नवीन वर्षा साठी त्वचेची काळजी घेण्याचा मंत्र
नवीन वर्षाच्या नवीन उपक्रमाची भली मोठी यादी केली असेल नाही पण त्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी आहे का ?

तुम्हाला तुमच्या त्वचे संधर्बात काही चिंता भेडसावत आहे का जे तुम्ही आहे तशी ग्राह्य धरून स्वीकारली आहे? या नवीन वर्षा मध्ये या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी काही टिप्स आपण आपल्या रोजच्या व्यस्त दिनचर्येमध्ये घालून घेऊ.

प्रत्येकाची त्वचा हि खूप वेगळी असते आणि म्हणूनच सगळ्यांनाच एकाच प्रकारची देखभाल उपयोगी पडत नाही तर वेगवेगळ्या त्वचेला वेगळ्या देखभालीची गरज असते. चला तर मग बघुया.

आपण सर्व जाणतोच, आपली त्वचा हि ३ प्रकारामध्ये मोडते; तेलकट, कोरडी आणि संमिश्र. तर पाहूया आपण या सर्व त्वचा प्रकारची काळजी कशी घेऊ शकतो आणि त्यासाठी असणारी या वर्षीसाठी संकल्पना.

तेलकट आणि पुरळयुक्त त्वचेसाठी संकल्प

oily skin

1. त्वचेची स्वछता – Cleanse
दिवसातून किमान २ वेळा चेहरा स्वच्छ करणे गरजेचे आहे त्यासाठी अश्या प्रॉडक्ट ची निवड करा जो तेलकट त्वचा आणि मुरुमे लवकर कमी करेल. खासकरून फेसयुक्त फेसवॉश ज्यामध्ये नीम, पुदिना, कोरफड, चहा पती तेल, लिंबू याचे गुणधर्म असेल जे त्वचेवरील जास्तीचे तेल नियंत्रणात तर ठेवेलच पण त्याचबरोबर मुरुमे, पुरळ, ब्लॅकहेड आणि इतर त्वचे संधर्बात उणिवाही भरून काढेल.

Refreshing Facewashnatural face wash

2. एक्सफॉलिएट (Exfoliate)
हा मुद्दा तितकाच महत्वाचा तरीही नेहमी डावललेला. त्वचेवरील मृत पेशी काढणे खूप महत्वाचे तर तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा एक्सफॉलिएट करणे खूप गरजेचे आहे. एक्सफॉलिएशन साठी बांबू च्या बारीक कणांनी बनलेले फेस स्क्रब वापरा जे वॉलनट सारख्या अपघर्षक घटकांसारखे त्वचेला हानी पोहचवत नाही. ते त्वचेवर खोल पर्यंत काम करते, त्वचेवर साचलेले इतर घटक नाहीसे करून ब्लॅकहेड आणि मुरुमे होण्यावर आळा घालते.दररोज एक्सफॉलिएट करणे हि तितकेच हानिकारक असते म्हणूनच त्वचेचा प्रकार कोणताही असो, आठवड्यातून फक्त २ च वेळा एक्सफॉलिएट करणे योग्य आहे.

Renew Bamboo Exfoliatorface scrub

3. टोनिंग (Toning)
क्लिन्सिंग आणि एक्सफॉलिएशन पाठोपाठ तुमच्या त्वचेला योग्य टोनर ची हि तितकीच गरज असते.  टोनर्स त्वचेवरील छिद्र नियंत्रणात ठेवण्याचे तसेच ती घट्ट करण्याचे काम करते जेणेकरून त्वचेवर अनावश्यक तेल जमण्यास आळा बसेल.

तुम्ही घरीही योग्य असा टोनर तयार करू शकता ज्यासाठी तुम्हाला एका स्प्रे बाटली मध्ये एक भाग कोरफडी चा जेल, ३ भाग गुलाब जल आणि अर्धा चमच्या ग्लिसरीन घ्यावे लागेल. हे सर्व छान असे मिक्स करा आणि फ्रिज मध्ये ठेऊन द्या. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही हि बाटली आपल्यासोबत पर्समध्ये घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करून झटपट असा तजेला मिळवू शकता. फ्रिज मध्ये साठवलेले हे मिश्रण १५ दिवस चालते आणि हिवाळ्यात हि वापरता येते.

4. त्वचेची आद्रता कायम ठेवणे – Moisturizing
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला तुमच्या मॉइस्चराइजर ची निवड खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. अश्या त्वचेसाठी योग्य असे नैसर्गिक बटर, कोरफड आणि संत्र्याच्या सालीचे तेल असणारे सौम्य असे मॉइस्चराइजर छान काम करेल. मॉइस्चराइजिंग  हे एक्सफॉलिएशन आणि क्लिन्सिंग नंतर ची त्वचेची आद्रता आणि  Ph चा समतोल ठेवण्यास मदत करतं.

Mango Butter Moisturizer (1)mango butter face moisturizer

 

5. उशांसाठी स्वच्छ कव्हर चा वापर  – Use Clean Pillow Cases
आपण रोज वापरणारी उशांचे कव्हर हे सातत्याने आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या सानिध्यात येत असतात आणि म्हणूनच ते प्रत्येक ३ दिवसांनी बदलणे गरजेचे आहे. आपण वापरलेले night creams, चेहऱ्यावरील तेल, केसातील कोंढा आणि त्वचेवर जमलेले इतर घटक या कव्हर वर जमले जातात. हे सर्व मग आपल्या चेहऱ्यावर पसरले जातात जेव्हा जेव्हा आपण झोपी जातो.म्हणूनच उशांचे कव्हर वेळोवेळी बदलणे हे ब्रेकआउट टाळण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

6. तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थांचे कमी सेवन – Consume Less Amounts of Oily & Fatty Foods
तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ त्वचेवरील छिद्र बंद करतात आणि sebum या घटकाचे प्रमाण हि वाढवण्याला कारणीभूत ठरतात. म्हणूनच, योग्य आहाराचे सेव्हन करणे तितकेच गरजेचे आहे जेणेकरून त्वचेमधील तेल आणि मुरुमे यावर आळा घालता येईल.

कोरड्या आणि प्रौढ त्वचेसाठी संकल्प

dry skin

1. सौम्य क्लिन्झर चा वापर – Use mild cleansers
कोरड्या आणि प्रौढ त्वचेला जास्त ओलाव्याची आणि पोषणाची गरज असते आणि ती लवकर शुष्क पडू लागते. क्लिन्झर ची निवड करताना ती अशी करा जी कोरडी त्वचा आणि संमिश्र त्वचेसाठी उपयुक्त असेल, आपली त्वचा टवटवीत करण्या बरोबरोबर ती कोरडी हि पडू देणार नाही.असा क्लिन्झर आणि फेस वॉश निवडा ज्यामध्ये कोरफडीचे गुण असतील आणि जो त्वचेचा Ph समतोल राखण्यास मदत करेल. लक्ष्यात ठेवा यांच्या वापराने त्वचा कोरडी नाही पडली पाहिजे आणि ती छान स्वच्छ हि झाली पाहिजे. दिवसातून किमान २ वेळा तरी याचा वापर जरूर करावा.

2. आठवड्यातून एकदा एक्सफॉलिएट – Exfoliate Once a Week
कोरड्या त्वचेप्रमाणेच तेलकट त्वचेलाही एक्सफॉलिएशन ची गरज असते जेणेकरून त्वचेवरील मृत पेशी आणि कोरड्या त्वचा पेशी निघून जातील ज्यासाठी फक्त खोलवर क्लीन्सिंग केल्याने च परिणाम दिसून येतो.कोरड्या आणि प्रौढ त्वचेसाठी सौम्य असा एक्सफॉलिएटर उपयुक्त आहे ज्यामध्ये बांबू चे अतिसूक्ष्म कण, गायीचे तूप आणि जोजोबा तेल असेल. बांबू चे लहान कण त्वचेवरील मृत पेशी, जमलेली घाण इत्यादी खुप सहजरित्या काढून टाकते. इतर घटक हे एक्सफॉलिएशन दरम्यान त्वचेला कमीत कमी हानी पोहचेल याची काळजी घेतं.

3. आद्रता -ओलावा टिकवून ठेवेल अश्या क्रीम चा वापर करा
कोरडेपणा आणि शरीरातील पाण्याची कमतरता याचा त्वचेवर खूप परिणाम होतो. यासाठी तुम्हाला अश्या प्रॉडक्ट ची गरज आहे जे कोरडी आणि शुष्क त्वचेवर काम करेल. मँगो बटर, कोकम बटर, गायीचे तूप आणि इतर बॉडी बटर आणि तेल हे कोरड्या त्वचेवर काम करते. शुष्कपणा घालवण्यासाठी  त्वचेला कोरफड, लिंबाचे तेल, संत्राच्या सालीचे तेल, ग्लिसरीन आणि इतर घटक खूप उपयुक्त पडतात. त्यासाठी ‘योग्य मॉइस्चराइजर कसे निवडाल’ हा आमचा लेख हि पहा.

nectar-10g-nectar-50g-image-1Nectar

4. असंपृक्त स्निग्ध आम्ले याचा आहारात समावेश – Consume Fatty Acids
बदाम, काजू, अक्रोड तसेच जवस आणि सूर्यफुलाच्या बिया हि काही स्निग्ध आम्ले युक्त आहाराची उदाहरणे आहेत जी आपली त्वचा आतून तसेच बाहेरून तजेलदार ठेवण्याचे काम करते. म्हणूनच रोजच्या जेवणात किव्हा कोशिंबीर वर पेरून आपण ते  खाऊ शकतो.

5. पोषक तेलाने शरीराची आणि चेहऱ्याची मालिश – Massage Your Face & Body with Nourishing Oils

body massage

सातत्याने केलेली तेलाची मालिश हि आरामदायक च नाही तर आपली त्वचा खोलवर पोषक कण्याचे काम करते. फक्त शरीरच नव्हे तर चेहऱ्याची मालिश करण्याची गरज असते आणि त्यासाठी बदाम तेल, ऑलिव्ह तेल, नारळाचं तेल, डाळिंबाचे तेल इत्यादी खूप उपयुक्त पडते.

महिन्यातून दोनदा आणि हिवाळ्यात वेळोवेळी चेहरा आणि शरीराची तेलाची मालिश गरजेची आहे.

6. सूर्याची अतिनील किरणे हि त्वचेसाठी घातक असतात खासकरून प्रौढ त्वचेला. UVA  आणि UVB  या किरणांमुळे  त्वचेच्या काही समस्या उदभवतात जसे काळेपणा, पिगमेंटेशन, ढीली त्वचा, सुरकुत्या. या नवीन वर्षा निमित्ताने संकल्प करा कि तुम्ही विना सनस्क्रीन क्रीम लावल्याशिवाय बाहेर पडणार नाही. घरात असल्यास हि सनस्क्रीन लावण्याचा सल्ला त्वचा शास्त्रज्ञ देताना दिसतात.

7. भरपुर पाणी प्या – Drink Plenty of Water

drink water

8. कमीतकमी ८ ग्लास पाणी पिलं गेले पाहिजे अगदी हिवाळ्यात सुद्धा जे आपल्या शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करून शरीरातील पाण्याचे आणि आद्रतेचे प्रमाण संतुलित ठेवते. शरीरातील योग्य पाण्याचे प्रमाण त्वचा चमकदार आणि टवटवीत राहण्यास मदत करते. संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा पाणी पिणे लाभदायक असते.

9. आठवड्यातून एकदा फेस मास्क चा वापर जरूर करा  – Use a Face Mask Once a Week

face mask face pack facial

फेस मास्क च्या वापराने त्वचेच्या लवचिकते  मध्ये सुधार होतो. प्रौढ आणि कोरड्या त्वचेसाठी आद्रता देणारा फेस मास्क वापरण्याची गरज असते जो चेहऱ्यावर झटपट अस पोषण आणि आद्रता देण्याचे काम करतं. असा मास्क निवडा ज्यामध्ये उटणं, गुलाब जल, मध इत्यादी घटक असतील जे त्वचेचे पोषण करण्याबरोबर तिचा पोत हि सुधारेल.

संमिश्र त्वचेसाठी संकल्प

1. pH ने बॅलन्स असे क्लिन्झर – pH Balanced Cleanser
केमिकल युक्त क्लिन्झर त्वचा कोरडी करतात खासकरून गालावरची त्वचा आणि तेलकट त्वचेमध्ये T -zone , कपाळ, नाक आणि हनुवटी  हा भाग. हि समस्या कमी करण्यासाठी फेस युक्त फेस वॉश आणि क्लिन्झर चा वापर करा ज्यामध्ये निम, पुदिना, कोरफड इत्यादींचे घटक असतील. Ph समतोल त्वचा स्वच्छ, निरोगी, तजेलदार राहण्यास मदत होते.

2. आठवड्यातून एकदा हलके एक्सफॉलिएशन – Gentle Exfoliation Once a Week
याआधी सांगितल्या प्रमाणे, तुमच्या त्वचेला सौम्य अश्या एक्सफॉलिएशन किंवा स्क्रबिंग ची गरज असते. मोट्ठे आणि जाडसर दाणे असलेला फेस मास्क किंवा क्लिन्झर जो अक्रोड, बदाम पासून बनलेला असतो तो शक्य तितका टाळा कारण असा फेस मास्क त्वचेवर खूप कठोर ठरू शकतो. त्याबदल्यात असा फेस वॉश / क्लिन्झर निवढा जो सूक्ष्म कणांनी बनलेला असेल आणि जो कमीतकमी हानी पोहचवून त्वचा स्वच्छ करेल.

SPOTLESS-PLUSnatural face scrub face exfoliator barva

 

3. दिवसा सौम्य तर रात्री जड moisturizer चा वापर  –  Light Moisturizer During the Day & Rich Moisturizer at Night
सकाळी उठल्या नंतरची आपली त्वचा हि कोरडी असते म्हणूनच कोरडी असो किंवा तेलकट, दोन्ही त्वचे साठी थोडा जड असा मॉइस्चराइजर रात्री वापरणे गरजेचे असते तर याउलट दिवसा सौम्य अश्या मॉइस्चराइजर ची.

सौम्य मॉइस्चराइजर म्हणजे असा जो त्वचेमध्ये पटकन सामावला जाईल खासकरून कोरफड, मध आणि ग्लिसरीन चा गुणधर्म असलेला. रात्रीसाठी तुम्ही असा मॉइस्चराइजर  निवडू शकता ज्यामध्ये मँगो बटर, कोकम बटर आणि गायीच्या तुपाचे गुणधर्म असतील. तो तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करून त्वचेला प्रौढ होण्यापासून हि वाचवतो.

4. आहारात फळांचा समावेश  – Consume More Fruits
फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते जे आपली त्वचा आद्र आणि टवटवीत ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या तंतुमय घटकामुळे आपल्या शरीरातील टाकाऊ घटक चांगल्या प्रकारे निघण्यास मदत होते. फळांमध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिज पदार्थांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचेचा पोत सुधारण्यास हि मदत होते.

5. कमीत कमी मेकअप चा वापर करा  – Use Lesser Makeup
त्वचेला नेहमीच जड मेकअप खाली झाकू नका, तिलाही यापासून मुक्तीची गरज असते. संकल्प करा कि यावर्षी पासून आठवड्यातून किमान एकदा तर विना मेकअप राहाल  आणि आपल्या त्वचेला छान श्वास घेऊ द्याल . त्याचबरोबर केमिकल मेकअप ऐवजी नैसर्गिक घटकांनी बनलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यावर हि भर द्या.

6. पोषक आहार घ्या –  Eat Healthy

eat healthy

हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आणि ग्रीन टी हे त्वचा निरोगी राखण्यास तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल संप्रेरकाची निर्मिती हि थांबवते. नेहमी आपल्या आहाराबाबत जागृत राहा ज्याचा फायदा लगेचच तुमच्या त्वचेवर दिसून येईल.

7. भरपुर पाणी प्या – Hydrate with Water

drink water

हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कमीतकमी ८ ग्लास पाणी दररोज पिल्याने शरीराची आद्रता कायम टिकवली जाते आणि त्याचा चांगला परिणाम हि शरीरावर लगेच तसेच त्वचेवर दिसून येतो.

तर मग आम्हाला नक्की कळवा वरीलपैकी कोणता संकल्प तुम्ही तुमच्या त्वचेच्या देखभालीसाठी अमलात आणणार आहात. शेवटी पण अति महत्वाचे, “सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि नेहमी सुंदर दिसा” नवीन वर्ष्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्या!

TAGS: