नो-मेकअप मेकअप लुक कसा करायचा?
no makeup makeup look

नो-मेकअप मेकअप ट्रेंड
सध्या नो मेकअप मेकअप हा ट्रेंड खूपच फॉर्म मध्ये आहे, खासकरून पुरुष मंडळी आणि मॉडेल्स यांच्या मध्ये.  तर आता हे असं का चालू आहे त्याचे काही बारकावे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. 

no makeup makeup look

नो-मेकअप मेकअप लुक साठी वापरली जाणारी प्रॉडक्ट्स

1. क्लिन्झर (Cleanser)
तुमच्या त्वचेला अनुकूल असं फोम फेसवॉश आणि क्लिन्झर . कोणताही मेकअप करण्याआधी त्वचा स्वच्छ करणें खूप आवश्यक आहे ज्यामुळे त्वचेवरील तेल, अशुद्ध घटक आणि मृत पेशी काढण्यासाठी मदत होते. एक चांगलं आणि प्रभावी क्लिन्झर तुमच्या त्वचेचा Ph हि संतुलित करतं, जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. क्लिन्झर मुळे त्वच्या स्वच्छ तर होतेच, पण इतर प्रॉडक्ट्स, जसे मॉइस्चराइजर हे त्वचेमध्ये छान मुरले जाते.

barva facewash for oily skin

2. मॉइस्चराइजर (कोरड्या आणि संमिश्र त्वचेसाठी अत्यावश्यक )
गाईचे तूप, मँगो बटर , कोकम बटर , कोरफड आणि ऑरेंज इसेन्शिअल ऑइल युक्त असं अगदी हलकं मॉइस्चराइजर नक्कीच फायद्याचे ठरेल.  हे त्वचेमध्ये इतक्या लवकर शोषल जाते ज्यामुळे तुमची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसत नाही.

3. टिंटेड प्रायमर किंवा बीबी क्रीम 
नो-मेकअप मेकअप मध्ये आपण फाउंडेशन आणि कंसिलर वगळू शकतो, आणि त्या ठिकाणी BB क्रीम किंवा प्रायमर चाही वापर करू शकतो, जे तुमच्या त्वचेला हलकिशी चमक देईल. Primer आणि BB क्रीम हे तुमची विसंगत त्वचा म्हणा किंवा उघडी छिद्रे आणि इतर काही त्रुटी असतील तर तेही काही प्रमाणात लपवतं, जेणेकरून तुमची त्वचा अगदी नैसर्गिक आणि खूप आवरल्या सारखी हि दिसणार नाही.

tinted moisturizer, primer, BB cream

4. लिपबाम
ओठ हा चेहऱ्याच्या ठेवणीतला महत्वाचा घटक, असं का, तर अगदी काही नाही केले पण हलकिशी  लिपस्टिक लावली तरी चेहरा खूप खुलून दिसतो. म्हणूनच ओठांची काळजी घेणे हि तितकीच महत्वाची गोष्ट. त्यासाठी लिपबाम खूप फायदेशीर ठरते जे ओठांना कोरडेपणा आणि फुटण्यापासून वाचवते.

lip balm for men and women

5. लिपस्टिक (Lipstick)
नो-मेकअप मेकअप लुक मध्ये डार्क लिपस्टिक शेड किंवा टिंटेड लिपबाम वापरणे टाळा. त्याजागी न्यूड आणि न्यूट्रल शेड ना प्राधान्य द्या, किंवा टाळू हि शकता ( तुम्ही बर्वा चे Barva lipstick shades, – Rose Damask, Passion, Orchid & Natural Brown  हि  पाहू शकता).

chemical free lipstick lead free

नोमेकअप मेकअप लुक कसा करायचा ?

no makeup makeup look

तर नोमेकअप मेकअप लुक साठी वेळ हि खूप कमी लागतो आणि करायला हि खूप सोपा आहे.

तुमची त्वचा कोरडी असो वा मिश्र स्वरूपाचीसुरुवात हि नेहमी मॉइस्चराइजर ने करावी लागेलतुमचा चेहरा आणि मानेच्या भागावर ते छानसे पसरवून घ्या, आणि त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा:

1. बीबी क्रीम (BB cream) किंवा प्रायमर चे छोटे छोटे थेम्ब चेहरा आणि मानेच्या भागावर लावून ते अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर छानस पसरावा. यामुळे तुमच्या त्वचेची रंगसंगती एक व्हायला मदत तर होईलच त्याच बरोबर एक छानशी चेहऱ्यावर चमक पण येईल.

2. ओठांवर लिपबाम लावून ते २ मिनिटे राहू द्या, आणि एकदा का ते त्वचेमध्ये मुरून त्याचा परिणाम अथवा मऊपणा दिसू लागला कि टिशु पेपर ने तो पुसून काढा

3. तुमची आवडती किंवा एखादी न्याचरल न्यूड रंगाची लिपस्टिक वापरा आणि टिशु पेपर ने हलकंसं दाबून सेट करा

बस या ३ स्टेप्स जरी फॉलो केल्या किंवा अगदी लिपस्टिक जरी स्किप केली तरी तुमच्या  त्वचेवर आणि चेहऱ्यावर एक मस्त असा  न्याचरल  नोमेकअप मेकअप लुक येईल.

एकंदरीत आपल्या त्वचेवरील ज्या काही त्रुटी आहेत त्याच तर खऱ्या आपल्या सौंदर्यात भर टाकतात तर का मग तिला असा त्यांना असं हेवी मेकअप आणि कंसिलर च्या लोड खाली दाबून ठेवायचे

आशा करते तुम्हाला आमचा हा लेख आवडला आणि उपयोगी वाटला असेलकाळजी घ्या आणि सुरक्षित राहा !

TAGS: