Mini Cart

Lord Ganesha

गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताय ना! अहो थोडेच दिवस राहिलेत. घरी पाहुणा येणार म्हणलं की कामांची लगबग ही असतेच ना !
त्यात गणपती बाप्पा सगळ्यांचाच लाडका मग त्याच्या तयारीत काही कमी/ उणीव राहू नये म्हणून कंबर कसली पाहिजे, नाही का?

काय तयारी लागते बरं नेमकी. ढोबळमानाने आपण याचे दोन भाग करूया, एकात येईल बाप्पा च्या पूजेची तयारी आणि दुसरा भाग असेल ,आपली सोय म्हणजे बाप्पाला करायचा नैवेद्य. बाप्पाला दाखवून केलेला प्रसाद आपणच खाणार ना मग त्याची देखील सोय बघायला हवी ना ?
साधारणतः आठ दिवस किंवा आपल्या सोयीने दोन दिवस आधी आपण बाप्पाच्या बैठकीसाठी आसन किंवा छोटी छोटी सजावट करू शकतो. त्यासाठी जितक्या नैसर्गिक, इकोफ्रेंडली वस्तू वापरू तेवढ्या चांगल्या.
रंगीत जाड कागद, जिलेटीन पेपर, घोटीव कागद, आईस्क्रीमचे पातळ चमचे,रंगीत काड्या,साधी रांगोळी,धान्याची रांगोळी किंवा फुलांची रांगोळी हे पर्याय देखील आहेत. फुलांची रांगोळी मात्र अगदी ऐन वेळी करावी लागेल.
ही सजावट आणि मध्ये बैठक म्हणून छोटा चौरंग ठेवला की बाप्पा बसायला तयार…

पूजेच्या तयारी मध्ये ज्याला पंचामृती पूजा म्हणलं जातं ती तयारी खरंतर सोपी आहे.
हळदी कुंकू,फुले,रांगोळी, सुपार्‍या,बदाम,खारका,फळे सगळं प्रत्येकी 5, पाच जोडी म्हणजे दहा विड्याची पाने, दुर्वा(हरळी), तुळस,बेल,छानसा फुलांचा,मोत्याचा,कापसाच्या वस्त्राचा हार,उदबत्ती,सुट्टे पैसे दहा नाणी,अत्तर,जानव्याचा जोड,पळी-भांडं-ताम्हण नसल्यास छोटी खोलगट डिश आणि चमचा देखील आपण ताम्हण आणि पळी म्हणून वापरू शकतो.
अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे गंध.जे चंदनाचे सहाणेवर उगाळून केले जाते ते किंवा बाजारातील तयार अष्टगंध. अक्षता म्हणजे अ-क्षत सोप्या भाषेत तांदळाचा तुकडा नाही तर तांदुळाचा दाणा पूर्ण असलेला तांदूळ हा अक्षता तयार करण्यासाठी वापरला जातो. तांदूळ हलकेसे ओले करून त्यावर कुंकू टाका,त्याला हलका लालसर गुलाबी रंग येऊ दिला, हे तांदूळ वाळले की झाल्या अक्षता तयार.
याच पूजेमध्ये लागणाऱ्या अजून दोन महत्वाच्या वस्तू म्हणजे पंचखाद्य आणि पंचामृत. पंचखाद्य हे पाच वस्तू एकत्र करून बनवला जाणारा पदार्थ आहे, ज्या वस्तू कोणत्याही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होऊ शकतात. खारीक,खसखस,खोबरं आणि खडीसाखर समप्रमाणामध्ये जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा पंचखाद्य बनवणं सोपं जातं.
खारीक किंवा खारकेची पूड करून घ्यावी,खसखस हलकीशी भाजून त्याची देखील भरड अशी पूड करावी,गोटा खोबरं किसून घेऊन हलकसं भाजून घ्यावं ते हाताने देखील बारीक होतं, त्याचे हलकेसे जाड पावडर मध्ये रूपांतर होते, खडीसाखरेचे दाणे बारीक असतील तर डायरेक्ट वापरा नसल्यास साखर किंवा पिठीसाखर देखील चालतेच.सगळं एकत्र केलं की झालं पंचखाद्य तयार .

एक ओपन सिक्रेट सांगू का? याच पंचखाद्यात गूळ आणि ओलं खोबरं मिसळून गॅसवर ठेवून छान चटका दिलात तर मोदकांचं सारण तय्यार की !!

दुसरा पदार्थ आहे पंचामृत.
पाच ओले पदार्थ एकत्र केले असता जे अमृतासारखे लागतात किंवा अमृतासारखी शक्ती देतात म्हणून त्याला पंच-अमृत ‘पंचामृत’ म्हणाले जाते. यात दूध,तूप,मध,दही आणि साखर यांचा समावेश असतो.
पंचामृत तयार करण्यासाठी दूध अर्धी वाटी,दोन चमचे दही,मध एक चमचा,तूप दोन चमचे व साखर दोन चमचे इतकेच साहित्य लागते.
आपला गणपतीबाप्पा खरंच सोपा आहे,आपल्याला तो फार त्रासात टाकत नाही, त्याला ‘पूजा करणाऱ्यांचा भाव महत्त्वाचा वाटतो निव्वळ वस्तू न्हवेत’.
अशी पूजेची तयारी झाली की देवासमोर बसायला पाट किंवा आसन घेतलं की आपण पूजेसाठी अगदी तयार आहोत. हा पण छानशी साडी नेसून किंवा मस्तपैकी झब्बा,सोवळं घातलं की तुम्ही तयार झाला आहात.
बाकी नैवेद्य जो तुम्ही कराल तो अगदी घरात कोणी आजारी असेल, घरातल्या आई- बाईचीच तब्येत ठीक नसेल, शक्य नसेल तर बापाला गूळ-खोबरं, दूध -साखर हेदेखील प्रसाद म्हणून आनंदाने चालतं. बाकीचे नैवेद्याचे पदार्थ हे आपल्या जिभेला आणि पोटाला तृप्त करण्यासाठीच असतात बरं!

वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे गणपतीच्या दिवसांमधील सर्वांचे आवडते.बाप्पांच्या बरोबर उंदीर मामा चे पण लाडके तेच. मोदकांमध्ये वरचे कव्हर हे तांदुळाच्या पिठाची उकड काढून केलेले असतील तर ते उकडीचे मोदक,भिजवलेली कणिक वापरून तळलेले असतील तर ते तळणीचे मोदक आणि आत सारण म्हणून तर तुम्ही जे पाहिजे ते घालू शकता.
गुळ आणि ओलं खोबरे या पासून बनवले जाणारे सारण हे तर सर्वांनाच आवडते, पण ड्रायफ्रूट,काजू,खजूर असे अनंत प्रकार करता येतील यात. जशी तुमची आवड तसा मोदक तयार.

या दिवसांच्या दरम्यान तुम्हाला मोदक करायला जमणार नसतील तर असंख्य हात आपल्या मदतीला आहेतच. हलवाई,मिठाईवाले,घरगुती शेफ मग काळजी कसली!
सगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला चुटकीसरशी मिळतील आणि घरातल्या सगळ्या वयातल्या व्यक्तींना तृप्त करतील.

गणपती काय किंवा कोणताही देव,परंपरा,सण हे आपल्या आनंदासाठी म्हणून जर केले तर त्याचं बर्डन किंवा ओझं न वाटता या परंपरांचा-सणांचा आनंद नक्कीच घेता येईल. अर्थात सार्वजनिक गणपती मुळे होणारी रस्त्यावरील वाहतूक कोंडी,आवाजाचे प्रदूषण या गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करून आपल्या घरांमधील बाप्पाच्या येण्याचा आनंद जर आपण आपले जवळचे नातेवाईक,मित्रमंडळी यांच्या बरोबर वाटून घेतला तर सोन्याहून पिवळे!

एक गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वाची आहे जी गणपती या देवाबद्दल नेहमी ऐकायला मिळते.अतिशय हसमुख असा हा देव आहे. आपल्या मोठ्या पोटाचा,लांब सोंडेसारख्या नाकाचा, बुटक्या शरीरयष्टीचा कशाचा म्हणून त्याला कॉम्प्लेक्स नाही तेव्हा त्याच्याकडून आपण नक्कीच आपल्या शारीरिक उणिवांवर मात कशी करायची आणि मजेत कसं जगायचं हे शिकण्याचा प्रयत्न करू शकतो.

जैसे भी है हम सुंदरही है।

गणपती बाप्पा मोरया!!

कामाक्षी बर्वे.
विटा-सातारा-पुणे

no makeup makeup look

The no-makeup makeup look is trending among women (and men too, mostly models) of various age groups. In this article, we will discuss the various nuances of this look, and tell you how you can achieve a flawless no makeup makeup look without giving yourself away.

Products that are commonly used for the no-makeup makeup look:

1) Cleanser
– A face cleanser/foaming face wash that is suited to your skin type. Cleansing is the first step for any makeup routine, as it helps remove stale products, impurities, skin oiliness etc. An effective cleanser balances the pH of your skin, which is essential for keeping skin problems at bay. It also refreshes your skin and aids in the better absorption of other beauty products, such as your moisturizer.

2) Moisturizer (very important if your skin is dry/combination)
– A light moisturizer that is an ideal balance of rich butters, such as mango butter, cow ghee, kokum butter, and light ingredients such as aloe vera & orange essential oil (check it out here). It gets instantly absorbed into your skin to provide quick relief from skin dryness & dehydration (click here to read more on dry & dehydrated skin).

3) Tinted Primer or BB Cream
– Now for the makeup product – in case of a no-makeup makeup look, we can skip the foundation and concealer. Instead, go for a primer or BB cream that has a light tint or shimmer to add a glow to your face. It also evens out your skin tone, and covers open pores and other imperfections, but only to a certain extent. So your skin still looks natural and non made up.

4) Lip Balm
– This is definitely a lip care essential, irrespective of whether you plan to wear lipstick or not. It keeps you lips moist and prevents or even cures chapped & dry lips. It also ensures that your lipstick glides on smoothly and doesn’t cake up.

5) Lipstick
– A lipstick in a nude or neutral shade (Check out the Barva Lipstick Shades – Rose Damask, Passion, Orchid & Natural Brown) can also be used in a no-makeup makeup look, however, it is optional.

How to Create a No-Makeup Makeup Look?

no makeup makeup look

Creating a no-makeup makeup look is very easy and less time-consuming too.

If you have dry or combination skin, start with a moisturizer. Apply it liberally all over your face & neck regions. After that, follow the steps below:

1) Make small dots of primer or BB cream all over your face & neck. Blend gently towards the corners of your face. This will even out your skin tone, add an instant glow to your face, and create a smooth canvas for your makeup.

2) Apply lip balm on your lips, and let it sit for around 2 minutes. Once it has worked its magic on your lips, wipe it off with a tissue.

3) Next, apply a lipstick in the shade of your choice (preferably a nude/neutral shade, as this is a no-makeup makeup look). You can blot it with a tissue & layer it up if you want.

And you’re good to go with just these three (if you skip the lipstick then 2) steps! Your skin will glow naturally without looking made up. After all, it’s your imperfections that make you beautiful! Why hide them behind heavy makeup and concealers.

We hope you found this article useful. Take care and stay safe!

 

Skin Care Resolutions for the New Year

नवीन वर्षाच्या नवीन उपक्रमाची भली मोठी यादी केली असेल नाही पण त्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी आहे का ?

तुम्हाला तुमच्या त्वचे संधर्बात काही चिंता भेडसावत आहे का जे तुम्ही आहे तशी ग्राह्य धरून स्वीकारली आहे? या नवीन वर्षा मध्ये या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी काही टिप्स आपण आपल्या रोजच्या व्यस्त दिनचर्येमध्ये घालून घेऊ.

प्रत्येकाची त्वचा हि खूप वेगळी असते आणि म्हणूनच सगळ्यांनाच एकाच प्रकारची देखभाल उपयोगी पडत नाही तर वेगवेगळ्या त्वचेला वेगळ्या देखभालीची गरज असते. चला तर मग बघुया.

आपण सर्व जाणतोच, आपली त्वचा हि ३ प्रकारामध्ये मोडते; तेलकट, कोरडी आणि संमिश्र. तर पाहूया आपण या सर्व त्वचा प्रकारची काळजी कशी घेऊ शकतो आणि त्यासाठी असणारी या वर्षीसाठी संकल्पना.

तेलकट आणि पुरळयुक्त त्वचेसाठी संकल्प

oily skin

1. त्वचेची स्वछता – Cleanse
दिवसातून किमान २ वेळा चेहरा स्वच्छ करणे गरजेचे आहे त्यासाठी अश्या प्रॉडक्ट ची निवड करा जो तेलकट त्वचा आणि मुरुमे लवकर कमी करेल. खासकरून फेसयुक्त फेसवॉश ज्यामध्ये नीम, पुदिना, कोरफड, चहा पती तेल, लिंबू याचे गुणधर्म असेल जे त्वचेवरील जास्तीचे तेल नियंत्रणात तर ठेवेलच पण त्याचबरोबर मुरुमे, पुरळ, ब्लॅकहेड आणि इतर त्वचे संधर्बात उणिवाही भरून काढेल.

Refreshing Face Wash with Aloe Vera | cleanser for oily and dry skin type

Made with peppermint oil & neem extract | best for women and men MRP 310.00 GSTIN : Tax is Inclusive 18% for all Products (incl. of all taxes) Add to cart

2. एक्सफॉलिएट (Exfoliate)
हा मुद्दा तितकाच महत्वाचा तरीही नेहमी डावललेला. त्वचेवरील मृत पेशी काढणे खूप महत्वाचे तर तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा एक्सफॉलिएट करणे खूप गरजेचे आहे. एक्सफॉलिएशन साठी बांबू च्या बारीक कणांनी बनलेले फेस स्क्रब वापरा जे वॉलनट सारख्या अपघर्षक घटकांसारखे त्वचेला हानी पोहचवत नाही. ते त्वचेवर खोल पर्यंत काम करते, त्वचेवर साचलेले इतर घटक नाहीसे करून ब्लॅकहेड आणि मुरुमे होण्यावर आळा घालते.दररोज एक्सफॉलिएट करणे हि तितकेच हानिकारक असते म्हणूनच त्वचेचा प्रकार कोणताही असो, आठवड्यातून फक्त २ च वेळा एक्सफॉलिएट करणे योग्य आहे.

Renew Bamboo Exfoliator | face scrub for women and men | gentle skin exfoliating

Made with ghee, aloe vera & bamboo particles | suits oily and dry skin MRP 420.00 GSTIN : Tax is Inclusive 18% for all Products (incl. of all taxes) Add to cart

3. टोनिंग (Toning)
क्लिन्सिंग आणि एक्सफॉलिएशन पाठोपाठ तुमच्या त्वचेला योग्य टोनर ची हि तितकीच गरज असते.  टोनर्स त्वचेवरील छिद्र नियंत्रणात ठेवण्याचे तसेच ती घट्ट करण्याचे काम करते जेणेकरून त्वचेवर अनावश्यक तेल जमण्यास आळा बसेल.

तुम्ही घरीही योग्य असा टोनर तयार करू शकता ज्यासाठी तुम्हाला एका स्प्रे बाटली मध्ये एक भाग कोरफडी चा जेल, ३ भाग गुलाब जल आणि अर्धा चमच्या ग्लिसरीन घ्यावे लागेल. हे सर्व छान असे मिक्स करा आणि फ्रिज मध्ये ठेऊन द्या. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही हि बाटली आपल्यासोबत पर्समध्ये घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करून झटपट असा तजेला मिळवू शकता. फ्रिज मध्ये साठवलेले हे मिश्रण १५ दिवस चालते आणि हिवाळ्यात हि वापरता येते.

4. त्वचेची आद्रता कायम ठेवणे – Moisturizing
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला तुमच्या मॉइस्चराइजर ची निवड खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. अश्या त्वचेसाठी योग्य असे नैसर्गिक बटर, कोरफड आणि संत्र्याच्या सालीचे तेल असणारे सौम्य असे मॉइस्चराइजर छान काम करेल. मॉइस्चराइजिंग  हे एक्सफॉलिएशन आणि क्लिन्सिंग नंतर ची त्वचेची आद्रता आणि  Ph चा समतोल ठेवण्यास मदत करतं.

Mango Butter Moisturizer / Face Cream with Vitamin E & Aloe Vera | for oily and dry skin

Light-weight face moisturizer for daily skin hydration & nourishment | chemical-free skin glow! MRP 430.00 GSTIN : Tax is Inclusive 18% for all Products (incl. of all taxes) Add to cart

5. उशांसाठी स्वच्छ कव्हर चा वापर  – Use Clean Pillow Cases
आपण रोज वापरणारी उशांचे कव्हर हे सातत्याने आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या सानिध्यात येत असतात आणि म्हणूनच ते प्रत्येक ३ दिवसांनी बदलणे गरजेचे आहे. आपण वापरलेले night creams, चेहऱ्यावरील तेल, केसातील कोंढा आणि त्वचेवर जमलेले इतर घटक या कव्हर वर जमले जातात. हे सर्व मग आपल्या चेहऱ्यावर पसरले जातात जेव्हा जेव्हा आपण झोपी जातो.म्हणूनच उशांचे कव्हर वेळोवेळी बदलणे हे ब्रेकआउट टाळण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

6. तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थांचे कमी सेवन – Consume Less Amounts of Oily & Fatty Foods
तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ त्वचेवरील छिद्र बंद करतात आणि sebum या घटकाचे प्रमाण हि वाढवण्याला कारणीभूत ठरतात. म्हणूनच, योग्य आहाराचे सेव्हन करणे तितकेच गरजेचे आहे जेणेकरून त्वचेमधील तेल आणि मुरुमे यावर आळा घालता येईल.

कोरड्या आणि प्रौढ त्वचेसाठी संकल्प

dry skin

1. सौम्य क्लिन्झर चा वापर – Use mild cleansers
कोरड्या आणि प्रौढ त्वचेला जास्त ओलाव्याची आणि पोषणाची गरज असते आणि ती लवकर शुष्क पडू लागते. क्लिन्झर ची निवड करताना ती अशी करा जी कोरडी त्वचा आणि संमिश्र त्वचेसाठी उपयुक्त असेल, आपली त्वचा टवटवीत करण्या बरोबरोबर ती कोरडी हि पडू देणार नाही.असा क्लिन्झर आणि फेस वॉश निवडा ज्यामध्ये कोरफडीचे गुण असतील आणि जो त्वचेचा Ph समतोल राखण्यास मदत करेल. लक्ष्यात ठेवा यांच्या वापराने त्वचा कोरडी नाही पडली पाहिजे आणि ती छान स्वच्छ हि झाली पाहिजे. दिवसातून किमान २ वेळा तरी याचा वापर जरूर करावा.

2. आठवड्यातून एकदा एक्सफॉलिएट – Exfoliate Once a Week
कोरड्या त्वचेप्रमाणेच तेलकट त्वचेलाही एक्सफॉलिएशन ची गरज असते जेणेकरून त्वचेवरील मृत पेशी आणि कोरड्या त्वचा पेशी निघून जातील ज्यासाठी फक्त खोलवर क्लीन्सिंग केल्याने च परिणाम दिसून येतो.कोरड्या आणि प्रौढ त्वचेसाठी सौम्य असा एक्सफॉलिएटर उपयुक्त आहे ज्यामध्ये बांबू चे अतिसूक्ष्म कण, गायीचे तूप आणि जोजोबा तेल असेल. बांबू चे लहान कण त्वचेवरील मृत पेशी, जमलेली घाण इत्यादी खुप सहजरित्या काढून टाकते. इतर घटक हे एक्सफॉलिएशन दरम्यान त्वचेला कमीत कमी हानी पोहचेल याची काळजी घेतं.

3. आद्रता -ओलावा टिकवून ठेवेल अश्या क्रीम चा वापर करा
कोरडेपणा आणि शरीरातील पाण्याची कमतरता याचा त्वचेवर खूप परिणाम होतो. यासाठी तुम्हाला अश्या प्रॉडक्ट ची गरज आहे जे कोरडी आणि शुष्क त्वचेवर काम करेल. मँगो बटर, कोकम बटर, गायीचे तूप आणि इतर बॉडी बटर आणि तेल हे कोरड्या त्वचेवर काम करते. शुष्कपणा घालवण्यासाठी  त्वचेला कोरफड, लिंबाचे तेल, संत्राच्या सालीचे तेल, ग्लिसरीन आणि इतर घटक खूप उपयुक्त पडतात. त्यासाठी ‘योग्य मॉइस्चराइजर कसे निवडाल’ हा आमचा लेख हि पहा.

Skin Nectar | anti-ageing cream with hyaluronic acid, niacinamide | reduce pigmentation, dark spots

non-greasy, mattifying moisturizer, enriched with propolis & ghee to help reduce pores & fine lines MRP 230.00990.00 GSTIN : Tax is Inclusive 18% for all Products (incl. of all taxes) Select options

4. असंपृक्त स्निग्ध आम्ले याचा आहारात समावेश – Consume Fatty Acids
बदाम, काजू, अक्रोड तसेच जवस आणि सूर्यफुलाच्या बिया हि काही स्निग्ध आम्ले युक्त आहाराची उदाहरणे आहेत जी आपली त्वचा आतून तसेच बाहेरून तजेलदार ठेवण्याचे काम करते. म्हणूनच रोजच्या जेवणात किव्हा कोशिंबीर वर पेरून आपण ते  खाऊ शकतो.

5. पोषक तेलाने शरीराची आणि चेहऱ्याची मालिश – Massage Your Face & Body with Nourishing Oils

body massage

सातत्याने केलेली तेलाची मालिश हि आरामदायक च नाही तर आपली त्वचा खोलवर पोषक कण्याचे काम करते. फक्त शरीरच नव्हे तर चेहऱ्याची मालिश करण्याची गरज असते आणि त्यासाठी बदाम तेल, ऑलिव्ह तेल, नारळाचं तेल, डाळिंबाचे तेल इत्यादी खूप उपयुक्त पडते.

महिन्यातून दोनदा आणि हिवाळ्यात वेळोवेळी चेहरा आणि शरीराची तेलाची मालिश गरजेची आहे.

6. सूर्याची अतिनील किरणे हि त्वचेसाठी घातक असतात खासकरून प्रौढ त्वचेला. UVA  आणि UVB  या किरणांमुळे  त्वचेच्या काही समस्या उदभवतात जसे काळेपणा, पिगमेंटेशन, ढीली त्वचा, सुरकुत्या. या नवीन वर्षा निमित्ताने संकल्प करा कि तुम्ही विना सनस्क्रीन क्रीम लावल्याशिवाय बाहेर पडणार नाही. घरात असल्यास हि सनस्क्रीन लावण्याचा सल्ला त्वचा शास्त्रज्ञ देताना दिसतात.

7. भरपुर पाणी प्या – Drink Plenty of Water

drink water

8. कमीतकमी ८ ग्लास पाणी पिलं गेले पाहिजे अगदी हिवाळ्यात सुद्धा जे आपल्या शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करून शरीरातील पाण्याचे आणि आद्रतेचे प्रमाण संतुलित ठेवते. शरीरातील योग्य पाण्याचे प्रमाण त्वचा चमकदार आणि टवटवीत राहण्यास मदत करते. संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा पाणी पिणे लाभदायक असते.

9. आठवड्यातून एकदा फेस मास्क चा वापर जरूर करा  – Use a Face Mask Once a Week

face mask face pack facial

फेस मास्क च्या वापराने त्वचेच्या लवचिकते  मध्ये सुधार होतो. प्रौढ आणि कोरड्या त्वचेसाठी आद्रता देणारा फेस मास्क वापरण्याची गरज असते जो चेहऱ्यावर झटपट अस पोषण आणि आद्रता देण्याचे काम करतं. असा मास्क निवडा ज्यामध्ये उटणं, गुलाब जल, मध इत्यादी घटक असतील जे त्वचेचे पोषण करण्याबरोबर तिचा पोत हि सुधारेल.

संमिश्र त्वचेसाठी संकल्प

1. pH ने बॅलन्स असे क्लिन्झर – pH Balanced Cleanser
केमिकल युक्त क्लिन्झर त्वचा कोरडी करतात खासकरून गालावरची त्वचा आणि तेलकट त्वचेमध्ये T -zone , कपाळ, नाक आणि हनुवटी  हा भाग. हि समस्या कमी करण्यासाठी फेस युक्त फेस वॉश आणि क्लिन्झर चा वापर करा ज्यामध्ये निम, पुदिना, कोरफड इत्यादींचे घटक असतील. Ph समतोल त्वचा स्वच्छ, निरोगी, तजेलदार राहण्यास मदत होते.

2. आठवड्यातून एकदा हलके एक्सफॉलिएशन – Gentle Exfoliation Once a Week
याआधी सांगितल्या प्रमाणे, तुमच्या त्वचेला सौम्य अश्या एक्सफॉलिएशन किंवा स्क्रबिंग ची गरज असते. मोट्ठे आणि जाडसर दाणे असलेला फेस मास्क किंवा क्लिन्झर जो अक्रोड, बदाम पासून बनलेला असतो तो शक्य तितका टाळा कारण असा फेस मास्क त्वचेवर खूप कठोर ठरू शकतो. त्याबदल्यात असा फेस वॉश / क्लिन्झर निवढा जो सूक्ष्म कणांनी बनलेला असेल आणि जो कमीतकमी हानी पोहचवून त्वचा स्वच्छ करेल.

Spotless Skin Anti-Acne Special | made with ingredients known to treat pimples & dark spots

set of face wash, scrub, acne spot cream with a free accessory 940.00 Add to cart

3. दिवसा सौम्य तर रात्री जड moisturizer चा वापर  –  Light Moisturizer During the Day & Rich Moisturizer at Night
सकाळी उठल्या नंतरची आपली त्वचा हि कोरडी असते म्हणूनच कोरडी असो किंवा तेलकट, दोन्ही त्वचे साठी थोडा जड असा मॉइस्चराइजर रात्री वापरणे गरजेचे असते तर याउलट दिवसा सौम्य अश्या मॉइस्चराइजर ची.

सौम्य मॉइस्चराइजर म्हणजे असा जो त्वचेमध्ये पटकन सामावला जाईल खासकरून कोरफड, मध आणि ग्लिसरीन चा गुणधर्म असलेला. रात्रीसाठी तुम्ही असा मॉइस्चराइजर  निवडू शकता ज्यामध्ये मँगो बटर, कोकम बटर आणि गायीच्या तुपाचे गुणधर्म असतील. तो तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करून त्वचेला प्रौढ होण्यापासून हि वाचवतो.

4. आहारात फळांचा समावेश  – Consume More Fruits
फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते जे आपली त्वचा आद्र आणि टवटवीत ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या तंतुमय घटकामुळे आपल्या शरीरातील टाकाऊ घटक चांगल्या प्रकारे निघण्यास मदत होते. फळांमध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिज पदार्थांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचेचा पोत सुधारण्यास हि मदत होते.

5. कमीत कमी मेकअप चा वापर करा  – Use Lesser Makeup
त्वचेला नेहमीच जड मेकअप खाली झाकू नका, तिलाही यापासून मुक्तीची गरज असते. संकल्प करा कि यावर्षी पासून आठवड्यातून किमान एकदा तर विना मेकअप राहाल  आणि आपल्या त्वचेला छान श्वास घेऊ द्याल . त्याचबरोबर केमिकल मेकअप ऐवजी नैसर्गिक घटकांनी बनलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यावर हि भर द्या.

6. पोषक आहार घ्या –  Eat Healthy

eat healthy

हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आणि ग्रीन टी हे त्वचा निरोगी राखण्यास तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल संप्रेरकाची निर्मिती हि थांबवते. नेहमी आपल्या आहाराबाबत जागृत राहा ज्याचा फायदा लगेचच तुमच्या त्वचेवर दिसून येईल.

7. भरपुर पाणी प्या – Hydrate with Water

drink water

हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कमीतकमी ८ ग्लास पाणी दररोज पिल्याने शरीराची आद्रता कायम टिकवली जाते आणि त्याचा चांगला परिणाम हि शरीरावर लगेच तसेच त्वचेवर दिसून येतो.

तर मग आम्हाला नक्की कळवा वरीलपैकी कोणता संकल्प तुम्ही तुमच्या त्वचेच्या देखभालीसाठी अमलात आणणार आहात. शेवटी पण अति महत्वाचे, “सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि नेहमी सुंदर दिसा” नवीन वर्ष्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्या!

no makeup makeup look

नो-मेकअप मेकअप ट्रेंड
सध्या नो मेकअप मेकअप हा ट्रेंड खूपच फॉर्म मध्ये आहे, खासकरून पुरुष मंडळी आणि मॉडेल्स यांच्या मध्ये.  तर आता हे असं का चालू आहे त्याचे काही बारकावे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. 

no makeup makeup look

नो-मेकअप मेकअप लुक साठी वापरली जाणारी प्रॉडक्ट्स

1. क्लिन्झर (Cleanser)
तुमच्या त्वचेला अनुकूल असं फोम फेसवॉश आणि क्लिन्झर . कोणताही मेकअप करण्याआधी त्वचा स्वच्छ करणें खूप आवश्यक आहे ज्यामुळे त्वचेवरील तेल, अशुद्ध घटक आणि मृत पेशी काढण्यासाठी मदत होते. एक चांगलं आणि प्रभावी क्लिन्झर तुमच्या त्वचेचा Ph हि संतुलित करतं, जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. क्लिन्झर मुळे त्वच्या स्वच्छ तर होतेच, पण इतर प्रॉडक्ट्स, जसे मॉइस्चराइजर हे त्वचेमध्ये छान मुरले जाते.

barva facewash for oily skin

2. मॉइस्चराइजर (कोरड्या आणि संमिश्र त्वचेसाठी अत्यावश्यक )
गाईचे तूप, मँगो बटर , कोकम बटर , कोरफड आणि ऑरेंज इसेन्शिअल ऑइल युक्त असं अगदी हलकं मॉइस्चराइजर नक्कीच फायद्याचे ठरेल.  हे त्वचेमध्ये इतक्या लवकर शोषल जाते ज्यामुळे तुमची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसत नाही.

3. टिंटेड प्रायमर किंवा बीबी क्रीम 
नो-मेकअप मेकअप मध्ये आपण फाउंडेशन आणि कंसिलर वगळू शकतो, आणि त्या ठिकाणी BB क्रीम किंवा प्रायमर चाही वापर करू शकतो, जे तुमच्या त्वचेला हलकिशी चमक देईल. Primer आणि BB क्रीम हे तुमची विसंगत त्वचा म्हणा किंवा उघडी छिद्रे आणि इतर काही त्रुटी असतील तर तेही काही प्रमाणात लपवतं, जेणेकरून तुमची त्वचा अगदी नैसर्गिक आणि खूप आवरल्या सारखी हि दिसणार नाही.

tinted moisturizer, primer, BB cream

4. लिपबाम
ओठ हा चेहऱ्याच्या ठेवणीतला महत्वाचा घटक, असं का, तर अगदी काही नाही केले पण हलकिशी  लिपस्टिक लावली तरी चेहरा खूप खुलून दिसतो. म्हणूनच ओठांची काळजी घेणे हि तितकीच महत्वाची गोष्ट. त्यासाठी लिपबाम खूप फायदेशीर ठरते जे ओठांना कोरडेपणा आणि फुटण्यापासून वाचवते.

lip balm for men and women

5. लिपस्टिक (Lipstick)
नो-मेकअप मेकअप लुक मध्ये डार्क लिपस्टिक शेड किंवा टिंटेड लिपबाम वापरणे टाळा. त्याजागी न्यूड आणि न्यूट्रल शेड ना प्राधान्य द्या, किंवा टाळू हि शकता ( तुम्ही बर्वा चे Barva lipstick shades, – Rose Damask, Passion, Orchid & Natural Brown  हि  पाहू शकता).

chemical free lipstick lead free

नोमेकअप मेकअप लुक कसा करायचा ?

no makeup makeup look

तर नोमेकअप मेकअप लुक साठी वेळ हि खूप कमी लागतो आणि करायला हि खूप सोपा आहे.

तुमची त्वचा कोरडी असो वा मिश्र स्वरूपाची, सुरुवात हि नेहमी मॉइस्चराइजर ने करावी लागेल. तुमचा चेहरा आणि मानेच्या भागावर ते छानसे पसरवून घ्या, आणि त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा:

1. बीबी क्रीम (BB cream) किंवा प्रायमर चे छोटे छोटे थेम्ब चेहरा आणि मानेच्या भागावर लावून ते अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर छानस पसरावा. यामुळे तुमच्या त्वचेची रंगसंगती एक व्हायला मदत तर होईलच त्याच बरोबर एक छानशी चेहऱ्यावर चमक पण येईल.

2. ओठांवर लिपबाम लावून ते २ मिनिटे राहू द्या, आणि एकदा का ते त्वचेमध्ये मुरून त्याचा परिणाम अथवा मऊपणा दिसू लागला कि टिशु पेपर ने तो पुसून काढा

3. तुमची आवडती किंवा एखादी न्याचरल न्यूड रंगाची लिपस्टिक वापरा आणि टिशु पेपर ने हलकंसं दाबून सेट करा

बस या ३ स्टेप्स जरी फॉलो केल्या किंवा अगदी लिपस्टिक जरी स्किप केली तरी तुमच्या  त्वचेवर आणि चेहऱ्यावर एक मस्त असा  न्याचरल  नोमेकअप मेकअप लुक येईल.

एकंदरीत आपल्या त्वचेवरील ज्या काही त्रुटी आहेत त्याच तर खऱ्या आपल्या सौंदर्यात भर टाकतात तर का मग तिला असा त्यांना असं हेवी मेकअप आणि कंसिलर च्या लोड खाली दाबून ठेवायचे

आशा करते तुम्हाला आमचा हा लेख आवडला आणि उपयोगी वाटला असेल, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा !

डोळ्यांचा मेकअप डोळ्यांचा त्वचेसाठी चांगला असतो का?

हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रत्येक मेकअप करणाऱ्याने स्वतःला विचारायला हवा.
उत्तर होय आणि नाही दोन्ही प्रकारे देता येऊ शकतं. विचित्र वाटेल वाचायला, पण तुम्ही वर्षानुवर्षे वापरणारा मेकअप अचानकपणे तुम्हाला त्रास द्यायला लागतो. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे पापण्यांना सूज येणं आणि इन्फेक्शन होणे याला कॉन्टॅक्ट डर्मीटायटीस असं म्हणतात.

तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही, पण या लेखामध्ये आम्ही खूप कॉमन होणारे धोके आपल्याशी शेअर करू इच्छितो, जे आपल्या नेहमीच्या आय मेकअप प्रोडक्ट ने होऊ शकतात. आम्ही काही गाईड लाईन्स इथे शेयर करत आहोत जे एक्सपर्ट्स कडून सांगितले गेलेले आहेत.

आपल्या नेहमीच्या आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट मुळे होणारे डोळ्याचे गंभीर इन्फेक्शन्स

Kajal Eye Liner Pencil | safe for eyes | enriched with vitamin E

made with ghee & other natural ingredients MRP 490.00 GSTIN : Tax is Inclusive 18% for all Products (incl. of all taxes) Add to cart

FDA कडून अशी माहिती मिळते की दरवर्षी हजारो महिलांना डोळ्यांच्या इन्फेक्शन चा सामना करावा लागतो तो त्यांच्या रेगुलर वापरातल्या कॉस्मेटिक प्रोडक्ट मुळे. अतिशय रेअर कंडिशन मध्ये हे सर्व प्रोडक्ट अंशतः किंवा कायमचे आंधळेपण येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

bacteria on eyelashes

नॉर्मली पापण्यांवर बॅक्टेरिया असतात. कॉमन आढळणारे म्हणजे Propionibacterium, Corynebacterium, Streptophyta, Enhydrobacter, आणि Staphylococcus. जेव्हा आपली आय पेन्सिल किंवा मेकअप ब्रश यांच्या संपर्कात येतो तेव्हा प्रक्रिया होऊन इन्फेक्शन ची सुरुवात व्हायला लागते. जेव्हा आपण वारंवार हे प्रॉडक्ट वापरतो व ब्रश डबीत पुन्हा पुन्हा बुडवतो, त्यावेळी हे बॅक्टेरिया त्यांच्या कामाला लागतात व आपली संख्या वाढवतात आणि आपण डोळ्यांच्या इन्फेक्शन कडे ढकलले जातो किंवा आपल्याला ऍलर्जी ची सुरुवात व्हायला लागते.

पण अजून प्रोडक्टची शेल्फ लाईफ शिल्लक आहे की!

बहुतेक सगळ्या ब्रँडच्या डोळ्यांच्या मेकअप च्या प्रॉडक्टची एक्सपायरी 2 ते 3 वर्षांची असते पण प्रॉडक्ट उघडून लावायला सुरुवात केल्याच्या दुसऱ्या वेळेपासूनच कदाचित इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून, तुमचा या प्रॉडक्ट चा वापर नेमका किती आहे हे बघणं गरजेचं आहे. असं खरं तर कुठेच लिहिलेल नाही पण तुमचं काजळ, eyelinear, मस्कारा हा 3/4 महिनेच चालू शकतो अस एक्स्पर्ट म्हणतात.

सर्वात महत्वाचं आपले प्रॉडक्ट हे कोणाही बरोबर share करू नयेत. असं करणं हे धोक्यापेक्षा कमी नाही. इन्फेक्शन जसं की डोळे येणं, लाल होणे हे या प्रॉडक्टच्या शेअरिंग मधून सहज शक्य आहे. म्हणून आय मेकअप ब्रश,  मस्कारा, काजळ, आयलायनर हे प्रॉडक्ट प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असावेत.

आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे लगेच जा, जर कोणत्याही प्रकारचे छोटे वाटणारे इन्फेक्शन जसे की डोळ्यातून पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे, किंवा कोणत्याही प्रकारचे बदल डोळा व त्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर दिसल्यास.

FDA ने खालील सूचना दिलेल्या आहेत जर असं काही दिसलं तर काय करायचं यासाठी:

  1. कोणत्याही प्रकारचे बदल डोळे अथवा आजूबाजूच्या त्वचेवर दिसल्यास ताबडतोब त्या प्रोडक्ट चा वापर थांबवा आणि लगोलग डॉक्टर कडे जा.

eye infection redness

2.  डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक लावा व काढताना देखील काळजी घ्या,डोळ्यांच्या नाजूक त्वचेला किंवा डोळ्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्या.

why to remove eye makeup

3.  आपल्या डोळ्यांचा मेकअप करण्या आधी हात स्वच्छ धुऊन घ्या,तळहातावरचे बॅक्टेरिया देखील त्रासदायक होऊ शकतात.
4. जुने प्रॉडक्ट डोळ्यांच्या मेकअप साठी वापरण्याचा प्रयत्न करू नका,जर तुम्ही महिनोन् महिने प्रॉडक्ट वापरला असेल तर जुना काढून टाका व नवीन चा वापर करा.
5. तुमचे आय मेकअप चे सगळे कंटेनर धुळीपासून स्वच्छ ठेवा, ओलसर सुती कापडाने वापरण्याआधी पुसून जरूर घ्या.

how to clean makeup brushes
6. मेकअप चे ब्रश आणि वेगवेगळी उपकरणे… विशेषतः डोळ्याजवळ वापरली जाणारी स्वच्छ ठेवा शक्य असल्यास निर्जंतुक करा.

 

* डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही छोटे उपाय
1.  Meibomian glands मधून डोळ्यामध्ये ऑइलचे प्रमाण संतुलित ठेवले जाते व एक प्रकारची फिल्म डोळ्यांवर येते. वय वाढेल तसं याचं काम कमी होत जातं व डोळ्यांना एक प्रकारचा कोरडेपणा जाणवायला लागतो. कोमट पाण्याच्या घड्या ठेवल्याने हे ऑइल पुन्हा पातळ होऊन पसरायला मदत होते आणि डोळ्यांमध्ये आर्द्रता पुन्हा निर्माण होऊ शकते. गरम टॉवेल ची छोटी घडी बंद डोळ्यांवर काही वेळासाठी ठेवा, असे केल्याने डोळ्यांना आराम मिळतो व इन्फेक्शन ला दूर ठेवता येतं.

2. डोळ्यांचं संरक्षण होईल असा चष्मा/गॉगल घाला

 

wear sunglasses to protect eyes

सर्व सीजन मध्ये घराबाहेर पडताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल वापर करावा. जरी ऊन दिसत नसलं तरीही सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण म्हणून सावलीतून बाहेर येताना डोळ्यांवर गॉगल लावावा.

यु व्ही ए आणि यु व्ही बी रेडिएशन हे कधीकधी pinguecula आणि pterygia या कंडीशन साठी कारणीभूत ठरतात जे डोळ्यांच्या मधील पांढऱ्या भागातील क्लीअर पेशींना त्रास देतात याने Cornia ला देखील इजा होऊ शकते ज्यांला Keratitis म्हणले जाते.

3. आपल्या डोळ्यांच्या डॉक्टर ना दर दोन वर्षांतून किंवा गरजेची असल्यास आधीभेट द्या

eye doctor opthalmologist

18 ते 60 वर्षांच्या प्रौढांनी डोळ्याची तपासणी आपल्या डोळ्यांच्या डॉक्टर कडे जाऊन नियमित करून घेण्याची गरज असते. यामुळे डोळ्यांना कोणतीही इजा झाली असल्यास, काही त्रास होत असल्यास लगेच त्याचं निदान होऊ शकतं, जसं की Glaucoma, ज्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो, जर त्याकडे वेळेत लक्ष दिलं गेलं नाही. जितक्या लवकर निदान तितक्या लवकर औषध उपचार मिळणं गरजेचं आहे. ज्या लोकांच्या कुटुंबात अशा प्रकारची हिस्ट्री आहे त्यांनी तर ही काळजी नक्कीच घ्यावी.

4. घरामध्ये दुरुस्तीचे काम करताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी संरक्षक साधनांचा वापर करावा

eye safety glasses

घरातले छोटे-मोठे दुरुस्तीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, काम करणाऱ्या व्यक्ती या व्यावसायिक असोत वा नसोत. भिंती मध्ये खिळा ठोकताना जरी चुकला तरी काही कण उडून डोळ्यांना इजा होऊ शकते, म्हणून डोळ्यांचे संरक्षण होईल असे साधन वापरावे.

आम्हाला वाटतं की हा लेख आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी साध्या व सोप्या पद्धतीने कशी घेता येईल याबद्दल मार्गदर्शक ठरेल. तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे मेकअप प्रोडक्ट निवडताना देखील मदत होईल व डोळ्यांची काळजी घेताना देखील.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा. काही सुचवायचे असेल तर जरूर सुचवा.
आम्हाला आवडेलच आपल्याकडून ऐकायला…

Kajal Eye Liner Pencil | safe for eyes | enriched with vitamin E

made with ghee & other natural ingredients MRP 490.00 GSTIN : Tax is Inclusive 18% for all Products (incl. of all taxes) Add to cart