Bol Barva With Sneha Divekar
Posted by TEAM BARVA
स्वयंपाकाला कलेचं स्थान मिळालं याला शेकडो वर्ष उलटून गेली आहेत. समोरच्याच्या मनात शिरण्याचा सोपा रस्ता पोटातून जातो असं पूर्वी सहजच म्हटलं जायचं. या पोटात शिरण्याच्या कलेला एक आखीव रेखीव स्वरूप आलं ‘कुकिंग क्लास’ मुळे. जे आपल्याजवळ चांगलं आहे ते दुसऱ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मानवी संपर्क गरजेचा असतो,तसंच काहीसं या कुकिंग क्लासचं होतं.काळाच्या ओघात आणि टेक्नॉलॉजीच्या तडाख्यात ही संकल्पना यूट्यूब मुळे मागे पडते की काय असं वाटायला लागलं असतानाच हे देखील जाणवतं की युट्युब वर दिसणारा पदार्थ आणि आपण बनवलेला पदार्थ यात नेमकं काहीतरी वेगळ आहे.पण काय हे नेमकं समजत नाही आणि सांगणार देखील जवळपास कोणी असेल असं नाही.
18 वर्ष कुकिंग क्लास च्या माध्यमातून प्रत्यक्षात आपली कला दुसऱ्या पर्यंत पोहोचवणाऱ्या स्नेहा दिवेकर, सातारा आणि आता गेली आठ वर्षे खारघर मुंबई. भेटूया आणि जाणून घेऊया त्यांचा हा चविष्ट आणि रुचकर प्रवास नेमका आहे तरी कसा.बोल बरवाच्या येणाऱ्या आठवड्याचा भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता.
Cooking has always been considered an art – the art that paves the way to win hearts. For years, cooking classes have made it possible for people to master this art, but one may wonder, have ‘cooking classes’ lost their popularity with the advent of so many YouTube channels?
Let’s ask Sneha Divekar from Satara, who is currently based in Kharghar, Mumbai since the past 8 years. She has been running cooking classes since the past 18 years! Join us on Bol Barva this Saturday 4th June at 11:00 am on Barva Skin Therapie