श्रावणमासी हर्ष मानसी
श्रावण म्हटलं की ऊन पाऊस अटळ.श्रावण म्हटलं की माहेराची आठवणही अटळच.
हाच ऊन पावसाचा खेळ आपल्या आयुष्यातही येत असतोच.कधी सुख,कधी दुःखं,कधी इंद्रधुष्यी स्वप्नं तर कधी काळ्या ढगांचा दाटलेलं सावट!
महिलांच्या आयुष्यात तर हे असे चढ ऊतार अधिकच येतात कारण सार्‍या घराचा ती आधारस्तंभ असते त्यामुळे तिला कोलमडून चालत नाही.ती कणखरपणे परिस्थिती सावरते कारण तिच्यामागे असते माहेरची सावली,भावाचं प्रेम आणि माया! त्यामुळेच तिचं मन झुलतं माहेरच्या हिंदोळ्यावर.
नागपंचमीला गाणी गाताना,नागोबाला पूजतानाही तिला भाऊरायाची आठवण येते.गावांमधे तर श्रावण चतुर्थीला म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी महिला खास उपवास करतात.
भावा बहिणीचं हे अतूट नातं खुलतं बहरतं श्रावण पौर्णिमेला अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी.
उधाणलेला समुद्र आणि त्याची स्थिर बहीण म्हणजे पृथ्वी.भारतीय संस्कृतीत तर चंद्रालाही भाऊ मानलं आहे.
सख्खा भाऊ नसेल तर साक्षात् देवाला म्हणजे देवघरातल्या गोपाळकृष्णाला महिला राखी बांधते! किती हृद्य आहे नाही हे नातं!
श्रावण पौर्णिमेला वैदिक काळात नव्या शालेय वर्षाची सुरुवात होत असे.म्हणून या दिवसाला "श्रावणी" असंही म्हटलं जातं बरं का!
कोळी बहिण भावांच्या समुद्रावरच्या प्रेमाला आणि आस्थेला हाच दिवस अधिक महत्वाचा असतो.जशी कोळी बांधवाची पत्नी त्याच्यासाठी प्रार्थना करते तसंच त्याची बहिणही त्याच्या रक्षणाची इच्छा सागराला सांगते.
श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
जुन्या काळी राजा हा आपल्या प्रजेचे,राज्याचे किंवा टोळीचे रक्षण करीत असे.त्यामुळे राजाचा पुरोहित किंवा मंत्री एका रेशमी कापडात अक्षता,दूर्वा,हळकुंड असं बांधून त्याची पुरचुंडी तयार करीत असे.त्या पुरचुंडीला एक रेशमी धागा बांधत असे आणि तो धागा राजाच्या उजव्या मनगटावर बांधत असे.मंत्र म्हणून राजाची मंगलकामना केली जात असे.हीच परंपरा भारतात शूरवीर पुरुषांच्या गौरवार्थ सुरु झाली,समाजात सर्वांना माहिती झाली.आता शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबात बहीण आपल्या भावाला राखी बांधते.
पुरचुंडीच्या प्राचीन राखीपासून आधुनिक काळात आपल्याला विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध होतात.दोर्‍याची,लोकरीची,रेशमाची अगदी सोन्या चांदीची राखीही बाजारात आता उपलब्ध असते.प्रत्येक बहिण आपल्याला आवडेल,जमेल त्याप्रमाणे राखी विकत घेते किंवा स्वतः तयार करते आणि आपल्या भावाला बांधते.भाऊराया लांब असेल तर त्याच्यापर्यंत वेळेवर राखी पोहोचेल अशा सुविधाही आता उपलब्ध आहेत.
सीमेवर आपल्या देशासाठी प्राणपणाने लढणार्‍या सैनिकांसाठी राखी पाठविण्याची पद्धतही गेल्या दहा पंधरा वर्षात रूढ होताना दिसते आहे.
बहिण इतक्या प्रेमाने राखी बांधते तर तिचा भावाकडून मिळालेल्या हक्काच्या भेटवस्तूवर देखील लक्ष असतं बरं का! बहिणीला देण्यासाठी विविध पर्याय आज उपलब्ध आहेतच, पण त्यासाठी बरवाच्या नैसर्गिक उत्पादनांचा विचारही भाऊराया करू शकेल.ही भेट पाहून बहिणीचं मनही प्रसन्न होईल आणि सौंदर्यही उजळेल.
बरवा टीम कडून सर्व बहिणी भावांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!