Benefits

Barva Benefits

Click the below button to read in :

बरवाचे प्रॉडक्ट्स,त्यामध्ये वापरले जाणारे घटक आणि बनवण्याची पद्धत याबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. तुमचे प्रॉडक्ट्स १००% कृत्रिम आहेत का ?
बरवा चे काजळ हे 10% नैसर्गिक घटकांपासून आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलं जातं. कोणत्याही प्रकारचा कृत्रिम सुवास त्यात वापरला जात नाही. बाकीच्या प्रॉडक्ट मध्ये मात्र कृत्रिम सुवासांचा वापर असतो.

२. तुमचे प्रोडक्ट टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात का?
ज्या प्रॉडक्ट्स मध्ये पाण्याचा वापर होतो तिथे प्रिझर्वेटिव्ह वापरावे लागतातच. बरवाच्या प्रॉडक्ट्स मध्ये अल्कोहोल, पोटॅशिअम सोरबेट हे घटक प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात. या दोन्ही घटकांचा ऑरगॅनिक कॉस्मेटिक्स मध्ये वापरण्या साठी सरकारी एजन्सीज ने सर्टिफिकेशन केलेले असतात. 

३. तुमचा ब्रँड क्रुयल्टी फ्री आहे का ? क्रुयल्टी फ्री असण्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का?
आम्ही क्रुयल्टी फ्री असण्याचे सर्टिफिकेट घेतलेले नाही पण आमचे कोणतेही प्रॉडक्ट प्राण्यांवर चाचणी केलेले नसतात, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे.

४. तुमचा ब्रँड ऑरगॅनिक सर्टिफाइड आहे का ? तुम्ही ऑरगॅनिक इन्ग्रेडियंट/ घटक वापरता का?
बरवाची उत्पादने एफडीए म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट कडून प्रमाणित केलेले आहेत. आम्ही कोणतेही ऑरगॅनिक प्रमाणपत्र घेतलेले नाही पण आम्ही फक्त नैसर्गिक किंवा नैसर्गिकरित्या मिळवलेले घटकच वापरण्याचा प्रयत्न करतो.

५. तुमच्या प्रॉडक्ट मध्ये पाम तेलाचा वापर असतो का?
आमच्या प्रॉडक्ट मध्ये पाम तेलाचा किंवा नारळ तेलाचा वापर होत नाही पण वापरले जाणारे काही घटक मात्र पाम तेल आणि नारळाच्या तेलापासून मिळवले जातात. आम्ही शक्यतो डिरेक्टली मिळवलेले घटक वापरण्याचा प्रयत्न करतो पण सप्लायर्स कडून त्यांचा सोर्स उघड होत नाही.

६. तुमच्या प्रॉडक्ट मध्ये मीकाचा (Mica) वापर असतो का?
काही प्रॉडक्ट मध्ये मिका वापरलं जातं.

७. हे प्रॉडक्ट ग्लूटन-फ्री आहेत का?
हो, हे प्रॉडक्ट ग्लूटेन फ्री आहेत आणि आमची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ही ग्लूटन-फ्री आहे. पण बाहेरून मागवलेले घटक बनवलेली मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कदाचित ग्लूटन-फ्री नसू शकते.

८. तुमचे प्रोडक्ट तुम्ही चायना मध्ये विकता का ?
नाही.

९. तुमच्या प्रोडक्ट साठी कोणत्या प्रकारचे पॅकेजिंग वापरलं जातं ?
आम्ही पीईटी ( PET) प्लास्टिक आणि पॉलीप्रोपोलिन चे पॅकेजिंग चा वापर करतो जेणेकरून निसर्गाला हानी पोहोचणार नाही. PET हे re cycle करून पुन्हा वापरात आणले जाते. PET is recyclable.

१०. पुनः वापरासाठी(re cycling) काही विशेष योजना आहे का?
आमच्याकडे पुनः वापराची किंवा पॅकेजिंग मटेरियल ग्राहकांकडून परत घेण्याची विशेष व्यवस्था नाही कारण या प्रोसेस मध्ये ट्रान्सपोर्ट खूप वापरला जातो ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट ॲड होण्याचे प्रमाण वाढतं. या सगळ्या प्रक्रियेला लागणारा खर्च हा एकदाच वसूल केला जातो जो आम्ही करत नाही. आमचे प्रॉडक्ट्स हे ग्राहकाला परवडतील याकडेच आमचा कल असतो.

११. या सर्व उत्पादनांची टिकण्याची क्षमता (shelf life) किती आहे?
बनवल्या गेलेल्या तारखेपासून 2 वर्ष हे इतर सर्व प्रॉडक्ट साठी आणि लिपस्टिक साठी 3 वर्षांची.

१२. सामाज्याचे देणे या दृष्टीने बरवा काय करतं
- "एहसास मतिमंद मुलांचे बालगृह" सातारा, हे मानसिक आणि शारीरिक दृष्टीने विकलांग असलेल्या मुलांसाठी, सरकारी मदत न लाभलेले बालगृह आहे ज्याच्या बरोबर आम्ही गेली १० वर्ष जोडले गेलो आहोत.

- "आकार फाउंडेशन", सांगली उज्ज्वला परांजपे व त्यांच्या सक्षम सहकारी यांच्या कडून ही संस्था चालवली जाते. संस्थेबरोबर गेली तीन वर्षे आम्ही काम करतो आहोत जी दारिद्र रेषेखालील,गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रायोजकत्वासाठी काम करते. मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न बरवाने या संस्थेमार्फत केला आहे. - "सिर्फ(SIRF)" या संस्थेबरोबर गेली दोन वर्षे आम्ही जोडले गेलेले आहोत. ही संस्था शहीद सैनिकांच्या विधवा स्त्रिया,त्यांची मागे राहिलेली कुटुंबे यांचे पुनर्वसन व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करते - "स्नेहवन",आळंदी( जि पुणे) यादेखील संस्थेशी गेली दोन वर्षे आम्ही जोडले गेलेले आहोत जी गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षणाची तसेच राहण्याची सोय करते.

ऑर्डर्स, शिपिंग, डिलिव्हरी आणि रिटर्न्स संधर्बात नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्रॉडक्ट्स मागवण्या संधर्बात काही प्रश्न -
१. बरवाचे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी आम्हाला तुमचा अकाउंट उघडावा लागेल का?
अकाउंट उघडण्याचा किंवा बनवण्याचा महत्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचे डिटेल्स भरावे नाही लागणार जे खरंच एक कंटाळवाणे काम असते. एकदा अकाउंट ओपन केले कि केव्हाही लॉगिन करून प्रॉडक्ट कार्ट मध्ये किंवा शॉर्ट लिस्ट करून चेक आऊट करणे सोपे जाते.

२. आम्हाला अकाउंट कसा बनवता येईल?
वेब साईट वर "लॉगिन/रजिस्टर" वर क्लिक करा, तिथे विचारलेले डिटेल्स भरा आणि रेजिस्ट्रेशन कंप्लिट करा. तुमचे अकाउंट तयार

३. आम्ही ऑर्डर कशी करू शकतो ?
आवडलेले प्रॉडक्ट्स तुम्ही wishlist किंव्हा डायरेक्ट add to cart करू शकता आणि तिथुन चेक आऊट ची प्रोसेस पूर्ण करू शकता.

४. आम्हाला शॉपिंग कार्टमध्ये वस्तू जमा करण्यामध्ये अडथळा(प्रॉब्लेम) येतो आहे. काय करावे लागेल?
उपलब्ध असणारा कोणताही प्रॉडक्ट तुम्ही कार्ट मध्ये जमा(ऍड) करू शकता. दुसऱ्या कोणाच्या शॉपिंग कार्ट मध्ये प्रॉडक्ट असतील तर ते तुम्हाला दिसू शकत नाहीत किंवा ते तुम्ही खरेदी करू शकत नाही.

५. आम्हाला आमच्या ऑर्डर च बिल कसं देता येईल?
पेमेंट (बीप) पेयु मनी (pay u ) किंव्हा रेझर पे (Razor pay ) तसेच सर्व प्रकारचे क्रेडिट तसेच डेबिट कार्ड मास्टर कार्ड, विझा कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस कार्ड ने पेमेंट स्वीकारतो. तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा पेमेंट करू शकता.

६. आम्हाला आमची ऑर्डर थांबवता किंवा कॅन्सल करता येईल का?
ही व्यवस्था बरवा मध्ये नाही. एकदा तुमची ऑर्डर प्लेस झाली कि ती कॅन्सल करता येत नाही म्हणूनच आमचा असा सल्ला असेल कि ऑर्डर प्लेस करण्याआधी तुम्ही ती किमान दोनदा तपासून खात्री करून मगच ऑर्डर करा. आमच्याकडून काही त्रुटी राहू नये म्हणूनच हि व्यवस्था करण्यात आलेली आहे.

७. आमच्याकडे डिस्काउंट कोड आहे तो कसा वापरता येईल?
शॉपिंग कार्ट मधून चेक आऊट करण्यापूर्वी तुमच्याकडे असलेला व्हाउचर कोड मधून ऍड वर क्लिक करा. आम्हाला आमच्या सिस्टीम मध्ये व्हाउचर कोड दाखवता येत नाही. जर तुमच्याकडून की (Key) मध्ये तो घालायचा राहिला असेल तर तुमची खरेदी कन्फर्म करण्यापूर्वी कृपया हे तपासून पहा.

८. आम्हाला आमची ऑर्डर योग्य पद्धतीने दिली गेली आहे की नाही हे कसे कळेल ?
आमच्याकडून तुम्हाला एक ईमेल येईल ज्यामध्ये तुम्ही काय ऑर्डर केलेली आहे याचा पूर्ण गोषवारा असेल. तुमच्या कडून क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याचे, बिलिंग करण्याचे, आणि पत्ता व्यवस्थित असेल तर आणि तरच तुमची ऑर्डर पुढच्या प्रोसेस ला येते. तुमच्या ऑर्डरच नेमकं झालं काय आहे हे तुम्हाला माय अकाउंट(my account) मध्ये पाहता येतं. जर तुम्ही कंपनीचे रजिस्टरग्राहक असाल तर ही प्रक्रिया सोपी होते.

शिपिंग आणि डिलिव्हरी संधर्बात काही प्रश्न (Shipping & Delivery)

१. आमची ऑर्डर कंपनीकडे रजिस्टर झाली आहे, हे आम्हाला कसे कळेल?
सगळ्या ऑर्डर्स ची पूर्णत्वाची प्रक्रिया दोन दिवसांमध्ये पूर्ण होते.अपवाद फक्त साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्ट्या यांचा असतो.यासाठी भारतीय प्रमाण वेळेचा आधार घेतला जातो.

२. आम्हाला आमची ऑर्डर मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
कुरियर कंपन्यांच्या सेवा देण्याच्या पद्धतीनुसार पाच दिवसांमध्ये तुमची ऑर्डर तुमच्या पर्यंत पोहोचायला हवी. कधीकधी न टाळता येणाऱ्या गोष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे जास्त वेळ लागू शकतो. संपूर्ण भारतासाठी हीच व्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय डिलिव्हरी साठी वेगळी व्यवस्था व नियम आहेत.

३. आम्हाला आमची डिलीवरी कशी तपासता (track) येईल?
एकदा तुमची ऑर्डर व्यवस्थित रजिस्टर झाली आणि कंपनी ऑफिसमधून निघाली की ई-मेल द्वारे आपल्याला कळवल जातं. ज्यामध्ये ट्रॅकिंग नंबर व इतर डिटेल्स असतात.

४. बरवाचे प्रॉडक्ट मागवण्यासाठी किती शिपिंग चार्जेस लागतील?
कोणत्याही ऑर्डर वर संपूर्ण भारतभर फ्री शिपिंग आहे.

५. ऑर्डर रजिस्टर झाल्यानंतर पण शिपिंगचा पत्ता बदलता येईल का ?
बरवाकडे एकदा पत्ता रजिस्टर केल्यानंतर पुन्हा बदलता येत नाही. सिस्टीम मध्ये तशी व्यवस्था नाही.कृपया आपला शिपिंगचा पत्ता योग्य देण्याचा प्रयत्न करा.

६. आम्ही दिलेल्या ऑर्डर मध्ये एखादी वस्तू नसल्यास आम्हाला ती कशा पद्धतीने मिळू शकेल?
आपली तक्रार आपण कस्टमर केअर टीमला कळवा जेणेकरून लवकरात लवकर आपल्या पर्यंत न पोहोचलेली वस्तू आम्हाला पोहचवता येईल. यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे चार्जेस भरावे लागणार नाहीत.

७. आम्हाला एखादी खराब वस्तू मिळाल्यास काय करावे ?
आपल्याकडे आलेल्या खराब वस्तूचा फोटो बरवाच्या कस्टमर केअर टीम कडे पाठवा. लवकरात लवकर आपल्याला खराब प्रॉडक्ट बदलून देण्याची व्यवस्था कंपनीच्या खर्चाने केली जाईल. आपल्याला झालेल्या तसदीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

८. आम्हाला चुकीची वस्तू आली असल्यास काय करावे?
बरवाच्या कस्टमर केअर टीम ला कृपया कॉन्टॅक्ट करावा. लवकरात लवकर योग्य प्रॉडक्ट आपल्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था कंपनीच्या खर्चाने करण्यात येईल. आपल्याला झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व.

९. आमच्याकडून चुकीचा प्रॉडक्ट/रंग खरेदी केला गेला आहे,काय करावे?
चुकीच्या ऑर्डर केल्या गेलेल्या कोणत्याही प्रोडक्ट/रंगा साठी प्रॉडक्ट परत घेतला जात नाही. वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला आहे.

१०. आम्ही ऑर्डर केलेले पार्सल आम्हाला मिळालेले नाही,काय करावे लागेल?
दहा दिवसानंतर सुद्धा आपले पार्सल आपल्याला मिळाले नसल्यास बरवाच्या कस्टमर केअर टीमला ([email protected]) त्वरित संपर्क करावा. आम्ही आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहोत.

११. Re-delivery म्हणजे पुन्हा वस्तू पाठवण्यासाठी जादा चे पैसे भरावे लागतात का?
Re-delivery म्हणजे पुन्हा प्रॉडक्ट पाठवण्यासाठी बरवा कडून कोणत्याही प्रकारचे ज्यादाचे चार्जेस घेतले जात नाहीत. पार्सल हरवले असल्यास दोन वेळा पर्यंत कंपनी खर्च करते. तिसऱ्या प्रयत्नासाठी मात्र पैसे भरावे लागतात.

१२. दिलेल्या वेळेमध्ये आमचे पार्सल न आल्यास आम्ही काय करावे?
कंपनीकडून आपल्याला देण्यात आलेल्या ट्रॅकिंग नंबर नुसार तुमचे पार्सल नेमके कुठे आहेत हे पहावे. न सापडल्यास कंपनीला एक ईमेल पाठवावी. आम्ही आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहोत.

आमच्या वेबसाईट वर खरेदी करने हे ऍमेझॉन च्या वेबसाइट वर खरेदी करण्यापेक्षा का चांगले आहे

या वेबसाईटवर दिसणारे सेट्स.
बरवाकडे इथे 12 वेगवेगळे सेट्स उपलब्ध आहेत. जे फक्त barvaskintherapie.com वरूनच ऑर्डर करता येतात. 12 sets of products that you can only order from barvaskintherapie.com!
काही मेकअप सेट्स बरोबर छोटासा,पर्समध्ये मावेल असा, हातानी बनवलेला, आरसा फ्री येतो.
पोटली,ट्रॅव्हल पाऊच,पर्स, निवडक अशा स्कीन केअर आणि रोजच्या अंघोळीच्या वापरातल्या सेट्स बरोबर फ्री मिळतात. प्रत्येक बॅग वेगळी डिझाईन केलेली,सिल्क किंवा उत्तम परिस्थितीतल्या जुन्या साड्यांचा पुनर्वापर(recycle) केलेली अशी आहे.

आमच्यापर्यंत कसे पोहोचता येईल.
- लाईव्ह चॅट( बोलून) द्वा
- फोन नंबर द्वारे +९१ ९३५६७३४०७४
- ई-मेल द्वारे [email protected]
बरवाच्या प्रॉडक्ट बद्दल कोणताही प्रश्न असल्यास जसे फाउंडेशनच्या शेड्स,लिपस्टिक चे कलर्स,ऑर्डर,डिलिव्हरी, बरवाशी संबंधित काहीही असल्यास आमच्या पर्यंत जरूर पोहोचा. आम्ही आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहोत.