम्लधर्मी गुणधर्म हे त्वचा उजळ होण्यासाठी उपयोगी पडतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे येणारा काळपटपणा,काळे डाग,या वरती दही उत्तम उपाय आहे. दही वेगवेगळ्या औषधी घटकांबरोबर मिश्रण केल्यास त्वचेसाठी उत्तमच ठरते.दही आणि कच्च्या बटाट्याचा रस हा उत्तम de-tanning फेसपॅक म्हणून काम करतो. दही आणि लिंबाचा रस हा त्वचेची बंद झालेली रंध्रे मोकळी करून त्वचा स्वच्छ करतो आणि एक अँटिऑक्सिडंट इफेक्ट त्वचेला देतो.भारतीयांच्या घरात कायमच वापरला गेलेला, सगळ्यात सोपा face पॅक म्हणजे बेसन किंवा हरभरा डाळीचे पीठ, हळद आणि दही आहे.

पित्त प्रकृतीची लक्षणे – बोल आयुर्वेद

लालसर गोरा रंग, सुकुमार कांती आणि शीघ्रकोपी? कोणत्या प्रकारच्या प्रकृतीच्या लक्षणांमध्ये ही लक्षणे येतात? आयुर्वेदाने व्यक्तींच्या सांगितलेल्या 3 प्रकृती पैकी ही लक्षणे आहेत “पित्त प्रकृतीच्या” व्यक्तींची. अजून कोणती लक्षणे आहेत जी समजली की आपल्याला देखील आपली प्रकृती सहजपणे समजून घेता येऊ शकते. याबद्दल ची अजून सखोल माहिती घेऊ या वैद्य छाया दांडेकर यांच्याकडून आणि माहीत करून घेऊया आपली प्रकृती नेमकी कोणती हे… पित्त प्रकृतीच्या लोकांची शरीरयष्टी मध्यम असते. वर्णन उत्तम लालसर गोरा आणि कांती सुकुमार तेजस्वी असते. अंग नेहमीच थोडे उष्ण असते. डोळे तांबूस पिंगट रंगाचे असतात तसेच केसांचा रंग देखील काळाभोर नसून पिंगट असतो. बुद्धी स्मृती आकलनशक्‍ती उत्तम असते.
स्वभाव शार्प ,शूर ,मदत करण्यास नेहमी तयार असा असतो. यांना भूक आणि तहान फार तीव्र लागते आणि सहन ही होत नाही. तसेच राग ही पार पटकन आणि तीव्र येतो. यांना शीघ्रकोपी असे म्हटले जाते. ऊन आणि उष्णता यांना आवडत नाही आणि घामही जास्त येतो. शरीराचे बल आणि ताकत ही मध्यम ते चांगली असते. पित्ताचा उष्ण गुणधर्मामुळे यांना विरुद्ध म्हणजे थंड गोष्टी आवडतात. डोळ्यांना हातापायांना गार स्पर्श आवडतो. त्वचा अत्यंत सुकुमार असल्यामुळे ऊन आणि उष्णता सहन होत नाही. उष्णतेचे त्रास उष्ण ऋतूमध्ये लवकर होतात. या प्रकृतीच्या लोकांनी उन्हापासून त्वचेचे रक्षण केले पाहिजे. तसेच थंड तुपाचा, दुधाचा किंवा चंदनादी द्रव्यांचा त्वचेवर लेप करावा. यांचे केस लवकर जातात म्हणून यांनी केसांची विशेष काळजी घ्यावी. जेवणाच्या वेळा पाळाव्यात तसेच खुप तिखट उष्ण पदार्थ टाळावेत. पाणी भरपूर प्यावे म्हणजे प्रकृती चांगली राहते.

Pitta Prakriti/Pitta Dosha

People of medium build, rosy, youthful skin generally have Pitta Prakriti. Their body temperature tends to be on the higher side. Their hair and eyes are not jet-black but a lighter shade of brown. They’re intelligent and sharp, powers of comprehension are excellent. And they are brave and compassionate, always ready to lend a helping hand.They tend to get extremely hungry and thirsty often and also get very impatient when they don’t get food on time. And they get very angry, very quickly. They don’t like going out in the sun, get hot quickly and sweat copiously. So they prefer the opposite of all things hot – cooling sandalwood, cold milk or ghee always help.

Madhuchistha or Propolis – A Miracle Anti-Aging Ingredient

We are thrilled to announce that our new anti-ageing cream is out! The Skin Nectar has one amazing ingredient called Propolis. Propolis is not a very common ingredient in skincare products and we actually found just a few American and European brands that were using this ingredient during our research around propolis. However, our very own Dr. Chhaya told us that Propolis is a well-known Ayurvedic ingredient and has been used for centuries in Ayurvedic preparations! Along with honey, we also obtain Propolis from the comb of honeybees. Propolis has tremendous healing properties and is often used as treatment for fractures as it helps fuse bones back together. It also has soothing and cooling properties that help heal burnt skin. It’s extremely stable with strong anti-bacterial, anti-fungal, anti-viral, anti-oxidant properties. Hence it is used in many creams, ointments and lotions.

मधाचे औषधी गुणधर्म – आयुर्वेद शास्त्रानुसार

मध हा खरतर वनस्पतिजन्य पदार्थ आहे, परंतु तो आपल्याला मिळतो ते मधमाशी या किटका मार्फत. म्हणून तो वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य असा दोन्ही प्रकारचा आहे. आयुर्वेद शास्त्रांमध्ये मधाचे आठ प्रकार सांगितले आहेत. हे आठ प्रकार ज्या प्रजातीच्या मधमाशा मध गोळा करतात त्यांचा प्रकारावरून पडले आहेत. मधामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत.१. मध हा कफ आणि पित्त कमी करतो.२. घशाला, आवाजला उत्तम असा आहे. कफ, खोकला, दम लागणे अशा अनेक विकारांवर मध उपयोगी पडतो.

प्रोपोलिस किंवा मधूच्छिष्ट – स्किन केअर प्रॉडक्ट्स मध्ये सहसा न आढळणारा एक इन्ग्रेडिएंट

स्किन केअर प्रॉडक्ट्स मध्ये सहसा न आढळणारा एक इन्ग्रेडिएंट आहे. तो म्हणजे प्रोपोलिस किंवा मधूच्छिष्ट . आयुर्वेदशास्त्रामध्ये याच्या गुणधर्मांबद्दल माहिती लिहिलेली आढळते. म्हणून बरवाच्या नवीन अँटी-एजिंग क्रीम मध्ये या वैशिष्ठ्यपूर्ण घटकाचा वापर आम्ही रिसर्च नंतर केला आहे.शेकडो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदात सुद्धा या amazing ingredient चा वापर सांगितला आहे. तो कसा ते ऐकुया डॉ. छाया कडून….मधमाशांच्या पोळ्यापासून मधा बरोबरच मेण किंवा मधूच्छिष्ट हा प्रकार आपल्याला मिळतो. जखमा भरून आणण्याचा उत्तम गुणधर्म त्यामध्ये आहे. या हीलिंग गुणधर्मामुळे ते अस्थी भग्न म्हणजेच बोनफ्रॅक्चर मध्ये हाड जुळवून आणण्यासाठी खूप उपयोगी पडते.
त्याच्या मृदू आणि शीत गुणांमुळेच ते अनेक त्वचाविकारांवर देखील खूप उपयोगी आहे. भाजलेल्या त्वचेवर याचा लेप करण्याने अत्यंत उपयोग होतो. मधूच्छिष्ट हे अँटिऑक्सिडंट अँटिबॅक्टरियल अँटिव्हायरल अँटिफंगल अँटि कॅन्सरस अशा गुणधर्मांचे आहेत. म्हणूनच या मधूच्छिष्टचा वापर मलमे, लोशन, क्रीम बनवण्याकरता केला जातो.बरवाचे नवीन स्किन नेक्टर जरूर वापरून पहा. यात मधूच्छिष्ट किंवा प्रोपोलिस बरोबर अजून ३ सुंदर ingredients आहेत. Niacinamide or Vitamin B3, Haluronic Acid आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं गाईचं शुद्ध तूप.

Medicinal Properties of Jaggery

Jaggery, along with honey has been used in Ayurveda as a medium to deliver particularly bitter or sour medicines.A brew of fresh ginger, dry ginger powder, lemongrass, pepper, cloves with jaggery helps alleviate cough and sore throat. Such a brew can also reduce indigestion and bloating and aid overall digestion.A combination of ginger, turmeric and jaggery along with hot water or hot milk has been the traditional home remedy for cough for ages together. Jaggery & ginger blend are great for joint pain and reducing the “vaat” dosha in the body.And of course, we can use jaggery as a substitute for sugar in our daily cup of tea. Along with fresh ginger, dry ginger powder, cinnamon, pepper this cup of tea can become our ticket to good health as it acts as a great boost for immunity.

गुळ – आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ

आजचा विषय गुळ – उसापासून बनवलेला गूळ हा साखर तयार होण्यापूर्वीचा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेक वर्षांपासून गूळ हा पौष्टिक आणि रुचकर म्हणून आपण आहारात वापरतो. तूप गुळ पोळी हे तर उत्तम पक्वान्न च आहे .विविध पौष्टिक लाडू मध्ये बलवर्धक म्हणूनही गुळ वापरतात. एकूणच गूळ हा शरीराची ताकद ,बल आणि शक्ती वाढवणारा पदार्थ आहे. नव्या गुळा पेक्षा जुना गूळ हा श्रेष्ठ गुणधर्मांचा असतो. जुन्या गुळामुळे आपली भूक म्हणजे जाठराग्नी वाढतो, गूळ गोड असल्यामुळे पित्ताला आणि वाताला कमी करतो, पचायला हलका आहे,, तसेच रक्तशुद्धी व रक्तातील दोष कमी करतो.गूळ हा तसा तीनही दोषांना शामक अशा गुणधर्मांचा आहे . वेगवेगळ्या अनुपान म्हणजे माध्यमां बरोबर दिल्याने गुळाचे वेगवेगळे गुण दिसतात .
1. आल्याच्या रसाबरोबर गूळ घेतला गेला तर तो कफ कमी होण्यास मदत करतो.
2. हरितकी किंवा हिरड्या बरोबर गूळ एकत्र घेतला गेला तर तो पित्त कमी करतो
3. सुंठी बरोबर गूळ मिश्रण करून सेवन केला तर तो वात कमी करतो. अशा प्रकारे गूळ एकच परंतु वेगवेगळ्या पदार्थांबरोबर दिला तर तो त्रिदोष शमनाचे काम उत्तम करतो.
4. चेहऱ्या करता वेगळी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या त्वचे नुसार तेल,तूप, लोणी,दूध किंवा साय चेहऱ्यावर हलके चोळून लावल्यास त्वचा मऊ राहते.

हिवाळ्यातील आहार विहार

मुळात हिवाळा किंवा थंडी हा ऋतू शरीराचे बल,ताकद नैसर्गिकरित्या वाढवणारा असतो. आपण आहार आणि विहाराची थोडी काळजी घेतली तर तब्येत उत्तम ठेवण्यासाठी थंडी हा ऋतू एकदम परफेक्ट आहे. थंडीमध्ये शरिरात आधी बाह्य म्हणजे externally नक्की काय बदल होतात ते आधी पाहू.
1. अति गारठ्यामुळे हवेला एक कोरडेपणा आलेला असतो या शीत आणि रुक्ष गुणांमुळे आपली त्वचा आणि केस देखील कोरडे होऊ लागतात. त्वचा जास्त रुक्ष झाली तर तडकते किंवा फुटते. तेव्हा आधीच आपण त्वचेची काळजी घेतली पाहिजे. तीळ-खोबरेल तेल, गायीचे तूप ,कोकम बटर ,लोणी यांपैकी काहीही त्वचेवर नियमित लावल्याने त्वचा सुरक्षित राहते.
2. सुती उबदार कपड्यांनी त्वचा झाकली गेली तर कमी फुटते.
3 ओठांसाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.गाईचे तूप,साय,कोकम बटर असे स्निग्ध पदार्थ लावल्याने ओठ मृदु राहायला मदत होते.
4. अशीच काळजी तळपायाची देखील घ्यावी लागते. तेथील त्वचा फुटू नये म्हणून कोकम बटर,तिळतेल जिरवून लावावे
5. चेहऱ्या करता वेगळी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या त्वचे नुसार तेल,तूप, लोणी,दूध किंवा साय चेहऱ्यावर हलके चोळून लावल्यास त्वचा मऊ राहते.

How to determine your Prakriti (vaata, pitta, kapha etc)?

Ayurveda speaks of a unique concept called Prakriti which could be loosely translated into English as constitution. Each of us has a unique constitution. The building blocks or doshas of our constitution are defined by Ayurveda as Vaat, Pitta and Kapha. Each one of us carries all three in unique proportions and has a significant impact on our physical, mental, emotional and character traits. There are 7 types of Prakritis defined by Ayurveda – Vaat, Pitta, Kapha, Vaat-Pittatmak, Pitta-Kaphatmak, Vaat-Kaphatmak and Tridoshaj.
Our constitution is determined by the whichever dosha is in higher proportion in our body. When all 3 doshas are in equal proportion, the constitution becomes ideal. The build, height, skin tone, behaviour, hair, eyes, skin, hunger, appetite, voice, likes & dislikes, intelligence, memory, physical and mental capacity, their usual medical complaints are generally taken into consideration while determining a person’s constitution. Ayurveda says that Pitta dosha is superior to Vata and Kapha is better than Pitta. An Ayurvedic doctor can help you determine your constitution. And once you know your constitution, you will know what is good for you, and what you need to avoid. And what can help enhance your health & overall well-being.

प्रकृती – आयुर्वेद शास्त्रामधील एक महत्त्वाची संकल्पना

व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक सुंदर म्हण आहे. आयुर्वेद शास्त्रामधील काही विशेष संकल्पना पैकी प्रकृती ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. (It’s a Unique Concept ) आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत, जसे आपण वेगळे दिसतो तशीच आपली शारीरिक आणि मानसिक जडणघडण सुद्धा वेगळी असते. तिलाच आपण प्रकृती म्हणूयात. जन्मतःच प्रत्येकाची प्रकृती ठरते. आयुर्वेद शास्त्रामध्ये साधारणपणे सात प्रकारच्या प्रकृती सांगितल्या आहेत. वातप्रकृती ,पित्त प्रकृती, कफ प्रकृती ,वात-पितात्मक ,पित्त कफत्मक, वातकफात्मक आणि त्रिदोषज प्रकृती. खरं तर आपले शरीर चालवण्यासाठी वात-पित्त-कफ हे तीनही महत्त्वाचे आधारस्तंभ आवश्यक असतात. परंतु या तीन पैकी ज्या दोषाचे पर्सेंटेज थोडे अधिक असते त्यानुसार प्रकृती ठरते.
तीनही दोषांचे समसमान परसेंटेज म्हणजे समप्रकृती ही अगदीच आदर्श अशी प्रकृती आहे. माणसाची शरीरयष्टी, उंची ,रंग ,स्वभाव, केस, डोळे, त्वचा ,भूक ,आवाज, आवडीनिवडी ,बुद्धीचा शार्पनेस ,स्मृती, शारीरिक आणि मानसिक क्षमता ,त्यांना होणाऱ्या नेहमीचा तक्रारी या सर्व घटकांचा विचार प्रकृती ठरवताना होतो. आपण एकेका दोषाच्या प्रकृतीची लक्षणे पाहूया. क्रमाने वातपेक्षा पित्त आणि पिता पेक्षा कफ प्रकृती श्रेष्ठ सांगितली आहे. या तीनही दोषांच्या लक्षणांच्या विविध कॉम्बिनेशन्स प्रमाणे माणसाच्या मिश्र दोषत्मक प्रकृती बनतात. आपली प्रकृती काय आहे हे आपण आपल्या फॅमिली वैद्यांकडून जरूर जाणून घ्यावे व त्यानुसार आपल्यासाठी काय चांगले आणि आपण काय टाळले पाहिजे याचा विचार करावा. प्रकृती जाणून घेऊन त्याचा उपयोग आपले आरोग्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपल्याला करता येईल.

Benefits of Jaggery over Sugar

Jaggery is obtained before sugar is extracted from sugarcane. It’s been used for centuries as a nutritious and tasty ingredient in cooking. Jaggery with ghee and carbs like roti is an excellent source of energy food. It helps increase the overall health, stamina and strength in the body. Aged jaggery is supposed to be better than fresh jaggery as it sharpens the appetite. Because it is so scrumptiously sweet, it is easy to digest, and aids in the body’s blood purifying processes.Jaggery can help balance all three doshas.

1. When consumed with a juice, it tones done the “kaph” dosha.
2. When mixed with haritaki or hirda it will whittle down the “pitta” dosha.
3. When blended with ginger powder, jaggery can decrease the “vaat” dosha in the body.