Bol Barva – Inspiring chats with extraordinary people

bol barva with anuradha bagul
Life style हा शब्द कुठेही गेलात तरी आता कॉमनली ऐकायला येतो . Life style मधले बदल हे आजकाल फक्त फिल्म स्टार्स आणि सेलेब्रिटी न ची मक्तेदारी न राहता आपल्या सध्या घरांमधून देखील सहज अनुभवला जाऊ शकतो.
असते काय ही संकल्पना?काय आहेत या संकल्पनेने ग्रस्त लोकांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय ? …..जे तुम्हाला एक निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यात मदत करू शकतील ….
भेटू या गेली 13 वर्ष life style कोच म्हणून काम करणाऱ्या अनुराधा बागुल – बंगलोर याना आणि जाणून घेऊ या ….या संकल्पने बद्दल , तिच्या फायद्यातोट्यांबद्दल…..
शनिवारी सकाळी 11 वाजता आपल्या आवडत्या बोल बरवा या कार्यक्रमात.
‘Lifestyle’ is a word we hear all the time. However, off late, not only celebrities, but also ordinary people are looking to bring about positive changes in their lifestyle.
But what exactly does the term ‘lifestyle’ mean? What are the challenges faced by people looking to incorporate lifestyle changes? Who can tell us better than Lifestyle Coach Anuradha Bagul?

She has helped people make positive lifestyle changes for a healthier & happier life since the past 13 years. Come let us meet her and chat with her this Saturday, 20th March, at 11:00 am, on your favorite talk show Bol Barva on

Facebook.com/Barvaskintherapie
bol barva with Pranjali Borse
शेती हा भारतीय समाजाचा कणा आहे ,पण हा कणाच गेल्या काही वर्षांमध्ये बदलल्यासारखा झाला आहे का बरं ? कारण जो तो शेती सोडून कामधंद्यासाठी म्हणून शहराकडे पळतो आहे.
पण असेही काही युवा आहेत ज्यांचं या निसर्गावर, या मातीवर मनस्वी प्रेम आहे . त्यातून उगवणाऱ्या मिळणाऱ्या गोष्टी या माणसाचं पोट भरण्यासाठी तर उपयोगात येतातच पण त्यावर आधारित वेगळी कौशल्ये जर विकसित केली तर नक्कीच नवीन संधी सुद्धा समोर येतात.
शेतीतून स्वतः चा व्यक्तिमत्त्व विकास साधून येणाऱ्या नवीन पिढीला आशेचा नवीन किरण दाखवणार्या युवा…प्रांजली बोरसे.
भेटू या बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात प्रांजली ला शनिवारी सकाळी 11 वाजता.
Though agriculture is the backbone of Indian society, over the past few years, children of farmers have been migrating to cities for better job opportunities.
However, there are some young people who deeply love their soil & nature. They understand that apart from filling our stomachs, agricultural practices help develop a wide range of skills that open up new opportunities!
Meet Pranjali Borse – a farmer who has developed her own personality through her farming practices, and continues to inspire younger generations to do the same!

Join us in conversation with her during the upcoming episode of Bol Barva on Saturday, 13th March, at 11:00 am at

Facebook.com/Barvaskintherapie
bol barva with suvarnatai gokhale
शहरी भागातल्या महिला आणि मुलींना असणारी मोकळीक आणि ग्रामीण भागातील परिस्थिती यात जमीन-असमानचा फरक आहे.
ज्ञान प्रबोधिनी सारखी संस्था या ग्रामीण महिलांच्या रोजच्या आयुष्यात बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न तर करतेच आहे, पण त्याच जोडीला ढोल पथकाच्या माध्यमाचा वापर करून कोणते सकारात्मक बदल घडवत आहेत आणि त्याचा ग्रामीण समाजमनावर कसा परिणाम होतो आहे?
जाणून घेऊया, वेल्हे तालुका पुणे येथे कार्यरत राहून आता सोलापूर ग्रामीण ची सुद्धा जबाबदारी घेणाऱ्या
ज्ञान प्रबोधिनी च्या महिला ढोल पथकाच्या 1986 च्या पहिल्या तुकडीच्या प्रतिनिधी
सुवर्णा ताई गोखले यांच्याकडून.
ऐकूया त्यांचा हा सकारात्मक प्रवास शनिवारी सकाळी 11 वाजता बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात
There is a vast difference in the level of independence experienced by women & girls from urban areas as opposed to those living in rural areas of India.
Organizations such as Jnana Prabhodini are working towards bridging this gap as well as creating a source of livelihood for women & girls in rural India through ‘Bachat Gat’ or self-help groups. What’s more, they have also established women-only ‘Dhol Pathak’ or drum circle groups to serve this purpose.
How? Suvarna Tai Gokhale, who has been a representative of the first batch of this drum circle way back in 1986, and continues to run the show in the Velhe taluka of Pune as well as Solapur district, will tell us during our interaction with her this upcoming Saturday.

So come join us for our Women’s Day Special episode of Bol Barva with Suvarna Tai Gokhale at 11:00 am on Saturday, 6th March, on

Facebook.com/barvaskintherapie
bol barva with ashwini tai gadgil
अहिल्येच्या उद्धाराला प्रभुरामचंद्र आले होते म्हणतात….पण ते रामायण काळात ….आजच्या जगातल्या अहिल्येच्या मदतीला दुसरी अहिल्याचं धावून येताना दिसते आहे ……आणि ही अहिल्या 1996 पासून महिलांना स्वयंनिर्मितीतून स्वयंपूर्ततेकडे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करीत त्यांच्यातल्या उद्योजकतेला वाव मिळवून देत पुढे जाण्यासाठी सदैव मदत करणारे अहिल्या महिला मंडळ , पेण जिल्हा रायगड
भेटू या अध्यक्ष अश्विनी ताई गाडगीळ याना आणि जाणून घेऊ काय आहेत त्यांची कार्यक्षेत्रे आणि कार्यपद्धती
शनिवारी 11 वाजता आपल्या बोल बरवा या कार्यक्रमात
Prabhu Ramchandra is said to have come to the rescue of Ahilya during the era of Ramayana. In the modern times, another ‘Ahilya’ has been rushing for the aid of the women of today, to make them self-sufficient & self-reliant.
Since 1996, through her institution Ahilya Mahila Mandal in Pen District, Maharashtra, Ashwini Tai Gadgil has helped numerous women become financially & emotionally independent through consistent encouragement, support & financial aid.

Let us meet her and get to know her journey in the upcoming episode of Bol Barva on Saturday, 27th February, at 11:00 am at

Facebook.com/barvaskintherapie
bol barva with ashok & archana deshmane
विठू माऊली तू माऊली जगाची
या वाक्याला सार्थ करणारा पांडुरंग हा सगळ्या जगाचा मायबाप आहे, या विठुरायाच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी जवळील कोयाळी गावी एक अवलिया आणि त्याची अवली आज गरीब, आत्महत्या ग्रस्त ,शेतकरी कुटुंबातील मुलांना घर देण्याचा, स्नेह देण्याचा प्रयत्न करत आहेत.
या स्नेहाचा, शिक्षणाचा आणि जगण्याचा आधार देऊन ही दोन व्यक्तिमत्त्व मुलांच्यामधून घडवू बघताहेत उद्याचे सोशल लिडर्स……जे गावागावांत काहितरी नवीन घडवतील
नवीन पिढी चा आधार बनून
श्री अशोक देशमाने आणि सौ अर्चना देशमाने आपल्यापुढे नक्की कोणता आदर्श ठेवू इच्छितात…..पाहूया या आठवड्याच्या बोल बरवाच्या भागात शनिवारी सकाळी 11 वाजता.
Through their NGO ‘Snehwan,’ Ashok Deshmane & Archana Deshmane have devoted their lives for the betterment of children belonging to drought-ridden regions of Maharashtra, whose poor farmer parents are either living below the poverty line or have committed suicide due to their inability to provide for their families.
Mr. Deshmane quit a high-paying IT job in 2015, and has devoted all of his time & money to Snehwan ever since. Not only are these children provided good education, but also food, shelter, and other resources to help them become responsible citizens…
Come join us to get to know their journey of love, determination & dedication this Saturday, 20th February, at 11:00 am on Bol Barva.
bol barva with Adv. aarti Deshpande
शहण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात ते आपल्या न्यायदानाच्या सिस्टीम मुळे….. पण सिस्टीम मध्ये राहून जर कोणी चांगलं काम करायचा प्रयत्न करत असेल तर मग……?मग काय appreciate करायचं ना
सरकारला एखादी केस लढण्यासाठी ज्यांची गरज असते, ते असतात सरकारी वकील आणि केस क्रिमिनल असेल तर ……..भले भले मागे हटतात ……तेव्हा लढायला उभी असते एक स्त्री जी बाजू मांडते सरकारची आणि न्याय मिळवून देते पीडित व्यक्तीला…….
भेटूया अशा वेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाने आपला ठसा उमटवणाऱ्या adv आरती देशपांडे याना
शनिवारी सकाळी 11 वाजता बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात
Going through a court case in India is a highly unpleasant experience due to the Indian judicial system. However, we have a special person here who, despite following the system by the book, brings justice to those who seek it.
Whether as a public prosecutor siding the government or as a criminal defense lawyer, no role is too daunting for Adv. Aarti Deshpande! She stands strongly & bravely to defend the government as well to defend her client during criminal case trials and strives hard for the delivery of justice.
Let us meet her this Saturday on Bol Barva, get to know her journey, and how she has made her mark in the field of law.

Join us at 11:00 am on Saturday, 13th February at

Facebook.com/barvaskintherapie
bol barva with pranjali phadnavis
योग म्हणलं की त्याबद्दल सांगणारी व्यक्ती ही मोठ्या वयाची , दाढीधारीच असावी असं नक्की नाहीये ……
स्वतः आधी योग हा जीवनशैली म्हणून स्वीकारून नंतर इतरांना त्याकडे वळवण्यात सक्षम भूमिका पार पाडणं हे देखील महत्त्वाचं. मग योगाच्या नियमित प्रॅक्टिस ने तुमच्यामध्ये होणारे सकारात्मक बदल अगदी सहजपणे घडवून आणणाऱ्या, आपल्या शारीरिक , मानसिक व्याधींशी योगाच्या माध्यमातून सक्षमरीत्या लढायला शिकवणाऱ्या
योगाचार्य प्रांजली फडणवीस.
जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास त्यांच्याशी होणाऱ्या गप्पामधून या आठवड्याच्या बोल बरवा च्या भागात शनिवारी सकाळी 11 वाजता बरवा स्किन थेरेपीच्या फेसबुक पेज वर.
When one thinks of Yoga, one tends to think that a Yoga instructor is an old man or woman, probably with a long beard…
A yogi is one who has not only adopted Yoga as a way of life, but also teaches people its importance and guides them towards incorporating the same into their own daily lives…
Meet Yogacharya Pranjali Phadnavis, who provides people with guided Yoga practices to bring about a range of positive changes in their lives with ease. These changes include physical, mental & emotional changes that empower them to continue to lead better lives.

Let us get to know her journey in the next episode of Bol Barva this Saturday, 6th February, at 11:00 am on

Facebook.com/Barvaskintherapie
bol barva with samiksha godse amte
आपण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घराणी बघतो , राजकारणी , business मधील आणि राजेशाही ,पण यात दुर्मिळ जर कोणतं घराणं असेल तर ते समाजासाठी झटणार समाजकारणी घराणं
एका पिढीने समाजासाठी झोकून देऊन काम केलं , दुसऱ्या पिढीने त्याला अजून एका उंचीवर नेऊन ठेवलं ……..आणि आता त्याच घराण्याची 3 री पिढी हाच वारसा समर्थपणे चालवतेय
बाबा – साधना ताई आमटे , प्रकाश काका – मंदाताई आमटे
आणि आता तिसऱ्या पिढीतील
अनिकेत आणि समीक्षा
या आठवड्यात आपण पाहूया नक्की काय करते आहे या तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी समीक्षा आमटे
बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात शनिवारी सकाळी 11 वाजता …….विसरू नका ह
We see many different families in society – those in business, politics, as well as royal families…But the rarest of these are ones engaged in social or community services.
One generation of a this particular family devoted their life for social service, the next generation took it to a different level, and now, the 3rd generation of this family has maintained the standards set by the previous generations.
This legacy started with the late Shri Baba Amte, and continued with Sadhanatai Amte, Prakash kaka, Mandatai Amte, and now, Aniket & Samiksha…

In this week’s episode of Bol Barva, let us get to know exactly what they are doing to carry on their family’s rich legacy. Join us this Saturday, 30th January, at 11:00 am on

facebook.com/barvaskintherapie
bol barva with sumedhatai chithade
भारतीय जवानां विषयी नितांत आदर असलेल्या चिथडे दाम्पत्याची अथक मेहनत ,सुरवातीला स्वतः चे दागिने मोडून उभी केलेली रक्कम आणि या प्रयत्नात असलेला खरेपणा कळाल्यावर समाजाने त्याला दिलेली साथ आणि भारतीय सैन्याने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास
या तीन गोष्टींच्या पायावर उभा आहे एक अविश्वसनीय प्रवास , या प्रवासाचे मानकरी आहेत ही दोन ध्येयवेडी व्यक्तिमत्व
सुमेधा ताई आणि योगेश जी चिथडे …….
भेटू या सुमेधा ताईंना त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास जाणून घ्यायला शनिवारी सकाळी 11 वाजता बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात
Meet Mr. & Mrs. Chithade, a Pune-based couple who self-funded and started an oxygen generation plant to supply oxygen to Indian soldiers in Siachen.
Initially, the funds for this cause were raised from selling Sumedha tai’s gold ornaments. But not before long, their sincerity & efforts were acknowledged by friends & family as well as the Indian Army.

Let us learn about the extraordinary & unbelievable journey with Mrs. Sumedha tai Chithade on the next episode of Bol Barva on Saturday, 23rd January at 11:00 am on

Facebook.com/Barvaskintheraipe
bol barva with dr. aparna bedekar
“मना सज्जना भक्ती पंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे|”
ज्या समर्थ रामदास स्वामी न चा हा श्लोक आहे त्या स्वामींनी समाजाला काय दिलं यावर महाराष्ट्रात अनेकांनी अभ्यास केला आहे. अनेकांना रामदास स्वामी हे गुरू वाटतात, अनेकांना संत, अनेकांसाठी ते उत्तम राजकारणी आहेत तर अनेकांसाठी ते प्रेरणास्थान…..
पण त्यांच्या लिखाणातली जी व्यापकता आहे, सर्वसमावेशकता आहे ती एका व्यक्तीला अत्यंत भावली आणि सुरू झाला एका अभ्यासू नजरेचा शोध……
काय सापडलं या अभ्यासातून त्यांना …..??
जाणून घेऊया रामदास स्वामींच्या साहित्याच्या अभ्यासक आणि आपल्या वाचनाने, अभ्यासाने या विषयावर प्रभुत्व मिळवणाऱ्या
डॉ अपर्णा बेडेकर यांना
भेटूया शनिवार, १६ जानेवारी सकाळी ११ वाजता बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात डॉ अपर्णा बेडेकर यांना
The teachings of Samartha Ramdas Swami have been considered to be very valuable to generations of Maharashtrians of all age groups & backgrounds. These include the youth, politicians, businessman, and everyone else. To some, he has been a guru, and to others, a source of inspiration for living a life of righteousness.
Dr. Aparna Bedekar (PHD) has been very inspired by his profound knowledge on life & his teachings. She has studied his works in depth for several years and learned many valuable lessons from them. We have invited her to share them with us during our upcoming episode of Bol Barva.

So join us this Saturday, 16th January, at 11:00 am on Bol Barva at

Facebook.com/barvaskintherapie
bol barva with adv vrushali datar
शाळेत असल्यापासूनच आपल्याला दुसऱ्यांसाठी काही करायचं आहे याची असलेली जाणीव स्वतः पैसे कमवायला लागल्यानंतर अजून वाढत गेली आणि त्यातून उभा राहिला एक आशेचा किरण जो हलके हलके पसरत गेला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत आणि विसावला शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात……जो त्यांना या देशाचे जबाबदार नागरिक बनवण्यासाठी धडपड करतो आहे
एखादी NGO चालवणं ही तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. मिळेल तितक्या हातांची मदत तर गरजेची असतेच पण हे काम करण्यासाठी पैसा उभा करणं हे देखील तितकंच महत्त्वाच असतं . सातत्याने गेली 10 वर्ष हे रामसेतू उभारण्याच काम करणाऱ्या अॅड. वृषाली दातार
जाणून घेऊ या त्यांच्या या कामाला शनिवारी ९ जानेवारी सकाळी ११ वाजता बोल बरवा च्या येणाऱ्या भागात.
Since her school days, she aspired to help people, and this aspiration grew by multi-folds when she started her career. This ray of hope created by her spread far & wide to the rural sections of Pune district, and lit up the lives of school children by providing them educational opportunities to walk towards a bright future.
For the past 10 years in a row, Adv. Vrushali Datar has worked consistently to run her NGO, despite all the ups & downs, the need for help from dear ones, as well as organizing the necessary funding….
Let us get to know her heroic journey this Saturday, 9th January 2021, on Bol Barva. Join us at 11:00 am at facebook.com/barvaskintherapie
bol barva with ujjwala paranjpe
एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून शांतपणे आपला मार्ग चालत राहणाऱ्या व्यक्ती समाजमनावर नेहमीच आपली दाट छाप सोडतात.
मग ते भावविश्व मुलांचं असेल तर ?
त्यांच्या तारुण्यसुलभ भावना, त्याचे कल्लोळ आणि त्या अनुषंगाने होणारे शारीरिक बदल
या गोष्टींना तर आपल्या प्रत्येकालाच तोंड द्यावं लागतं, पण जर कोणी तुम्हाला या वयात योग्य सल्ला देणारं नसेल तर…..तर मात्र होणारे परिणाम गंभीर देखील असू शकतात.
आज आपण भेटणार आहोत आकार फौंडेशन, सांगली च्या माध्यमातून समाजातल्या या प्रश्नला सुयोग्यरित्या हाताळणाऱ्या आणि ‘शैक्षणिक प्रायोजकत्व’ ही योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या
उज्वला ताई परांजपे याना
चला पुन्हा एकदा भेटूया शनिवारी सकाळी 11 वाजता बोल बरवा च्या या आठवड्याच्या भागात उज्वला ताई परांजपे याना.
A person who has big dreams & goals, and works silently to achieve them, always leaves his/her mark in the minds of those around them.
But what if this person is at the threshold of puberty?
Puberty is a very crucial stage of a child’s life. At this stage, they go through several changes physically, mentally & emotionally, as well as experience many mixed feelings of excitement and anticipation.
This makes it all the more important for them to receive the right guidance to find a definitive purpose in life.
In this episode of Bol Barva, we are going to meet Ujjwala tai Paranjpe. Through her NGO Aakar Foundation, Sangli, she runs an “Educational Scholarship” scheme to provide proper guidance, counselling & resources to children who have entered puberty to provide them the right direction in life & achieve their full potential.
Let us meet her in the upcoming episode of Bol Barva on Saturday, 2nd January 2021, at 11:00 am on facebook.com/barvaskintherapie
bol barva with dr. megha gulwani
एक गृहिणी एक आई एक शिक्षिका एक प्राचार्या अशा प्रगतीच्या वाटेवर एक एक पायरी यशस्वी पणे चढत चढत आता अजून एक मोठा टप्पा गाठणाऱ्या , शिवाजी विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेमध्ये डीन पदाची जबाबदारी सलग दुसऱ्यांदा भूषावणाऱ्या , आणखीन नवनवीन जबाबदाऱ्या उत्तम रित्या पेलून आपली निवड सार्थ करणाऱ्या
डॉ मेघा वहिनी गुळवणी
भेटू या अशा कार्यमग्न व्यक्तिमत्वाला या आठवड्याच्या बोल बरवा च्या भागात
शनिवारी सकाळी 11 वाजता
A housewife, a mother, then a teacher, Dr. Megha Gulwani has come a long way, taking one step at a time. Now, she has achieved another glorious milestone by being appointed as the Dean of the prestigious Shivaji University for the second time in a row.

Come let us meet her and get to know her in the upcoming episode of Bol Barva this Saturday, 26 December, at 11:00 am at

facebook.com/barvaskintherapie
bol barva with priya kalbhande
लहान वयातच आपल्या क्षमतांची जाणीव होऊन सुरू झाला एक यशस्वी व्यावसायिक होण्यापर्यंत चा गमतीदार आणि खाचखळग्यांनी भरलेला प्रवास
ज्यात होती नवीन चाकोरीबाहेरचं काहीतरी शिकण्याची धडपड आणि वेगळेपणा असल्याने प्रिसीजन ची जोड
अशा २ वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यवसायामध्ये स्वतः चा ठसा यशस्वीपणे उमटवणाऱ्या
प्रिया कलभंडे
ऐकूया त्यांचा हा प्रवास शनिवार १९ डिसेंबर २०२०, सकाळी ११ वाजता बोल बरवा मध्ये, बरवा स्किन थेरेपीच्या फेसबुक पेज वर
At a very young age, she was motivated to break out of her comfort zone and learn new things. Priya Kalbhande shares with us her extraordinary journey of discovering ‘precision,’ with which she has made her mark in 2 fields of business.

Join us this Saturday, 19th December, at 11:00 am on Bol Barva at

facebook.com/barvaskintherapie
bol barva with Dr. Meenakshi Pandit
रुग्ण सेवा हे ध्येय मानून त्या वाटेवर शांतपणे चालत राहणाऱ्या , नवनवीन उपचार पद्धती वापरून पेशंट चं आयुष्य सुकर होण्यास मदत करणाऱ्या
रिदम म्हणजे ताल…….पेशंट चा बिघडलेला ताल सुरळीत होण्यासाठी धडपणाऱ्या
फिजिओथेरपिस्ट डॉ मीनाक्षी पंडित
चला भेटू या शनिवारी सकाळी 11 वाजता बोल बरवा मध्ये डॉ मीनाक्षी पंडित याना.
Patient care has always been her ultimate aim in life through the implementation of the latest treatment methods. Physiotherapist Dr. Minakshi Pandit firmly believes that in order to improve the quality of one’s life, their ‘rhythm’ must be restored through her Rhythm Matrix Therapy.

Let’s meet her this Saturday, 12th December, at 11:00 am on

facebook.com/barvaskintherapie
bol barva with suchitra kate
When a lady says “nothing is impossible ” that means “every thing is possible” for her.
आयुष्यात एखादं ध्येय निर्माण करून त्याच्या मागे धावणं हा मनुष्य स्वभाव असतो, त्याला अनुसरून, ‘धावण्याला’ आपल्या आयुष्याचं ध्येय बनवणाऱ्या आणि “आयर्न मॅन ७०.३” पूर्ण करणाऱ्या ‘आयर्न लेडी’
डॉ सुचित्रा काटे
चला धावत धावत भेटूया शनिवार, दि. ०५ डिसेंबर रोजी, सकाळी ११ वाजता डॉ सुचित्रा काटे यांना ‘बोल बरवा’ मध्ये, बरवा स्किन थेरेपी च्या फेसबुक पेज वर.
When a lady says “nothing is impossible ” that means “every thing is possible” for her.
It is human nature to set a goal or purpose in life, and do whatever you can to achieve it. Let’s meet Dr. Suchitra Kate, who not only ‘ran’ after her goal of winning Iron Man 7.0, but also achieved it!
On this Saturday’s episode of ‘Bol Barva’ on the 5th of December, 2020, she will tell us about her journey and how she accomplished this mind-blowing feat. Join us on facebook.com/barvaskintherapie
bol barva snuita nadgir
वयाच्या साठीपर्यंतचा ट्रॅक सर्वसाधारण नोकरदार स्त्री आणि गृहिणी असा सरळ , निवृत्तीनंतर च्या आयुष्यात आलेला एक टर्निंग पॉईंट आणि तो घेऊन गेला एका वेगळ्याच ट्रॅक वर ,जिथे होता निसर्ग , टेकड्या , पर्वत , आणि बर्फ
स्वतः तल्या वेगळ्या क्षमतेची जाणीव विशिष्ठ वयातच व्हायला हवी असं थोडंच आहे?
या अनोख्या प्रवासाचे साथीदार होऊया….. सुनीता मावशी नाडगिर यांच्यासोबत
शनिवार, २८ नोव्हेंबर २०२० सकाळी ११ वाजता बोल बरवा मध्ये, बरवा स्किन थेरेपीच्या फेसबुक पेज वर.
After living a very ordinary life till the age of 60 – that of a working woman & a home maker, Mrs. Sunita Nadgir’s life took an unexpected turn post retirement. Here, she discovered her passion for trekking, exploring nature, hills, mountains & snow.

Let us explore her journey of discovering her passion post retirement & how she turned it into her reality in the upcoming episode of Bol Barva on Saturday, 28 November at 11:00 am at

facebook.com/barvaskintherapie
bol barva anagha modak
आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाला संधीमध्ये बदलणाऱ्या , एक क्षमता कमी झाली तर बाकीच्या क्षमतांचा विकास करून ती कमी भरून काढून आपल्या आयुष्याला नवीन आकार आणि ध्येय देणाऱ्या ,
याही परिस्थितीत आपली उत्तम राहणी आणि उच्च विचारसरणी जपणाऱ्या
🌟अनघा मोडक🌟

चला भेटूया या जिद्दी मुलीला ‘बोल बरवा’ च्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात शनिवार, २१ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता..

Barva Skin Therapie
She has always changed all of life’s obstacles into opportunities. If any one of her abilities fail, she has always focuses on sharpening her other abilities to compensate.
Anagha Modak believes that with determination and drive, one can achieve practically anything!

Come meet her this Saturday, 21st November on Bol Barva at

facebook.com/barvaskintherapie
Deepti limaye and prajakta tipale on Bol Barva
खेळ
नक्की काय बदल घडवून आणतात एखाद्या मुलाच्या आयुष्यात , मुलं उत्तम खेळाडू तर बनतातच पण खेळ शिकवणारे शिक्षक किंवा कोच हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात खूप मोठी भूमिका बजावतात.
गुरुविण कोण दाखवील वाट अशी काहीशी स्थिती मुलांची असते , त्यांना या डायलेमा मधून बाहेर काढून एक खेळाडू ते एक उत्तम व्यक्ती होण्यापर्यंत चा प्रवास सहज घडवून आणणाऱ्या दोन डेडीकेटेड कोच
दीप्ती चाफेकर- लिमये आणि प्राजक्ता टिपळे-मोरे
भेटूया “बोल बरवा” मध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता या दोन टेबल टेनिस च्या कोच ना
The practice of sports brings about phenomenal changes in our personality. It not only makes us impeccable at the sport itself, but also plays a very important role in the development of an all-round personality.
With this belief, table tennis coaches Deepti Chafekar- Limaye and Prajakta Tiple-More have helped numerous people of different age groups get over the dilemma of foraying into sports. In the process, they have enabled them to evolve as individuals too!
We shall meet them in this Saturday’s episode of Bol Barva, i.e. on 7th November, at 11:am at
www.facebook.com/barvaskintherapie
Dr. Mangala Joglekar on Bol Barva
Mental health issues are becoming an increasing cause of concern not only in India, but also worldwide. In addition to medical intervention, those suffering from mental health issues require appropriate care & counselling, which will enable them to lead a normal independent life.
For the past 10 years, ✴️Dr. Mangala Joglekar✴️ has been offering such assistance to patients through the ‘Memory Health Clinic’ run by Deenanath Mangeshkar Hospital, Pune.
Let’s meet her on 31st October 2020 in Bol Barva
मानसिक आजार हे केवळ भारतात च नाही तर संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय आहेत , या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुंग्णांसाठी फक्त वैद्यकीय उपचार पुरेसे नसतात तर त्यांना गरजेचे असतात ते स्वावलंबनाकडे घेऊन जाणारे विविध उपक्रम.
चला तर मग भेटूया
गेली 10 वर्षे निस्वार्थीपणे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये चालवल्या जाणाऱ्या मेमरी क्लिनिक च्या माध्यमातून हे उपक्रम राबवणाऱ्या
✴️डॉ मंगलाताई जोगळेकर✴️ यांना
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२० रोजी बोल बरवा या कार्यक्रमात
bol barva with smita jaykar

Bol Barva with ✨Mrs. Smita Jaykar✨

One might never fathom that a personality, such as Mrs. Smita Jaykar, a veteren film & television actress for decades, can also have an entire different side to her personality such as this one!
Mrs. Smita Jaykar, is also a spiritual healer. Through the medium of meditation, she has enabled people to improve their personalities as well as achieve spiritual healing. Let’s meet her this Saturday, 24th Oct, at 11:00 am only on facebook.com/barvaskintherapie
एखाद्या व्यक्तीच्या यशस्वी बॉलिवूड करिअर कडे पाहून आपण अंदाज देखील करू शकत नाही अशी त्याच व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू देखील असते ,
या दुसऱ्या बाजूला असते एक व्याख्याती , आपला स्वतः शी संवाद घडवून आणून आपली नव्याने ओळख करून देणारी , मेडिटेशन च्या माध्यमातून वैचारिक बैठक पक्की करायला शिकवणाऱ्या ,  एक spiritual healer म्हणून कार्यरत असणाऱया
स्मिता जयकर याना
शनिवारी सकाळी 11 वाजता बोल बरवा मध्ये

एक personality के अच्छे खासे लंबे बॉलिवूड करिअर की तरफ देखकर आप शायद अंदाजा भी नही लगा सकते की उस personality का दुसरा पहलू भी हो सकता है ।
इस दुसरे पहलू मे है एक speaker जो हमे खुद्द से खुद्द की अलग से पहचान करवाती है , मेडीटेशन की मदत से विचारोको नयी दिशा देने वाली और एक spiritual healer की तौर पर कार्यरत रहनेवाली
बॉलिवूड की vetron actress स्मिता जयकर जी
तो चलीये मिलते है स्मिता जी से शनिवार सुभह 11 बजे
बोल बरवा के आनेवाले एपिसोड मे

bol barva with sannidha bhide

Bol Barva with ✨Mrs. Sannidha tai Bhide✨

Get to know how through Sannidha tai’s efforts the “Paithani sari” was re-introduced to the world, hundreds of artisans got an opportunity to preserve their tradition and the Paithani got the attention and affection that it truly deserves.
‘बोल बरवा’ च्या आजच्या भागात आपण भेटूया, परंपरेला नवीन उजाळा आणि उठाव देणाऱ्या, पैठणी ला तिची हक्काची बाजारपेठ मिळवून देऊन कित्येक कारागिरांना आपली कला दाखवण्याची उत्तम संधी देणाऱ्या, आणि आपलीच महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी ला पुन्हा एकदा आपल्या घरांमध्ये, कार्यांमध्ये मनाचं पान देणाऱ्या…
✨सन्निधा ताई भिडे✨ याना
चला तर मग भेटूया पैठणी ला शनिवारी सकाळी ११ वाजता बरवा स्किन थेरपी च्या फेसबुक पेज वर
बोल बरवा मध्ये…
bol barva dr aarya joshi

Bol Barva with ✨Dr. Aarya Joshi✨ a Sanskrit and Indology scholar, researcher at Jnana Prabodhini
On Saturday, 10th October at 11am only on facebook.com/barvaskintherapie

धर्मशास्त्र हे एक शास्त्र आहे त्याला कर्मकांडाचे स्वरूप न यावे यासाठी धडपड करणाऱ्या,
धर्मशास्त्रात रीतसर शिक्षण घेऊन त्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देणाऱ्या,
रोजच्या जगण्यामध्ये धर्मशास्त्राचा वेगळा अर्थ समजावून नवीन पिढीला पुन्हा एकदा त्याकडे वळून पाहायला लावणाऱ्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला,
भेटूया ✨ डॉ. आर्या जोशी ✨यांना
✨बोल बरवा✨ या कार्यक्रमामध्ये
१० ऑक्टोबर २०२० सकाळी ११ वाजता

https://youtube.com/watch?v=QwL8Z7IQW0%26t%3D157s
WhatsApp Image 2020-09-28 at 22.13.25
Bol Barva with ✨Sucheta Dhuri✨ a volunteer at a Pune old-age home. This Saturday, 3rd October at 11am on Facebook.com/barvaskintherapie
 
निवारा या पुणे येथील सर्वात जुन्या वृद्धाश्रमाच्या व्हॉलेंटिअर्स पैकी सर्वात ” तरुण ” अनेक वृद्धांची हक्काची ताई, पाठीवरून फिरणारा मायेचा हात, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत या आजी-आजोबांची मनापासून सेवा करणारं एक सेवव्रती व्यक्तीमत्व
 
✨सुचेता धुरी✨
 
The “youngest” volunteer at “Nivaara”, a Pune-based old aged home, Mrs. Sucheta Dhuri is the loving “tai” of many grandparents at the facility. Alongside her household responsibilities, she devotedly provides them all the nurturing & care they need wholeheartedly and selflessly! A very loved & admired personality…
IMG-20200920-WA0013

BOL BARVA with SHOBHA NAKHRE

संस्कृत च्या टॉपर असूनही कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी वाहून घेतलेल्या त्यांच्या लाडक्या ताई, एक उत्तम निवेदिका, सूत्रसंचालिका, लेखिका, व्याख्यात्या, आणि राष्ट्रपती पदक विजेत्या सर्वोत्तम शिक्षिका… असं बहुआयामी व्यक्तीमत्व…
२८ सप्टेंबर रोजी असणाऱ्या कर्णबधिर दिनाच्या अनुषंगाने…
✨शोभा नाखरे✨ यांना भेटूया २६, शनिवार, सकाळी ११ वाजता
“बोल बरवा” या कार्यक्रमामध्ये
A topper in Sanskrit language, ✨Mrs. Shobha Nakhre✨ has devoted her life to developing the communication skills of deaf & mute children, who lovingly address her as “tai.” She has also received the prestigious President’s Award for her work in this field. What’s more, this multi-faceted personality is also a highly accomplished writer, narrator, presenter, and speaker.
On occasion of World Deaf Day observed on 28th Sep every year,

👉Meet Shobha tai on 26 Sep, at 11am on

Shobha tai’s student Avdhoot Joglekar invites you to watch her interview on the 26th…
bol barva with maya pawar mohite

BOL BARVA with MAYA PAWAR MOHITE

नमस्कार! बोल बरवाच्या या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत,
दोरीवरील मल्लखांबच्या राष्ट्रीय खेळाडू, सलग दहा वर्षे यशस्वी कारकीर्द राहिलेल्या आणि आता त्याच खेळात मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या, श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेत्या
✨माया पवार-मोहिते✨ यांच्याशी.
चला तर मग शनिवारी सकाळी ११ वाजता भेटूया बरवा स्किन थेरपी च्या फेसबुक पेज वर बोल बरवा मध्ये.
BOL BARVA
19th September 11am
Join us this Saturday and get to know Maya Pawar-Mohite, a Chhatrapati Shivaji Awardee, a national level player in “Rope Mallakhamb” and a full-time Mallakhamb trainer to hundreds of girls.
Listen to her inspiring story & gain a new perspective on life
bol barva with kiran ghanekar namjoshi

BOL BARVA with KIRAN GHANEKAR NAMJOSHI

किरण घाणेकर – नामजोशी
एक गृहिणी , उत्तम डान्सर , एक सजग आई , आणि ……
एक लढवय्या व्यक्तिमत्त्व जिने वयाच्या ३४ व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देऊन त्यावर यशस्वी मात केली. तिच्याशी झालेल्या गप्पांमधून, उत्तम आणि निरोगी जीवन जगताना आयुष्याकडे बघण्याच्या तिच्या आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सध्या दुर्दैवाने कॅन्सरशी लढा देणाऱ्यांना तर ऊर्जा मिळवून देण्याची कामगिरी ती पार पाडते आहे, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या लोकांना देखील आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक नवीन मार्ग दाखवते आहे.
Kiran Ghanekar Namjoshi
Dancer, homemaker, wonderful mother and….
A brave breast cancer surviver!
She was diagnosed with breast cancer at the age of 34. This experience has taught her many lessons about leading a healthy and close to ideal life. She is a very positive person and her outlook towards life has been an inspiration to many!She serves as an inspiration to not only those fighting this deadly disease at present, but also to the rest of us! Join us this Saturday to get to know her story & gain a new perspective on life too!
bol barva-drjadhavmote

BOL BARVA with DR. PRATIBHA JADHAV MOTE

डॉ प्रतिभा जाधव – मोटे आपली सामाजिक जबाबदारी मानून कोविड च्या काळात स्वतः हुन ड्युटी स्वीकारणाऱ्या आणि पेशंट ना निरलस सेवा देणाऱ्या या व्यक्तीमत्वाकडून ऐकू या कठीण काळाला सामोरे जाताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं……!
Dr. Pratibha Jadhav Mote is a consulting homeopath based in Satara, Maharashtra.
At present, she is volunteering for COVID duty at Mangalmurti Hospital in Satara, where she provides special care for COVID patients.
Today, she joins us on Bol Barva to share her experiences during this time. She will also provide tips to enable us to cope up with this stressful COVID-19 crisis mentally and emotionally.
bol barva with vrushali pandit

BOL BARVA with VRUSHALI PANDIT

वृषाली पंडित
एक पुण्याची मुलगी जी इंदोर ला आपली कर्मभूमी मानून इंदोर शहर आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार करण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या टीम चा एक भाग म्हणून गेली ६-७ वर्ष काम करतेय.
मनुष्यप्राणी आणि इतर जीवसृष्टी च्या उत्तम आरोग्यासाठी , झाडे लावा झाडे जगवा यासाठी मुलांना सोबत घेऊन नवनवीन कल्पना राबवून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे काम करणाऱ्या धडपडी व्यक्तिमत्वाची ओळख व त्यांच्याशी मारलेल्या गप्पा “बोल बरवा” च्या माध्यमातून आपल्यासमोर उद्या सकाळी म्हणजे च शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आपल्या समोर प्रसारित होत आहे