dark knees and elbows

गुढघ्यांच्या काळेपणामुळे तुम्ही शॉर्ट स्कर्ट्स, शॉर्ट्स आणि तुमचे इतर आवडते कपडे घालायला कचरता आहात ? काळजी करू नका, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात जिथे तुम्हाला गुडघे आणि कोपर यांचा काळवंडपणा कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय पाहायला मिळणार आहेत.

गुढघ्यांचा आणि कोपरांचा काळेपणा हि तशी खूप सामान्य गोष्ट आहे. हि एक हायपरपिग्मेंटेशन ची समस्या आहे ज्यामध्ये गुडघ्याची आणि कोपराची त्वचा जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार करते ज्यामुळे या भागातील त्वचा शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत जास्त काळी पडते. सर्व प्रकारच्या त्वचेच्या लोकांना हि समस्या भेडसावते. सावळ्या रंगाच्या लोकांना याचा फटका जास्त पडतो कारण अश्या प्रकारची त्वचा खूप प्रमाणात मेलॅनिन तयार करते.

बऱ्याच प्रकरणामध्ये असे काळवंडलेले गुडघे आणि कोपर हानिकारक नसतात नाही ते कोणत्याही प्रकारच्या गंभीर समस्येचे कारण ठरतात. घरगुती उपाय करून ते अगदी सहजपणे उजळ करता येतात.

1) अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

समप्रमाणात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी घेऊन एकत्र करा. कॉटन बॉल च्या साहाय्याने हे मिश्रण गुडघे आणि कोपरावर लावून १५ मिनिटासाठी ठेवून द्या आणि नंतर धुवून काढा. दिवसातून एकदा हे नक्की करा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड हा घटक सौम्य ब्लिच सारखा काम करतो जो त्वचेसाठी खूप सुरक्षित आहे. खूप प्रभावीपणे हा त्वचा उजळतो.

2) कोरफड

यासाठी तुम्ही स्टोअर मध्ये मिळणारे तयार जेल वापरा किंवा रोप असतील तर त्यातून कोरफडीचा गर काढून हि घेऊ शकता. जर स्टोअर मधून घेतले असेल तर ते तुम्ही गुढघे आणि कोपरावर दिवसातून दोन वेळा लावून घ्या.

कोरफडीचा ताजा गर किंवा जेल हा खूप चिकट असतो. जर तुम्ही तो वापरत असाल तर प्रभावित जागेवर २० मिनिटासाठी लावून घ्या आणि त्यानंतर धुवून काढा. दिवसातून २ वेळा वापरा.

कोरफड हा खूप चांगला उपचारात्मक घटक आहे. यामध्ये असणाऱ्या आद्रतायुक्त आणि त्वचा उजळ होण्यासाठीच्या असलेल्या गुणामुळे त्वचेवर खूप छान फरक पडतो. हे त्वचेवर एक सुरक्षा कवच हि तयार करते जे सूर्याच्या अतिनील किरणांपासून होणाऱ्या हानी आणि काळवंडण्या पासून वाचवतो.

3) लिंबू

अर्ध्या लिंबाचा रस आणि एक छोटा चमचा बेकिंग सोडा एकत्र करा. या मिश्रणाने १ मिनिट गुडघे आणि कोपरावर लावून चोळून घ्या. १५ मिनिटे ठेवून त्यानंतर धुवून घ्या. उत्तम परिणामासाठी दिवसा आड वापरा.

बेकिंग सोडा सौम्य पण खूप चांगला स्किन क्लीन्झर आहे. लिंबामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला उजळण्यास आणि तेजस्वी बनवण्यास खूप उपयोगी ठरते.

4) बदाम तेल

बदाम तेलाचे काही थेम्ब घ्या आणि त्याने गुढघे आणि कोपरावर हळुवारपणे मालिश करा जोपर्यंत तेल पूर्णपणे त्वचेमध्ये मुरले जात नाही. ते तसेच त्वचेवर राहू द्या. दिवसातून एकदा दररोज वापर करा.

बदाम तेलामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन ई असते जे त्वचेवर हलकासा ब्लिचिंग इफेक्ट देते. हे काळेपणा तर कमी करतोच शिवाय गुड्घ्याभोवतीची आणि कोपराभोवतीची त्वचा मॉइश्चराइझ आणि रिपेअर हि करते.

5) दही

एक छोटा चमचा दही आणि एक छोटा चमचा साखर एकत्र करा. एक मिनिटासाठी गुडघे आणि कोपराभोवतीच्या त्वचेवर हे मिश्रण चोळा. २० मिनिटासाठी ठेवून द्या आणि कोमट पाण्याने धुवून घ्या. उत्तम परिणामासाठी दर दिवसा आड करत राहा.

दह्यामध्ये खूप असे एंजाइम असतात जे तुमची त्वच्या स्वच्छ आणि पोषक बनवण्यासाठी तसेच मृत पेशी काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त असतात. साखर हा उत्तम एक्सफॉलिएटर आहे जो हळुवारपणे डार्क आणि मृत पेशी काढून टाकतो.

6) हळद

अर्धा चमचा हळद आणि १ चमचा मध एकत्र करा. गुढघे आणि कोपरावर लावून घ्या आणि २० मिनिटांनी धुवून काढा. आठवड्यातून ३ वेळा करा.

हळदी मध्ये कर्क्यूमिन असते असा इन्ग्रेडिएंट जो मेलॅनिन च्या निर्मितीला आळा घालते ज्यामुळे हायपर पिगमेंटेशन चे प्रमाण कमी करण्यासाठी ओळखले जाते.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंघोळीनंतर दररोज गुडघे आणि कोपर यावर बॉडी लोशन लाऊन मॉइश्चराईझ करा. यासाठी आम्ही बरवा स्किन थेरपी चे अँटिऑक्सिडेन्ट प्रोमोग्रानेट बॉडी लोशन वापरण्याचा सल्ला देतो ज्यामध्ये मध्ये नैसर्गिक घटक / इन्ग्रेडिएंट्स जसे कि डाळिंबाच्या बियांचे तेल, कोरफडीचा रस, कोकम बटर आणि ऑरेंज इसेन्शिअल ऑइल हे आहेत. कोरफडीचा रस हा ह्युमीकटण्ट म्हणून काम करतो, त्वचेला ओलावा देतो तर कोकम बटर हे प्रतिबंध करणारा घटक म्हणून काम करतो आणि त्वचेचा स्वरक्षक म्हणून खात्री करतो कि तिच्यातला ओलावा कमी होणार नाही. हे सगळे इन्ग्रेडिएंट्स एकत्र त्वचेला मऊ, एकसारखी आणि संतुलित ठेवतात.

गुडघे आणि कोपर यांच्या OTC उपचारांबद्दल सत्य

आता सांगितल्याप्रमाणे हे घरचे उपाय काळवंडलेले गुडघे आणि कोपर उजळ करण्यास वेळ घेतात पण OTC मेडिकेशन्स च्या तुलनेत हा सुरक्षित उपाय आहे कारण OTC मेडिकेशन्स मध्ये मरकुरी, स्टिरॉइड्स, हैड्रोजन पेरॉक्साइड आणि हायड्रोक्विनोन असतात. संशोधनानुसार या घटकांच्या असुरक्षित परिणामामुळे ते जास्तीत जास्त टाळले जातात.

आशा करतो आपल्याला आमचे लेख आवडले असतील आणि त्यातील उपाय हि. आम्हाला नक्की कळवा त्यातील कोणता उपाय तुम्हाला जास्त प्रभावी वाटला. तोपर्यंत सुरक्षित राहा सुंदर राहा ! 🙂