Bol Barva

Bol Barva with ✨Mrs. Sannidha tai Bhide

Bol Barva with ✨Mrs. Sannidha tai Bhide
‘बोल बरवा’ च्या आजच्या भागात आपण भेटूया, परंपरेला नवीन उजाळा आणि उठाव देणाऱ्या, पैठणी ला तिची हक्काची बाजारपेठ मिळवून देऊन कित्येक कारागिरांना आपली कला दाखवण्याची उत्तम संधी देणाऱ्या, आणि आपलीच महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी ला पुन्हा एकदा आपल्या घरांमध्ये, कार्यांमध्ये मनाचं पान देणाऱ्या…
✨सन्निधा ताई भिडे✨ याना
चला तर मग भेटूया पैठणी ला शनिवारी सकाळी ११ वाजता बरवा स्किन थेरपी च्या फेसबुक पेज वर
बोल बरवा मध्ये…

Bol Barva With Dr. Aarya Joshi

Bol Barva With Dr. Aarya Joshi
धर्मशास्त्र हे एक शास्त्र आहे त्याला कर्मकांडाचे स्वरूप न यावे यासाठी धडपड करणाऱ्या,
धर्मशास्त्रात रीतसर शिक्षण घेऊन त्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देणाऱ्या,
रोजच्या जगण्यामध्ये धर्मशास्त्राचा वेगळा अर्थ समजावून नवीन पिढीला पुन्हा एकदा त्याकडे वळून पाहायला लावणाऱ्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला,
भेटूया डॉ. आर्या जोशी यांना

Bol Barva With Sucheta Dhuri

Bol Barva With Sucheta Dhuri
निवारा या पुणे येथील सर्वात जुन्या वृद्धाश्रमाच्या व्हॉलेंटिअर्स पैकी सर्वात ” तरुण ” अनेक वृद्धांची हक्काची ताई, पाठीवरून फिरणारा मायेचा हात, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत या आजी-आजोबांची मनापासून सेवा करणारं एक सेवव्रती व्यक्तीमत्व

Bol Barva With Shobha Nakhre

Bol Barva With Shobha Nakhre
संस्कृत च्या टॉपर असूनही कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी वाहून घेतलेल्या त्यांच्या लाडक्या ताई, एक उत्तम निवेदिका, सूत्रसंचालिका, लेखिका, व्याख्यात्या, आणि राष्ट्रपती पदक विजेत्या सर्वोत्तम शिक्षिका… असं बहुआयामी व्यक्तीमत्व…

Bol Barva With Kiran Ghanekar Namjoshi

Bol Barva With Kiran Ghanekar Namjoshi
एक गृहिणी , उत्तम डान्सर , एक सजग आई , आणि ……
एक लढवय्या व्यक्तिमत्त्व जिने वयाच्या ३४ व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देऊन त्यावर यशस्वी मात केली. तिच्याशी झालेल्या गप्पांमधून, उत्तम आणि निरोगी जीवन जगताना आयुष्याकडे बघण्याच्या तिच्या आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सध्या दुर्दैवाने कॅन्सरशी लढा देणाऱ्यांना तर ऊर्जा मिळवून देण्याची कामगिरी ती पार पाडते आहे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या लोकांना देखील आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक नवीन मार्ग दाखवते आहे.

Bol Barva With Maya Pawar Mohite

Bol Barva With Maya Pawar Mohite
नमस्कार! बोल बरवाच्या या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत,
दोरीवरील मल्लखांबच्या राष्ट्रीय खेळाडू, सलग दहा वर्षे यशस्वी कारकीर्द राहिलेल्या आणि आता त्याच खेळात मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या, श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेत्या
✨माया पवार-मोहिते✨ यांच्याशी.

Bol Barva With Dr. Pratibha Jadhav Mote

Bol Barva With Dr. Pratibha Jadhav Mote
डॉ प्रतिभा जाधव – मोटे आपली सामाजिक जबाबदारी मानून कोविड च्या काळात स्वतः हुन ड्युटी स्वीकारणाऱ्या आणि पेशंट ना निरलस सेवा देणाऱ्या या व्यक्तीमत्वाकडून ऐकू या कठीण काळाला सामोरे जाताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं……!

Bol Barva With Vrushali Pandit

Bol Barva With Vrushali Pandit
एक पुण्याची मुलगी जी इंदोर ला आपली कर्मभूमी मानून इंदोर शहर आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार करण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या टीम चा एक भाग म्हणून गेली ६-७ वर्ष काम करतेय.