पित्त प्रकृतीची लक्षणे – बोल आयुर्वेद
लालसर गोरा रंग, सुकुमार कांती आणि शीघ्रकोपी? कोणत्या प्रकारच्या प्रकृतीच्या लक्षणांमध्ये ही लक्षणे येतात? आयुर्वेदाने व्यक्तींच्या सांगितलेल्या 3 प्रकृती पैकी ही लक्षणे आहेत “पित्त प्रकृतीच्या” व्यक्तींची. अजून कोणती लक्षणे आहेत जी समजली की आपल्याला देखील आपली प्रकृती सहजपणे समजून घेता येऊ शकते. याबद्दल ची अजून सखोल माहिती घेऊ या वैद्य छाया दांडेकर यांच्याकडून आणि माहीत करून घेऊया आपली प्रकृती नेमकी कोणती हे… पित्त प्रकृतीच्या लोकांची शरीरयष्टी मध्यम असते. वर्णन उत्तम लालसर गोरा आणि कांती सुकुमार तेजस्वी असते. अंग नेहमीच थोडे उष्ण असते. डोळे तांबूस पिंगट रंगाचे असतात तसेच केसांचा रंग देखील काळाभोर नसून पिंगट असतो. बुद्धी स्मृती आकलनशक्ती उत्तम असते.