
नो-मेकअप मेकअप ट्रेंड
सध्या नो मेकअप मेकअप हा ट्रेंड खूपच फॉर्म मध्ये आहे, खासकरून पुरुष मंडळी आणि मॉडेल्स यांच्या मध्ये. तर आता हे असं का चालू आहे त्याचे काही बारकावे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
नो-मेकअप मेकअप लुक साठी वापरली जाणारी प्रॉडक्ट्स
1. क्लिन्झर (Cleanser)
तुमच्या त्वचेला अनुकूल असं फोम फेसवॉश आणि क्लिन्झर . कोणताही मेकअप करण्याआधी त्वचा स्वच्छ करणें खूप आवश्यक आहे ज्यामुळे त्वचेवरील तेल, अशुद्ध घटक आणि मृत पेशी काढण्यासाठी मदत होते. एक चांगलं आणि प्रभावी क्लिन्झर तुमच्या त्वचेचा Ph हि संतुलित करतं, जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. क्लिन्झर मुळे त्वच्या स्वच्छ तर होतेच, पण इतर प्रॉडक्ट्स, जसे मॉइस्चराइजर हे त्वचेमध्ये छान मुरले जाते.
2. मॉइस्चराइजर (कोरड्या आणि संमिश्र त्वचेसाठी अत्यावश्यक )
गाईचे तूप, मँगो बटर , कोकम बटर , कोरफड आणि ऑरेंज इसेन्शिअल ऑइल युक्त असं अगदी हलकं मॉइस्चराइजर नक्कीच फायद्याचे ठरेल. हे त्वचेमध्ये इतक्या लवकर शोषल जाते ज्यामुळे तुमची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसत नाही.
3. टिंटेड प्रायमर किंवा बीबी क्रीम
नो-मेकअप मेकअप मध्ये आपण फाउंडेशन आणि कंसिलर वगळू शकतो, आणि त्या ठिकाणी BB क्रीम किंवा प्रायमर चाही वापर करू शकतो, जे तुमच्या त्वचेला हलकिशी चमक देईल. Primer आणि BB क्रीम हे तुमची विसंगत त्वचा म्हणा किंवा उघडी छिद्रे आणि इतर काही त्रुटी असतील तर तेही काही प्रमाणात लपवतं, जेणेकरून तुमची त्वचा अगदी नैसर्गिक आणि खूप आवरल्या सारखी हि दिसणार नाही.
4. लिपबाम
ओठ हा चेहऱ्याच्या ठेवणीतला महत्वाचा घटक, असं का, तर अगदी काही नाही केले पण हलकिशी लिपस्टिक लावली तरी चेहरा खूप खुलून दिसतो. म्हणूनच ओठांची काळजी घेणे हि तितकीच महत्वाची गोष्ट. त्यासाठी लिपबाम खूप फायदेशीर ठरते जे ओठांना कोरडेपणा आणि फुटण्यापासून वाचवते.
नो–मेकअप मेकअप लुक कसा करायचा ?
तर नो–मेकअप मेकअप लुक साठी वेळ हि खूप कमी लागतो आणि करायला हि खूप सोपा आहे.
तुमची त्वचा कोरडी असो वा मिश्र स्वरूपाची, सुरुवात हि नेहमी मॉइस्चराइजर ने करावी लागेल. तुमचा चेहरा आणि मानेच्या भागावर ते छानसे पसरवून घ्या, आणि त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा:
1. बीबी क्रीम (BB cream) किंवा प्रायमर चे छोटे छोटे थेम्ब चेहरा आणि मानेच्या भागावर लावून ते अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर छानस पसरावा. यामुळे तुमच्या त्वचेची रंगसंगती एक व्हायला मदत तर होईलच त्याच बरोबर एक छानशी चेहऱ्यावर चमक पण येईल.
2. ओठांवर लिपबाम लावून ते २ मिनिटे राहू द्या, आणि एकदा का ते त्वचेमध्ये मुरून त्याचा परिणाम अथवा मऊपणा दिसू लागला कि टिशु पेपर ने तो पुसून काढा
3. तुमची आवडती किंवा एखादी न्याचरल न्यूड रंगाची लिपस्टिक वापरा आणि टिशु पेपर ने हलकंसं दाबून सेट करा
बस या ३ स्टेप्स जरी फॉलो केल्या किंवा अगदी लिपस्टिक जरी स्किप केली तरी तुमच्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर एक मस्त असा न्याचरल नो–मेकअप मेकअप लुक येईल.
एकंदरीत आपल्या त्वचेवरील ज्या काही त्रुटी आहेत त्याच तर खऱ्या आपल्या सौंदर्यात भर टाकतात तर का मग तिला असा त्यांना असं हेवी मेकअप आणि कंसिलर च्या लोड खाली दाबून ठेवायचे.
आशा करते तुम्हाला आमचा हा लेख आवडला आणि उपयोगी वाटला असेल, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा !
cshamika84
बीबी क्रीम कधी युझ करायचे बिफोर फाउंडेशन की आफ्टर.
आणि आफ्टर foundation normal powder or powder foundation लावायचे का?
barvaskin_admin
बरवा चं Perfect Glow Creme BB cream/primer तुम्ही फाऊंडेशन च्या आधि primer म्हणून वापरू शकता, फाऊंडेशन लाऊन त्याच्यावर लाऊ शकता festive glow करता किंवा नुस्त देखिल लाऊ शकता, त्यानी चेहऱ्यावर छान glow येते. बरवा च्या SPF Foundation ला powder नी सेट करायची गरज नाही.
cshamika84
Me tumche Glow cream, Mango butter Cream, lip balm and lipstick first time order kele. Khupch chhan product aahet. Lipstick pan superb aahe. Itake divas me ka chemical vale product use kele. Ya phudhe me kadhich dusrya konta beauty brands use karnar nahi.
Thank You Barva for Natural product.
barvaskin_admin
Thank you 🙂