बरवा स्किन थेरपी च्या सर्व प्रॉडक्ट्स मध्ये नैसर्गिक आणि नैसर्गिक पद्धतीने मिळवले जाणारे घटकच फक्त वापरलेले जातात.
Ingredients
सौंदर्य शास्त्रामध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञा (terms). ज्याबद्दल इथे आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला बरवा ब्रँडचे प्रॉडक्ट्स नेमके काय आहेत हे जाणून घ्यायला मदत होईल.
क्रुयल्टी फ्री (Cruelty Free) / प्राण्यांवर चाचण्या न घेता
क्रुयल्टी फ्री लिहिण्या मागचा अर्थच असा असतो कि यातील घटक किंवा प्रॉडक्ट बनवताना प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नसतो किंव्हा कोणत्याची प्रकारची चाचणी घेतलेली नसते.
अश्या प्रकारच्या चाचण्यांना टेस्टना शेकडो/लाखो प्राणी बळी पडत आहेत. आम्ही अश्या कोणत्याही चाचण्या करत नाही म्हणूनच आम्ही अभिमानाने सांगू शकतो कि बरवा स्किन थेरपी हा १००% क्रुयल्टी फ्री ब्रँड आहे. तूप आणि मधमाशीच्या पोळ्यातील मेण हे दोनच घटक असे आहेत जे प्राण्यांपासून मिळवले जातात.
गाईच्या दुधापासून तूप आणि मधमाशीच्या पोळ्यापासून मेण मिळवताना मधमाश्या, गायी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही.
शाकाहारी (Vegetarian)
शाकाहारी प्रॉडक्ट म्हणजे असे कि ज्यामध्ये वनस्पतीजन्य घटक असतात. अजून विस्ताराने सांगायचं झालं तर या प्रॉडक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचे प्राणिजन्य घटक जसे कि हाडांचा चुरा, चरबी, कातडी, नखं आणि बाकी शरीराचे अवयव नसतात.
हा पण नक्कीच, बरवा च्या प्रॉडक्ट्स मध्ये प्राण्यांपासून बनणारे पदार्थ जसे की तूप, क्रीम,मेण( bee wax) हे वापरले आहेत पण त्यासाठी प्राण्यांना कसलाही त्रास दिला जात नाही किंवा त्यांना मारलं जात नाही. बरवा च्या मेकअप आणि त्वचेच रक्षण करणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये तूप आणि मेण याचा वापर असल्यानेच आम्ही ‘वेगन’ आहोत अस आम्ही म्हणत नाही पण शाकाहारी नक्की म्हणतो.
नैसर्गिक घटक (Natural Ingredients)
सहज, सुंदर, निसर्गाची स्वच्छ आणि निर्मळ अनुभूती करून देणारे असे नैसर्गिक घटक जिथे कृत्रिमतेच्या कोणताही सहभाग नसतो
सेंद्रिय (Organic)
सेंद्रिय घटक हे सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीमधूनच मिळवले जातात ज्यामध्ये फक्त सेंद्रिय कीटक/बुरशी नाशकांचा आणि खताचा वापर केलेला असतो तीही अगदी पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने बनवलेली. शेतीसाठी वापरली जाणारी बी-बियाणे सुद्धा मूळ वाण असलेली वापरली जातात, हायब्रीड किंवा जनुकीय बदल केलेली नाही.
आयुर्वेदिक (Ayurvedic)
असे घटक जे आयुर्वेदिक पद्धतीने आणि ऐका पेक्षा जास्त घटकांचे संयोजन करून तयार केलेली असतात जी वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर/ रोगांवर वापरली जातात मग ते त्वचा रोग असतील किंवा केसांशी संबंधित काही त्रास असतील. या आयुर्वेदिक घटक पदार्थांच्या वापराने आपल्या त्वचेमध्ये, केसांच्या वाढीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतात आणि म्हणूनच बरवा स्किन थेरपी ची उत्पादने बनवण्यामागे ‘आयुर्वेद आधार’ हा महत्त्वाचा आहे.
बरवा मध्ये आम्ही वेगवेगळ्या आयुर्वेदिक घटक पदार्थांबरोबर काम करतो,जे तुमच्या त्वचेचं,केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मदत तर करतीलच पण तुमच्या शरीराच्या नाजूक अवयवांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा चुकीचे परिणाम तुमच्यावर होऊ देणार नाहीत.
मँगो बटर ( Mango Butter)
मँगो बटर हे आंब्याच्या बाट (कोय) मधून निघणाऱ्या कडु तेलापासून बनवल जातं. हे बटर अत्यंत मऊ आणि नाजूक त्वचेसाठी उपयुक्त असते शिवाय यामध्ये असणारे व्हिटॅमिन इ हे कोरड्या-रुक्ष तसेच सूर्याच्या उष्णतेमुळे भाजल्या गेलेल्या त्वचेसाठी वरदान ठरते.
हळद (Turmeric)
हळद हि अँटी बॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक असते म्हणूनच तिचा वापर पिंपल्स आणि acne (मोठे पस झालेले पुरळ) यांच्या ट्रीटमेंट वर वर्षानुवर्षे वापरले जाते. हळदीचा वापर त्वचेची चमक, उजाळा वाढवण्यासाठी तसेच डाग आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी हि केला जातो.
तूप (Ghee)
तुपाला देवाचे अमृत म्हटलं जाते आणि आयुर्वेदामध्ये तुपासाठी ‘सुवर्ण रस’ अशी संज्ञा वापरली जाते ती त्याच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मा मुळे. तूप हे शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य संरक्षण जसे त्वचा मऊ करून ती कोरडी होण्यापासून वाचवण्याचे काम करते. याचबरोबर याने रात्री पापण्यांखाली मसाज केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे हि कमी होतात.
कोकम बटर (Kokum butter)
कोकम बटर हा त्वचा नरम/मऊ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमधला अजून एक महत्त्वाचा घटक. त्वचा पुन्हा नव्यासारखी दिसायला लागणे या प्रक्रियेमध्ये कोकम बटर या घटकाचा महत्त्वाचा रोल आहे. नैसर्गिकरित्या त्वचेचं संरक्षण किंवा रक्षण करणे हे या घटकाचं काम आहे. हे एक उत्तम एंटीऑक्सिडेन्ट आहे जे त्वचेवरील कोरडेपणा कमी करतं, कोशिकांचे नुकसान थांबवून त्यांचे आयुर्मान वाढवते.
डाळिंब (Pomogranate)
हा घटक त्वचेची आद्रता टिकवून ठेवून तिचा कोरडेपणा कमी करण्याचे काम करतो. डाळिंबाच्या दाण्यापासून मिळवलेले तेल हे त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करून त्वचा लवचिक ठेवण्याचे मोलाचे काम करते. हे अँटिऑक्सिडेन्ट असल्याने त्वचा नेहमी ताज़ीतवानी राहण्यास मदत होते.
कोरफड (Aloe Vera)
कोरफडीला ‘देवाघरचे झाड’ किंवा ‘देवाच्या दारातील झाड’ असं इजिप्शन लोक म्हणायचे. या झाडाच्या पानांचा वापर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितला जातो. त्वचेवरील सूर्याच्या उष्णतेने भाजलेल्या खुणा कमी करण्यासाठी, त्वचेमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी, त्वचेला थंडावा देण्यासाठी, पिंपल्स किंवा मोठे दुखणारे फोड यांच्यावर देखील कोरफडीचा गर उत्तम काम करतो.
केस मऊ-मुलायम, लवचिक ठेवण्यासाठी तसेच त्यांचा काळेपणा टिकवून ठेवणे आणि दुभंगण्या पासून वाचवण्याचे काम हि करते.
बरवाच्या प्रॉडक्ट्स मध्ये वापरले जात नाहीत अश्या केमिकल्स ची यादी-
- पॅराबेन्स
- सिलिकॉन
- प्रोपोलिन
- ग्लायकॉल
- फॉर्मलडीहाईड
- मिनरल ऑइल
- सल्फेट्स
बरवाचे प्रॉडक्ट्स,त्यामध्ये वापरले जाणारे घटक आणि बनवण्याची पद्धत याबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. तुमचे प्रॉडक्ट्स १००% कृत्रिम आहेत का ?
बरवा चे काजळ हे 10% नैसर्गिक घटकांपासून आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलं जातं. कोणत्याही प्रकारचा कृत्रिम सुवास त्यात वापरला जात नाही. बाकीच्या प्रॉडक्ट मध्ये मात्र कृत्रिम सुवासांचा वापर असतो.
2. तुमचे प्रोडक्ट टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात का?
ज्या प्रॉडक्ट्स मध्ये पाण्याचा वापर होतो तिथे प्रिझर्वेटिव्ह वापरावे लागतातच. बरवाच्या प्रॉडक्ट्स मध्ये अल्कोहोल, पोटॅशिअम सोरबेट हे घटक प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात. या दोन्ही घटकांचा ऑरगॅनिक कॉस्मेटिक्स मध्ये वापरण्या साठी सरकारी एजन्सीज ने सर्टिफिकेशन केलेले असतात.
3. तुमचा ब्रँड क्रुयल्टी फ्री आहे का ? क्रुयल्टी फ्री असण्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का?
आम्ही क्रुयल्टी फ्री असण्याचे सर्टिफिकेट घेतलेले नाही पण आमचे कोणतेही प्रॉडक्ट प्राण्यांवर चाचणी केलेले नसतात, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे.
4. तुमचा ब्रँड ऑरगॅनिक आहे का ? तुम्ही ऑरगॅनिक (सेंद्रिय) घटक वापरता का?
आमचे प्रॉडक्ट्स FDA अंतर्गत सर्टिफाइड आहेत. आमच्याकडे कोणतेही नैसर्गिक अथवा ऑरगॅनिक सर्टिफिकेशन नाही. आम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक आणि नैसर्गिक रित्या मिळणारे घटकांचाच आमच्या प्रॉडक्ट मध्ये वापर करतो.
5. तुमच्या कोणत्या प्रॉडक्ट मध्ये पाम तेल आहे का ?
आम्ही आमच्या कोणत्याही प्रॉडक्ट मध्ये पाम तेल वापरत नाही. हो पण काही घटक असे आहेत जे कदाचित पाम आणि खोबरेल तेलापासून मिळवले गेले असतील. caprylic , capric , triglyceride यासारखे घटक आम्ही आम्ही थेट मिळवतो पण सप्लायर कडून आम्हाला ते कुठून मिळवतात किंवा त्याचा स्रोत याबद्दल कसलीही माहिती दिली जात नाही.
6. हे प्रॉडक्ट्स ग्लूटेन फ्री आहेत का?
होय, हे प्रॉडक्ट्स ग्लूटेन फ्री आहेत किंबवाना जिथे हे प्रॉडक्ट्स तयार केले जातात ती उत्पादन सुविधाही ग्लूटेन फ्री आहे. पण, जे घटक आम्ही वापरतो आणि जिथून ते पुरवले जातात जे प्रोसेस केले गेलेले असतात ते कदाचित ग्लूटेन फ्री नसतील.
7. तुम्ही प्रॉडक्ट पॅकेजिंग कसे करता? ती पर्यावरण अनुकूल आहे का?
आम्ही जास्तीत जास्त PET प्लास्टिक आणि polypropylene पॅकेजिंग साठी वापरतो जे प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणता येते.
8. रिसायकलिंग पॉलीसी काय आहे?
बरवा प्रॉडक्ट चे पॅकेजिंग अश्या मटेरियल पासून बनवले आहे जे सहजपणे रिसायकल होऊ शकते. बरवा कंपनी ची रिसायकलिंग पॉलीसी नसली तरी आम्ही कस्टमर्स ना सुचवू कि प्रॉडक्ट संपल्यानंतर रिकामे पॅकेजिंग रिसायकलिंग करीत द्यावे.
9. तुमच्या प्रॉडक्ट्स चे शेल्फ लाइफ किती आहे?
शेल्फ लाईफ हि उत्पादनाच्या दिवसापासून २ वर्ष्यापर्यंत आहे
10. एकदा उघडल्यानंतर किती काळ प्रॉडक्ट वापरण्यास सुरक्षित आहे ?
उघडल्यानंतर ६ महिने ते १ वर्ष
All the products offered by Barva Skin Therapie contain natural or naturally-derived ingredients and are free from the following chemicals –
- Parabens
- DEA
- Silicones
-TEA
- Propylene glycol
- Formaldehyde
- Mineral oil
- Phthalates
- SLS/SLES
- PEG
Frequently Asked Questions (FAQs) about our products, manufacturing process, ingredients.